नारळ

नारळाचे झाड
(माड या पानावरून पुनर्निर्देशित)

माड किंवा श्रीफळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोस नुसिफेरा ; इंग्लिश: Coconut, कोकोनट ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळ नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वृक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात, म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काहीना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.

माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
शहाळे
नारळाचे खोड
नारळ फुलणे(वाळलेल्या)

ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंडखनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. शहाळ्यातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात.

सांस्कृतिक महत्त्व

संपादन
 
नारळाचे झाड

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हणले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक लोख्खी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर सिंदूराने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.[]


 
शहाळी
 
कुंभमेळ्यात नारळ

माडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंध्याला एक भोक पाडले जाते. त्यातून स्रवणारा पांढरा रस म्हणजे 'माडी'. हा स्रवणारा पांढरा रस मडक्याच्या तोंडाला फडके बांधून त्याला नळी आत जाऊ शकेल एवढे भोक पाडून त्यात नळीद्वारे हा रस साठवतात. सुरुवातीला माडी थंडगार आणि अतिशय मधुर असते, पण तीच माडी काही काळ सेवन न करता राहिली तर तिच्यात मद्यार्क निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माडी मिळते.

नारळाचे फायदे

संपादन

त्वचा-पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत ऑईली होणे ही खूप मोठी समस्या तरुणींसमोर उभी राहते, त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेह-याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही मदत होईल. ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात, त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचा ग्लो करेल. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिझगसाठीही उपयुक्त ठरतात . कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.

गर्भधारणेनंतर-नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे.

'निरोगी हृदयसाठी - हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्त्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचेसेवन केले पाहिजे म्हणून.

केस-पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.

वजन घटण्यास उपयुक्त-नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी अ‍ॅसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते

नारळामध्ये ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्त्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्सला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "Kojagari Lakshmi puja – rituals, believes and the divine Bengali feast platter". saffronstreaks (इंग्रजी भाषेत). 2020-09-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-12 रोजी पाहिले.