Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


गूळ हा उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ आहे. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे. पूर्वी गुळाचा चहा केला जायचा.जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.

वर्णनसंपादन करा

आयुर्वेदानुसार, हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो.परंतू, मधुमेह असणाऱ्यांनी, हा गोड असल्यामुळे, याचे सेवन करू नये.

गूळ निर्मितीसंपादन करा

 • ऊस तोडणीनंतर ६ ते १२ तासांच्या आत उसाचे गाळप करावे, अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
 • ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्‍स असलेल्या चरक्‍याची निवड करावी.
 • गुऱ्हाळासाठी चरक्‍याची गाळप क्षमता ६५ ते ७० टक्केपर्यंत असावी. गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
 • उसाच्या रसात फिनॉलिक द्रव्ये असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरीत परिणाम होतो. म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
 • स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणात गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्‍याचा वापर करावा.
 • द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन "फूड ग्रेड'चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा. मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
 • हौदातून स्वच्छ रस नायलॉनच्या गाळणीतून गाळून तो काहिलीत पुढील प्रक्रियेसाठी घ्यावा.
 • रस उकळण्यासाठी सुधारित काहिलीचा वापर करावा. या काहिलीच्या वापरामुळे गूळ प्रक्रियेसाठी साधारणपणे १६ टक्के कमी कालावधी लागतो. इंधनामध्ये १५ टक्‍क्‍यांची बचत होते.
 • रस उकळण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चिमणी चुलाण वापरावे. चुलाणावरून काहिल उतरण्यासाठी "फ्रेम- चाके- रूळ' यांचा समावेश असलेली यांत्रिक पद्धत वापरावी.

घटकसंपादन करा

 • सुक्रोज - ५९.७ %
 • ग्लुकोज - २१.८ %
 • खनिज - २६ %
 • पाणि(अंश) - ८.८६ %

या शिवाय कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम, लोहताम्र याचेही प्रमाण त्यात असते.

फायदासंपादन करा

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, रक्तदाब कमी, हिमोग्लोबिन व स्मरणशक्तीमध्ये मध्ये वाढ, शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात.

प्रकारसंपादन करा

बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, ह्याद्रोस पावडर, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा.

संदर्भसंपादन करा