रोगप्रतिकारशक्ती

निःसंदिग्धीकरण पाने

कोणत्याही रोगास प्रतिकार करण्याचा अंगभूत गुण म्हणजे रोगप्रतिकारशक्ति. ही शक्ती कमी असस्ल्यास व्यक्ती लवकर आजारी पडते. आणि ही शक्ती योग्य प्रमाणात असल्यास व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. एच आय व्ही सारखे रोग जंतू शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात म्हणून एच आय व्ही बाधित व्यक्ती लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती मर्यादेपेक्षा वाढल्यास त्रासदायक ठरते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने निर्माण होणाऱ्या आजारांना ऑटो इमुउन डीसीजेस अशी व्याख्या आहे. आमवात, (सांधेदुखी / rhumatoid arthritis) हा एक ऑटो इमुउन डीसीज / रोग आहे रोगप्रतिकारक शक्ती आहारात आणि जीवनशैलीत काही बदल करून वाढवता येते. सकस आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.[१] धूम्रपान आणि मद्यपान यामुळे रोगप्रतिकारशक्ति कमी होते आणि शारीरिक व्यायामामुळे वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराचे व्यायाम व पौष्टिक आहार घ्यावा [१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "लॉकडाउनमध्ये 'या' दहा सोप्या पद्धतीने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती". Loksatta. 2020-05-22. 2020-05-27 रोजी पाहिले.