मेजवानीच्या जेवणातील मुख्य गोड पदार्थाला पक्वान्न म्हंटले जाते. पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, खीर ही काही पक्वान्नांची उदाहरणे आहेत. विशेष जेवणात पंच-पक्वान्ने करण्याची पद्धत आहे. याचा अर्थ एका जेवणात पाच गोड पदार्थ केले जातात,
पक्वान्न हे जेवणासोबत खाण्याची पद्धत आहे. परदेशात जसे गोड जेवणानंतर खाल्ले जाते तसे अपेक्षित नाही.
अनेक कार्यात खीर हे पक्वान्न म्हणून केले जाते पण हे मुख्य पक्वान्न नसते.
ताटात वाढलेल्या जेवणात पक्वान्न वाढायची सुद्धा एक जागा ठरलेली असते. उदाहरणार्थ खीर पानाच्या डावीकडे वाढली जाते तर श्रीखंड वाटी ऐवजी पानात वाढले तर मिठा खाली वाढले जाते.

हेही बघा संपादन