गुप्त साम्राज्य

साम्राज्य
(गुप्त या पानावरून पुनर्निर्देशित)

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्यविज्ञानात खूप मोठी मजल मारली. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. २४० ते इ.स. ५५० पर्यंत मानला जातो. गुप्तांच्या साम्राज्याचा इतिहास छोट्या राज्यातून बलाढ्य साम्राज्यात रूपांतरीत झालेला आहे श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता त्याच्या नावामागे महाराज अशी पदवीही लावलेले आढळते यावरून असं लक्षात येतं की तो एक मांडलिक शासक होता त्याचा मुलगा घटोत्कच यानेही महाराज हेच बिरुद धारण केलं यावरून या काळात गुप्त राजे हे मांडलिक शासक होते गुप्त राज्याचा विस्तार वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचं श्रेय हे पहिल्या चंद्रगुप्त यांच्याकडे जाते त्याच्या नावा आधी जोडलेल्या महाराजाधिराज या पदवीने गुप्त राजांच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची कल्पना येते त्याने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्या बरोबर विवाह केला हा विवाह गुप्त घराण्याला राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरला कुमारदेवी बरोबर प्रतिमा असलेले त्याचे नाणे ही त्याने काढले गुप्त काळामध्ये अनेक देवदेवतांच्या प्रतिमा असलेली नाणी प्र चलनात आणली गेली गुप्त शासकांनी धर्म कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले सांस्कृतिक दृष्ट्या उत्कर्षाचा हा काळ होता

गुप्त साम्राज्य
px

इ.स. ३२० - इ.स. ६००
राजधानी पाटलीपुत्रsangmeshwar achut Khadke
राजे २९० ते ३०५: पहिला चंद्रगुप्त
३३५ ते ३७०: समुद्रगुप्त
३१५ ते ४१५: चंद्रगुप्त विक्रमादित्य
४१५ ते ४५५: पहिला कुमारगुप्त
भाषा संस्कृत
क्षेत्रफळ ३५ लक्ष वर्ग किमी
गुप्त साम्राज्याच्या काळात उभारलेला दिल्ली येथील लोहस्तंभ

गुप्त साम्राज्यातील राज्यकर्ते

संपादन
सम्राट कारकीर्द माहिती
श्रीगुप्त २४० ते २९० वंशाचा संस्थापक होता. पुणे येथील ताम्रपटात समुद्रगुप्त हा श्रीगुप्ताचा पणतू होता असे म्हणले आहे. इत्सिंगच्या प्रवासवर्णनात पाटलीपुत्रच्या परिसरात श्रीगुप्ताचे राज्य होते असा उल्लेख आहे.
घटत्कोच २९० ते ३०५ श्री गुप्तानंतर घटोत्कोच गुप्त सत्तेवर आला. त्याने स्वतःला महाराज ही पदवी लावली होती.
पहिला चंद्रगुप्त ३०५ ते ३३५ गुप्त साम्राज्याचा संस्थापक, याचा कार्यकाल हा भारतीय संस्कृतीचा सुवर्णकाल समजला जातो.
समुद्रगुप्त ३३५ ते ३७० भारताच्या इतिहासातील एक महान सेनानी.
रामगुप्त ३७० ते ३७५
दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) ३७५ ते ४१५ समुद्रगुप्ताचा मुलगा, भारतीय इतिहासातील एक महान सम्राट. एखाद्या कालखंडाला सुवर्णयुग ठरविण्याच्या ज्या कसोट्या असतात त्या कसोट्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळाला लागू पडतात.
पहिला कुमारगुप्त ४१५ ते ४५५ दुसऱ्या चंद्रगुप्ताचा मुलगा. कुमारगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला होता व त्या प्रसंगी त्याने नाणी काढली होती. नाण्यांवर अश्वमेध महेंद्र जयति देवम कुमार हे शब्द कोरले होते. कुमारगुप्तानेही स्वतःला बिरुदे लावली होती. श्रीमहेंद्र, सिंहमहेंद्र, महेंद्रकर्मा महेंद्रकल्प, अजितमहेंद्र, महेंद्रकुमार, महेंद्रादित्य इत्यादि. कुमारगुप्ताच्या काळा गुप्त साम्राज्यात शांतता नांदत होती.
स्कंदगुप्त ४५५ ते ४६७ स्कंदगुप्ताने वडिलांच्या हयातीतच पुष्यमित्राचेहूणांचे आक्रमण थोपवून धरल्याने स्कंदगुप्त हा योद्धा व पराक्रमी राजा मानला जातो. चीनच्या सरहद्दीवर हुणांच्या रानटी टोळ्या या काळात युरोप, इराण आणि भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमनांचे साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्ताने पराभव करून त्यांना परतवून लावले. या पराभवानंतर पन्नास वर्षे हूण भारताकडे फिरकले नाही.
दुसरा कुमारगुप्त ४६७ ते ४७७ हा राजा खूप तकवान होता त्याने खूप राज्ये जिंकली होती पण दु्दैवाने त्याचा लढाईत मृत्यू झाला.
बुद्धगुप्त ४७७ ते ४९६
तिसरा चंद्रगुप्त ४९६ ते ५००
विनयगुप्त ५०० ते ५१५
नरसिंहगुप्त ५१५ ते ५३०
तिसरा कुमारगुप्त ५३० ते ५४०
विष्णुगुप्त ५४० ते ५५०

सैन्य रचना

संपादन

गुप्त साम्राज्याने सशक्त सैन्यबळावर राज्याचा विस्तार वाढवला. गुप्तांच्या लष्कराबद्दल बरीचशी माहिती, भारतीयांकडून नव्हे, तर चिनी व पाश्चिमात्य स्रोतांकडून जास्त कळते. गुप्तांची सैन्यरचना पारंपरिक भारतीय सैन्यरचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शिव धर्नुर्वेदामध्ये गुप्तांच्या सैन्य रचनेबद्दल माहिती सांगितली आहे. धनुष्यबाण हे मुख्य अस्त्र असल्याने गुप्तांची मुख्य फळी ही धनुर्धरांची होती. भारतीय धनुष्य हे मुख्यत्वे लांब बांबूचे बनलेले असे व फोकाचे बाण असत. बाणांच्या टोकाला लोखंडी टोक हे भारतीय बाणांचे वैशिष्ट्य होते. बांबूचा उपयोग भारतीय वातावरणात चांगलाच होत होता. भारतीय धनुर्धर खूप लांबून व अचून मारा करण्यात पटाईत होते व तत्कालीन वायव्य भागातून येणाऱ्या आक्रमकांविरुद्ध चांगलेच यशस्वी ठरत, असे दिसते. हूण शक सारख्या तत्कालीन आक्रमकांचे मुख्य अस्त्र घोड्यावरील धर्नुधर. त्यांना तोडीस तोड म्हणून भारतीयांनी घोड्यावरील धर्नुधारी दल बनवले नव्हते. असे असले तरी त्या काळचे भारतीय सैन्यदल या आक्रमकांविरुद्ध लढण्यास सक्षम होते, असे दिसते. भारतीयांनी अतिशय ताकदवान असे लोखंडी धनुष्यही बनवले होते. ते जाड चिलखत सहज भेदू शके. परंतु अशी शस्त्रे केवळ महत्त्वाच्या व्यक्तींकडेच असत. भारतीयांनी लोखंडाची इतर शस्त्रे बनवण्यातही यश मिळवले होते. मात्र धर्नुधारी दलाला नेहेमी ढाल-तलवारी-भाल्यांनी युक्त अशा पायदळाचे संरक्षक कवच असे. उत्तम रसद पुरवठा हेदेखील गुप्तांच्या यशामागचे कारण असू शकते. लढायांमध्ये हत्तींचा आक्रमणासाठी वापर, घोडदळाच्या व पायदळाच्या आक्रमणामागून धनुर्धारी दलाचा मारा अशी समन्वयात्मक युद्धशैली हे गुप्तांचे युद्धाचे डावपेच होते. त्यांचा प्रभावी वापर ते भारतातील इतर राज्यकर्त्यांविरुद्ध व परकीय आक्रमकांविरुद्ध करत. गुप्तांनी नौदलाचा वापरही केला होता. हूणांच्या सततच्या आक्रमणाने गुप्त साम्राज्य क्षीण झाले. गुप्तांचे लष्करी सामर्थ्य कमी पडले असे मत इतिहासकारांना चुकीचे वाटते, कारण गुप्त साम्राज्याच्या उत्तर काळातील सम्राट स्कंदगुप्तानेही हूणांना हुसकावून लावले होते. या विजयाने स्कंदगुप्ताने केवळ गुप्त साम्राज्याचे नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून त्याला 'भारतीय संस्कृतीचा त्राता' असे म्हणले गेले. त्या नंतरच्या काळात प्रामुख्याने अंतर्गत कलहाने व राजकारणाने गुप्तांचा प्रतिकार क्षीण पडला असावा.

प्रशासन व्यवस्था

संपादन
  • राज्य कारभारात युवराजपद हे सम्राटाच्या खालोखाल महत्त्वाचे मानले जात होते.
  • सम्राटास राज्य कारभारात साहाय्य करण्यासाठी एक मंत्री मंडळ असत असे.
  • प्रशासनासाठी प्रदेशांचे अनेक विभाग (प्रांत) पाडले होते. त्यांना भुक्ती असे म्हणत. त्यावर उपारिक नावाचा अधिकारी नेमला जाई.
  • नगरांचे प्रशासन पाहणारी अनेक मंडळे असत. त्यांना अधिष्ठानाधिकरण असे म्हणत.
  • अधिकाऱ्यांना वेतन दिले जात असे. पण काही अधिकाऱ्यांना जमिनी इनाम दिल्याचेही आढळते.

कला व साहित्य निर्मिती

संपादन

राजकीय स्थिरता आणि आर्थिक समृद्धी लाभल्यामुळे शिल्पकला, चित्रकलावास्तुकला या कलांना मोठा वाव या काळात मिळाला. शिल्पकलेत पूर्णाकृती मानवी प्रतिमा हे या वैशिष्टय़ होते. सारनाथ येथील बुद्धमूर्ती आणि ग्वाल्हेरजवळची सूर्यप्रतिमा याची साक्ष देतात. तांबे व कांस्य हे धातू वितळवून त्यांच्या मूर्ती तयार करण्याचे तंत्र याकाळात प्रगत झाले होते.

चित्रकला

संपादन

चित्रकला गुप्त काळात बहरली होती. अजिंठा व बाघ या ठिकाणची भित्तीचित्रे त्यांच्या कलापूर्ण शैलीमुळे जगात प्रसिद्ध आहेत. या चित्रांचे प्रसंग बुद्धचरित्र व जातककथा यामधून निवडलेले दिसून येतात.

स्थापत्य शास्त्र

संपादन

मंदिर स्थापत्य कलेचा पाया याच काळात रचला गेला. कळसांचा आकार, सभागृह याची मोजमापे या काळात लिखित स्वरूपात आली. या कालखंडात लाकडाऐवजी भाजलेल्या विटा व घडीव दगड यांचा वापर अधिकाधिक झाला. अजिंठा, वेरूळ यथील लेणी याच काळात घडवली गेली. कळसांचा आकार, सभागृह याची मोजमापे या काळात लिखित स्वरूपात आली.

साहित्य

संपादन

तसेच गुप्तकालीन साहित्यातही भरभराट झालेली होती. यामुळे गुप्तकाळ हा साहित्यनिर्मितीचे अभिजात युग मानले जाते. गुप्तकाळात भास हा नाटककार झाला. याने १३ नाटके लिहिली. या काळात निर्मिलेली नाटके मृच्छिकटिक, मुद्राराक्षस. कालिदास हा सर्वश्रेष्ठ कवी याच काळात झाला. मेघदूत, अभिज्ञानशाकुंतलम, ऋतुसंहार (महाकाव्य), रघुवंश (महाकाव्य), मालविकाग्निमित्र अशी विपूल साहित्य निर्मिती त्याने या काळात केली. कालिदास चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या दरबारात राजकवी म्हणून असे.

गणितज्ज्ञ म्हणजे आर्यभट्ट यांचा जन्म याच काळात झाला. त्याने गणित व खगोलज्योतिष या विषयांवर आर्यभटीय नावाचा ग्रंथ लिहिला. जगातील दशमान पद्धतीची पहिली नोंद या ग्रंथात आढळते. वराहमिहिर गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ याच काळात झाला. फलज्योतिषशास्त्रावर त्याने बृहत्संहिता हा ग्रंथ रचला.

संदर्भ

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन