महाराज (किंवा महाराजा) "महान शासक", "महान राजा" किंवा "उच्च राजा" या शब्दासाठीचा संस्कृत शब्द आहे. शीख साम्राज्याचे संस्थापक रणजित सिंह, महाराजा यशवंतराजे होळकर (उत्तर भारतातील सर्वात मोठे होळकरमराठा साम्राज्य राजा),तसेच प्राचीन भारतीय गुप्त साम्राज्याचे संस्थापक महाराजा श्रीगुप्ता यांच्यासह अनौपचारिक साम्राज्यांतील राजांना या उपाधीने संबोधले जात असे.

महिलांसाठी समतुल्य, महाराणी (महाराजनी) हा शब्द आहे. महारानी म्हणजे महाराज (किंवा महाराणा इत्यादि) यांच्या पत्नी किंवा राज्य करणारी महिला शासक. महाराजांची विधवा 'राजमाता' (Queen mother) म्हणून ओळखली जाते.