कोकण

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेश
(कोंकण या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतातील कोकण हा प्रदेश भारता पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे. कोकण किनारपट्टी हा एक 560 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे.कोकण म्हणजे स्वर्गच आहे.

कोकण विभागातील जिल्हे दर्शवणारा नकाशा

कोकणाला संस्कृतमध्ये अपरान्त म्हणतात.

इतिहास

संपादन

पौराणिक आख्यायिका

संपादन
 
समुद्रास मागे हटण्याचा आदेश देणारी पौराणिक कथा चितारणारे चित्र

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामाने केली. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वतः परशुराम दक्षिण पर्वतावर निघून गेले व तेथे त्यांनी शूर्पारक (सोपारा) देशाची निर्मिती सागरापासून केली, असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळलाआहे.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामाच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामाने सह्याद्रीवरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्यानंतर परशुराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मिती देखील परशुरामाने केली [] अशी पौराणिक कथा खुप प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणांस चितेतून पुन्हा जीवदान देऊन पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे नाव पडले. गौड सारस्वत [] व केरळ मधील नंबुद्री ब्राम्हणांच्या उगमासंदर्भात देखील याच प्रकारच्या परशुराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात रत्‍नागिरी या जिल्ह्यात चिपळूणजवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व एक प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे.

मध्ययुगीन

संपादन

आजचे कोकण

संपादन

महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्याचा समावेश होतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे अलीकडेच म्हणजे १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.पालघर हा महाराष्ट्राचा ३६ वा जिल्हा असून महाराष्ट्राची ३४ वी जिल्हा परिषद ठरली.

कोकणात सात जिल्हे असून ४७ तालुके आहेत मुंबई उपनगरातील इतर ३ तालुके अंधेरी बोरिवली कुर्ला हे महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय सोईसाठी निर्माण केले कोकणातील मुंबई शहर हा महाराष्ट्रातील एकही तालुका नसणारा जिल्हा आहे

कोकणाला 720 कि.मीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. कोकणातील रत्‍नागिरी या जिल्हास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्‍नागिरी (२३७), रायगड (१२२), सिंधुदुर्ग (१२०), ठाणे व पालघर (१२७), मुंबई शहर व मुंबई उपनगर (११४) समुद्र किनारा लाभला आहे.

कोकण प्रदेशाला गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याच्या सीमा लागून आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला कोकण प्रशासकीय विभाग आहे. कोकणाचे एकूण क्षेत्रफळ ३०७२८ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोकणातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर हा आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे १५७ किमी आहे. कोकणातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा रत्‍नागिरी आहे त्याचे क्षेत्रफळ ८२०८ किमी आहे.

कोकणातील सागरी किल्ले-

वसईचा किल्ला, जंजिरा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे कोकणातील सागरी किल्ले आहेत.

कोकणातील बेटे

मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, अंजदीव, जंजिरा, घारापुरी, कुरटे इ. बेटे कोकणात समाविष्ट होतात.

कोकणातील खाड्या

उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने दतीवरा खाडी-वसई-धरमतर-राजपुरी-बाणकोट-दाभोळ-जयगड-विजयदुर्ग-कर्ली-तेरेखोल खाडी या क्रमाने आहे.

कोकणातील बंदरे

महाराष्ट्रात एकूण 53 बंदरे आहे.कोकण किनारपट्टीवर मुंबई हे नैसर्गिक आणि आंतराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळच न्हावाशेवा हे बंदर उभारले गेले. इतर बंदरे - हरिहरेश्वर, दिव्याघर, अलिबाग, मुरुड श्रीवर्धन जयगड रत्‍नागिरी मालवण आणि वेंगुर्ला

कोकण विभागाची संरचना

संपादन

राजकीय

संपादन

भौगोलिक

संपादन

महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग [] हा एक आहे. या विभागात ७ जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो. हा पश्चिम घाट सह्याद्री म्हणून ओळखला जातो. कोकणाला पश्चिमेकडे अरबी समुद्राने, उत्तरेकडे मयुरा नदीने आणि दक्षिणेतील गंगावल्ली नदी यांनी वेढले आहे.

सध्याच्या कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात गंगावली प्रवाह आहे. त्याचा उत्तर किनारा कोकणचा दक्षिणेकडील भाग आहे. कारवार, अंकोला, कुमठा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोंकणच्या किनाऱ्यावर येतात. ऐतिहासिक कोकणाची उत्तरेकडील मर्यादा, मयुरा नदीची अचूक ओळख, अनिश्चित आहे.

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर 'मुंबई' ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे कोकण विभागात आहे, महाराष्ट्रातील प्रशासकीय उपविभागामध्ये राज्यातील किनारपट्टीवरील सर्व जिल्हे येतात. हे जिल्हे उत्तरेकडून ते दक्षिणेकडे आहेत.

कोकण

क्रेटेशियस शकट झालेल्या लाव्हाच्या संचयनाने भारताच्या दक्षिण भागात शंकूची निर्मिती झाली होती.

ज्वालामुखीचा मुख्य भाग पश्चिम घाटात असून याचा दोन्ही बाजूकडे बेसिक प्रकाराचा लाव्हा साचून बेसिक लाव्हा शंकूची निर्मिती झाली होती.

बेसिक प्रकाराचा लाव्हा शंकू असल्याने या शंकूची उंची कमी व विस्तार मात्र जास्त होतो.

इयोसिन शकात बेसिक लावा शंकूच्या पश्चिम भागात प्रस्तर भंगामुळे खाली खचलेला भाग अरबी समुद्रात विलीन झाला या खचलेल्या भाग पासूनच कोकण विभागाची निर्मिती झाली.

पश्चिमेकडे वाहणाऱ्या नदीच्या गाळाच्या संचयनामुळे ही कोकणच्या निर्मितीस हातभार लागलेला आहे.

इयोसिन काळात खचलेला भाग आजही जीवाश्मच्या रूपाने अरबी सागराचा खाली पहावयास मिळतो.

पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानची अरुंद व चिंचोळा पट्ट्यास कोकण विभाग असे म्हणले जाते.

कोकणात अरबी सागराचा किनारा लागलेला असून ही किनारपट्टी 720 किलोमीटर लांबीचा आहे यात सर्वाधिक किनारा

  • रत्‍नागिरी - 237 Km
  • रायगड -122 Km
  • सिंधुदुर्ग -117 Km
  • मुंबई शहर व उपनगर - 114 Km
  • पालघर - 102 Km
  • ठाणे - 25 Km

कोकणची रुंदी दक्षिनेकडे कमी व उत्तरेकडे जास्त आहे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना ही रुंदी वाढत जाते.

दक्षिणे कडे सरासरी रुंदी 40 ते 50/45 किमी तर उत्तरेत उल्हास नदी खोऱ्यात सरासरी 100 पर्यंत आहे.

कोकणाचे प्रामुख्याने प्रदेशानुसार 2 विभाग केले जाता

सामाजिक

संपादन

या प्रदेशात आढळलेल्या काही समुदायांमध्ये कुणबी,मालवणी, आगरी, कोळी, पाठारे क्षत्रिय(पाचकळशी,चौकळशी) , पाठारे प्रभू, कोकणस्थ (ब्राह्मण,शिंपी व मराठा), भंडारी, गौड सारस्वत ब्राह्मण, कुंभार, राजापूर सारस्वत ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण ,गाबित, चित्तपावन, दैवज्ञ, कुडाळदेशकर ब्राह्मण, कुरुबा,वासुकीवंशी नाभिक यांचा समावेश आहे.

कोकणातील आदिवासी जमातींमध्ये दक्षिणेतील कोकणा, वारली आणि कोलचा, आणि दादरा-नगर हवेली व महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जमातींचा समावेश होतो. कातकरी रायगड आणि रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतात.

बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याकांसह या भागाची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू आहे.

प्रमुख आकर्षणे =खेड तालुक्यातील मोजे. असगणी.स्वंयभु पांडवकालीन स्वयंभू शिव मंदिर,


पर्यटन स्थळे

संपादन

थंड हवेची ठिकाणे

संपादन

कोकण रंगभूमी

संपादन

कोकण निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. कोकणची साहीत्य संपदाही विपूल आहे. कोकण रंगभूमी सशक्त व समृद्ध रंगभूमी आहे. कोकणी नाटक आज आपली स्वतःची ओळख घडविण्यात यशस्वी ठरलेले आहे. कोकण रंगभूमीवर गोमंतकीय जीवनाची वास्तवपूर्ण दर्शन घडते. कोकण संस्कृतीची प्रतिमा दाखवण्याची ताकद आणि सामर्थ्य कोकणी नाटकाने संपादन केलेले आहे. कोकण रंगभूमीला नाटय लेखनाची मोठी परंपरा लाभली आहे. मराठीतील नामवंत नाटककार मामा वरेरकर एकदा विष्णू नाईक यांना म्हणाले होते, ‘‘तुम्ही कोकणी नाटके घेऊन जनसामान्यांपर्यंत गेल्याशिवाय कोकणी भाषेचा कोणी स्वीकार करणार नाहीत.’’ मामा वरेरकरांचा आशीर्वाद आज फळाला आला आहे. मराठी नाट्यपरंपरा समृद्ध करण्यात गोमंतकीयांचे योगदान फार मोठे आहे. मूळ मराठी नाटकाचे जन्मस्थान म्हणण्यापर्यंत या योगदानाची मजल जाते. कोकणी नाटकाला मराठी परंपरेचा आधार लाभणे स्वाभाविक आहे. पण या आधारात मोठा धोकाही होता. तो म्हणजे आधाराचे अनुकरण होण्याची शक्यता; पण तसे घडले नाही.

कोकणावरील पुस्तके

संपादन
  • कथा कोकण किनाऱ्याची (प्रकाश गोळे)
  • कोकणची निसर्गयात्रा (प्रा. सुहास बारटक्के)
  • कोकणदर्शन (ना.स. देशपांडे, र.य. साने)
  • कोकण - विविध दिशा आणि दर्शन (प्रतिमा प्रकाशन)
  • कोकणातल्या आडवाटा (प्रा. सुहास बारटक्के)
  • कोकणातील लोककथा आणि गजाली (विद्या प्रभू)
  • कोंकणी गं वस्ती (कथासंग्रह, मधु मंगेश कर्णिक)
  • कौटुंबिक सहलीसाठी निसर्गरम्य कोकण भाग १ ते ४ (अदितीज पब्लिकेशन)
  • चला कोकणात (डॉ. नीला पाढरे, शैला कामत)
  • भटकंती कुडाळ-वेंगुर्ल्याची (महेश तेंडुलकर)
  • शोध अपरान्ताचा (अण्णा शिरगावकर)
  • सारे प्रवासी घडीचे ( जयवंत दळवी )

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ कोकणस्थ.कॉम
  2. ^ "गोवाटुरीझम.कॉम". 2007-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ http://www.maharashtra.gov.in/marathi/mahInfo/konkanDivision.php

बाह्य दुवे

संपादन


महाराष्ट्राचे उपप्रांत
 
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ