माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. माणदेश च्या   मातीतील अनेक प्रकारचीपुस्तके  माणदेश प्रकाशन स्वरूपात आज महाराष्टात प्रसिद्ध आहेत लेखक जयराम शिंदे यांनी माणदेश प्रकाशन मधून सातारा जिल्हा माहिती पुस्तक लिहले असून त्यात माणदेश ची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे

माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.

मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या माणदेशी माणसे या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. शंकरराव खरात हे माणदेशातील थोर साहित्यिक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते.शंकरराव खरातांचे तराळअंतराळ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ