काटाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे. हा भाग उत्तर कोकणात मोडतो.

  ?काटाळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर
भाषा मराठी
ग्रामपंचायत काटाळे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०५
• +०२५२५
• महा ४८

भौगोलिक स्थान

संपादन

हे गाव पालघर रेल्वे स्थानकापासून १६ किमी अंतरावर वसलेले आहे.

हवामान

संपादन

येथील हवामान पावसाळ्यात समशीतोष्ण असते तर उन्हाळ्यात उष्ण असते. हिवाळ्यात येथे सुखद थंडी अनुभवायला मिळते. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो. भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरीप हंगामात येथे भाताचे पीक घेतले जाते. कोलम, तायचुंग, आयआर८,कोळपी, इत्यादी प्रकारच्या भातांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात काकडी, दुधी भोपळा,कारले, पडवळ, भोपळा, शिराळा, गिलका इत्यादी फळभाज्यांची पिके घेतली जातात. शेतीबरोबरच येथील शेतकरी कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, बकरीपालनही करतात.

लोकजीवन

संपादन

मुख्यतः कुणबी, आदिवासी, वंजारी,सूर्यवंशी क्षत्रिय समाजातील लोक येथे पिढ्यान्पिढ्या स्थायिक आहेत. काही लोक नोकरी, व्यवसाय, धंदा करण्यासाठी रोज पालघर, मुंबई, वापी,वसई व तत्सम शहरात जा-ये करीत असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची गावात सोय आहे. उच्च शिक्षणासाठी पालघर, मुंबई,येथे जावे लागते. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरी सुविधा

संपादन

ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, रस्तेवीजपुरवठा,पाणीपुरवठा इत्यादीचे व्यवस्थापन बघितले जाते. पालघर रेल्वे स्थानक ते काटाळे अशी राज्य परिवहन महामंडळाची नियमित एसटी बससेवा आहे. पालघरवरून टमटम, जीप, अॉटोरिक्षासुद्धा दिवसभर येत असतात.

संदर्भ

संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc