पडवळ (शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसॅंथेस ॲंग्विना ;

पडवळाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

कुळ Cucurbitaceae ( कुकुरबिटेसी )

इंग्रजी: Snake Gourd, स्नेक गोअर्ड वा गुअर्ड ;) ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ह्याला लक्षणीय अशा लांबलचक आकाराची फळे लगडतात. ही फळे भाजी म्हणून व त्याच्या औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. पडवळामुळे चाई (डोक्यावर जागो जागी टक्कल पडणे) व अन्य आजार बरे होतात. ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये प्रचलित असणाऱ्या डिजेरिडू या वाद्याच्या निर्मितीसाठीही पडवळांचा वापर होतो.

पडवळाची फळे सुमारे १५० सें.मी. लांबीपर्यंत वाढतात. त्यांच्या आत पांढुरक्या हिरव्या रंगाचा, मऊ, रसदार गर असतो. दक्षिण आशियातल्याआग्नेय आशियातल्या देशांमध्ये पडवळाच्या फळांचा वापर पाककृतींसाठी केला जातो. महाराष्ट्रातल्या घरांघरांत पडवळाची भाजी-कढी, बियांची चटणी वगैरे पदार्थ बनतात,

बाह्य दुवे

संपादन