तांबडा भोपळा ( वनस्पतीशास्त्रीय नाव:Cucurbita maxima; कुळ:Cucurbitaceae ;इंग्लिश:Pumpkin(पमकिन) ; हिंदी: कद्दू ;) ही वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या मोठया आकाराच्या फळाची भाजी वा भरीत करतात किंवा भोपळघारगे नावाचा गोड पदार्थही करतात.तसेच भोपळ्याची खीर ,पराठे, इत्यादि पदार्थ करतात.तसेच भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वांचा आहे. भोपळा एक स्थलीय, द्विबीपत्री झाड आहे. ज्याचे खोड लांब, कमजोर आणि हिरव्या रंगाचे असून खोडावर लहान कूसासारखे असते हे आपल्या आकषा द्वारे वाढतो व चढ़ताे. याचे पान हिरवे, आणि वृत्ताकार असतात. याचे फुले पिवळे रंगाचे नियमित आणि अपूर्ण घंटाकार असतात. नर आणि मादा पुष्प वेग वेगळे असतात व नर आणि मादा दोन्ही फुलात पाच जोडी बाह्यदल तसेच पाच जोडी पीवळे रंगाचे दलपत्र असतात. नर पुष्प मध्ये तीन पुंकेसर असतात ज्यातील दोन एक जोडी बनवून आणि तीसरा स्वतंत्र असतो. मादा पुष्प मध्ये तीन संयुक्त अंडप उपस्थित असतात ज्याला युक्तांडप म्हणतात. याचे फळ लंब अथवा गोलाकार असते. फळात अात खूप बी असतात. फळाचे वजन ४ ते ८ किलोग्राम पर्यंत असू शकते. सर्वात मोठी प्रजाति मैक्सिमा चे वजन ३४ किलोग्राम पेक्षा जास्त असते. हे संपूर्ण विश्व मध्ये लावले जाते. संयुक्त राज्य अमेरिका, मेक्सिको, भारत आणि चीन याचे सर्वात मोठे उत्पादक देश आहे. या झाडाचे वय एक वर्ष असते. हा पुष्टीदायक आहे. मोठ्या आजारानंतर शरीर क्षीण झाले तर, जेवणात भोपळा घेतला पाहिजे, काही दिवसांनी दौर्बल्य नाहीसे होते.

वेलीवरील भोपळा
भोपळयाचे फूल
भोपळयाच्या फोडी

पौष्टिक तत्वसंपादन करा

आहार विशेषज्ञांचे मत आहे की भोपळा हृदयरोगींसाठी अत्यंत लाभदायक आहे. तो कोलेस्ट्राल कमी करताे, हा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. तसेच पोटाच्या गड़बड़ी कमी करणारा आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करताे आणि अग्न्याशय ला सक्रिय करताे या मुळे चिकित्सक मधुमेह रूग्णांसाठी भोपळा खाण्याचे सल्ला देतात. याचे रस पण स्वास्थ्यवर्धक मानला जातो. भोपळ्यात मुख्यतः बीटा केरोटीन असते, ज्यामुळे विटामिन ए मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीन चे प्रमाण जास्त असते. भोपळ्या चे बी पण आयरन, जिंक, पोटेशियम आणि मैग्नीशियम चे चांगले स्रोत आहे. जग भरात याचा उपयोग केला जातो त्यामुळे २९ सप्टेंबर ला 'पंपकिन डे' म्हणून साजरा केला जातो.