इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक, भारत
ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. येथे ६ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे ८ गाड्या थांबतात.येथून १० रेल्वे गाड्यांची सुरुवात होते व १० रेल्वे गाड्या येथे टर्मिनेट होतात.हे रेल्वेचे नागपूर नागभीड नॅरो गेज मार्गावरील एक स्थानकही आहे. येथून कोराडीला एक फाटा जातो.[१]
ईतवारी जंक्शन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | ईतवारी, नागपूर |
गुणक | 21°09′28.4″N 79°07′10.3″E / 21.157889°N 79.119528°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३०५ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ITW |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
|
नागपूर शहरातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्थानकातून इतवारी टाटानगर पॅसेंजर गाडी निघते.
इतवारीहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
संपादन- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगड एक्सप्रेस
- शिवनाथ एक्सप्रेस[१]