इंटरस्टेट ८० तथा आय-८० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता कॅलिफोर्निया राज्यातील सान फ्रांसिस्को शहराला न्यू जर्सी राज्यातील टीनेक शहराला जोडतो. याचे पूर्वेचे टोक न्यू यॉर्क शहरापासून ४ मैल अंतरावर आहे. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्ग (आय-९० नंतर) आहे.

अमेरिका  राष्ट्रीय महामार्ग आय-८०
Interstate 80 map.png
लांबी ४,६६६.३६ किमी
सुरुवात सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया
मुख्य शहरे ओकलंड, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी, शायान, लिंकन, ओमाहा, दे मॉईन, टोलेडो, शिकागो (उपनगरांतून), क्लीव्हलॅंड (उपनगरांतून)
शेवट टीनेक, न्यू जर्सी
जुळणारे प्रमुख महामार्ग आय-५ (साक्रामेंटो, कॅलिफोर्निया)
आय-१५ (सॉल्ट लेक सिटी, युटा)
आय-२५ (शायान, वायोमिंग)
आय-२९ (काउन्सिल ब्लफ्स, आयोवा)
आय-३५ (दे मॉईन, आयोवा)
आय-७४ (डॅव्हेनपोर्ट, आयोवा)
आय-५५ (चॅनाहोन, इलिनॉय)
आय-६५ (गॅरी, इंडियाना)
आय-९० (लेक स्टेशन, इंडियाना-इलिरिया, ओहायो)
आय-७५ (रॉसफोर्ड, ओहायो)
आय-९५ टीनेक, न्यू जर्सी
राज्ये कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

हा महामार्ग २,८९९.५४ मैल (४,६६६.३६ किमी) लांबीचा असून तो कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.