टीनेक हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. बर्गन काउंटीतील हे शहर न्यू यॉर्क महानगराचा भाग समजले जाते. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,७७६ होती.

इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ९५ या महामार्गांचा तिठा टीनेकच्या हद्दीत आहे. इंटरस्टेट ८०चे पूर्वेकडील टोकही येथेच आहे.