रॉसफोर्ड अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. वूड काउंटीत असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ६,२९३ होती.

या शहराची स्थापना १८९८मध्ये एडवर्ड फोर्ड या उद्योगपतीने केली. आपली लिब्बी-ओवेन्स-फोर्ड ग्लास कंपनी बांधण्यासाठी त्याने मॉमी नदीकिनारी १७३ एकर जमीन खरेदी करुन तेथे कारखाना बांधला व घरे बांधून कामगारांना ती राहण्यास दिली.

आय-७५आय-८० या दोन महामार्गांचा तिठा रॉसफोर्डच्या हद्दीत आहे.