चॅनाहोन अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील छोटे शहर आहे. ग्रंडी आणि विल काउंट्यांमध्ये वसलेल्या या गावाची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १२,५६० होती. स्थानिक पोटॉटोमी भाषेत चॅनाहोनचा अर्थ पाण्यांचा संगम होतो.

इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ५५ या महामार्गांचा तिठा चॅनाहोनच्या हद्दीत आहे.