अँजेला मेर्कल

(आंगेला मेर्केल या पानावरून पुनर्निर्देशित)

आंगेला मेर्कल (जर्मन: Angela Merkel; १७ जुलै १९५४) ही जर्मनी देशामधील एक राजकारणी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाची नेता व जर्मनीची माजी चान्सेलर आहे. २००५ ते २०२१ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान चान्सेलरपदावर असलेली मेर्कल ही जर्मनीची पहिलीच महिला चान्सेलर आहे.

आंगेला मेर्कल

जर्मनीची चान्सेलर
कार्यकाळ
२२ नोव्हेंबर २००५ – ८ डिसेंबर २०२१
राष्ट्राध्यक्ष योआखिम गाऊक
मागील गेर्हार्ड श्र्योडर
पुढील ओलाफ शोल्झ

जन्म १७ जुलै, १९५४ (1954-07-17) (वय: ७०)
हांबुर्ग, पश्चिम जर्मनी
राजकीय पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन
सही अँजेला मेर्कलयांची सही

भौतिक रसायनशास्त्रामध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेली मेर्कल १९९० सालच्या जर्मनीच्या पुनःएकत्रीकरणानंतर मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्यामधून जर्मनीच्या संसदेवर निवडून आली. त्यानंतर तिने जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरणमंत्रालय इत्यादी खाती सांभाळली. २००५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून चान्सेलरपदावर आल्यानंतर मेर्कलने २००९ व २०१३ सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सत्ता राखली आहे.

मेर्कल युरोपियन संघामधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. २०१२ साली फोर्ब्ज मासिकाने मेर्कल जगातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य व्यक्ती असल्याचे नमूद केले. २००९ साली भारत सरकारने तिला जवाहरलाल नेहरू पुरस्कार बहाल केला. बरेच वेळा इतिहासकारांकडून मेर्कलची तुलना माजी ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचरसोबत केली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: