मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न (जर्मन: Mecklenburg-Vorpommern; इंग्लिश नाव: मेक्लेनबुर्ग-पश्चिम पोमेरेनिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र, पश्चिमेला श्लेस्विग-होल्श्टाइन, नैऋत्येला नीडरजाक्सन, दक्षिणेला ब्रांडेनबुर्ग तर पूर्वेला पोलंड देशाचा झाखोज्ञोपोमोर्स्का हा प्रांत आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न जर्मनीमधील आकाराने सहाव्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौदाव्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. श्वेरिन ही मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नची राजधानी तर रोस्टोक हे सर्वात मोठे शहर आहे.

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
Mecklenburg-Vorpommern
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी श्वेरिन
क्षेत्रफळ २३,१७४ चौ. किमी (८,९४८ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३०,०००
घनता ७१ /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-MV
संकेतस्थळ http://www.mecklenburg-vorpommern.eu
श्वेरिन किल्ला
Mecklenburg & Pomerania

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांनी ९ जुलै १९४५ रोजी मेक्लेनबुर्ग व पश्चिम पोमेरेनिया ही दोन स्वतंत्र राष्ट्रे एकत्रित करून ह्या राज्याची स्थापना करून त्याला पूर्व जर्मनीमध्ये सामील केले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नला परत राज्याचा दर्जा मिळाला.

उत्तर जर्मनीमधील इतर भागांप्रमाणे येथील कला व स्थापत्यावर हान्सेचा प्रभाव जाणवतो.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: