अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्थानक
अहमदाबाद जंक्शन (गुजराती: અમદાવાદ રેલ્વે સ્ટેશન) हे अहमदाबाद शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. गुजरातमधील सर्वात मोठे व वर्दळीचे असलेले अहमदाबाद स्थानक कच्छ, सौराष्ट्र इत्यादी भूभागांना भारताच्या इतर भागांसोबत जोडते.
अहमदाबाद भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | अहमदाबाद, गुजरात |
गुणक | 23°1′30″N 72°36′4″E / 23.02500°N 72.60111°E |
मार्ग |
अहमदाबाद-मुंबई मार्ग अहमदाबाद-गांधीधाम मार्ग अहमदाबाद-जयपूर मार्ग |
फलाट | १२ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ADI |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
अहमदाबादहून मुंबईकडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस, सयाजीनगरी एक्सप्रेस इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या अहमदाबादला मुंबईसोबत जोडतात. पुण्यासाठी अहमदाबादवरून अहिंसा एक्सप्रेस व दुरंतो एक्सप्रेस सुटतात.
दिल्लीकडे प्रवासासाठी अहमदाबादहून स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस, गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी जलद गाड्या उपलब्ध आहेत.