स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे गुजरातमधीलअहमदाबादच्याअहमदाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीमधीलनवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पश्चिम रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला तिरुवनंतपुरम ते दिल्ली दरम्यानचे ९४० किमी अंतर पार करायला १३ तास व ५० मिनिटे लागतात. राजधानी एक्सप्रेस शृंखलेमधील ही सर्वात उशिरा चालू केली गेलेली गाडी आहे. १९९७ साली अहमदाबाद-जयपूर मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर पूर्ण झाले. ह्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे (सुवर्णजयंती) पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ह्या गाडीला स्वर्णजयंती असे नाव देण्यात आले.