माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतश्रेणीतील एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे.ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी.दुर आहे. येथे पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी.रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरू शिखर हे या पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे.ते समुद्रसपाटीपासुन १७२२ मीटर उंच आहे.त्यास 'वाळवंटातले नंदनवन' असेही म्हणतात,कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. याचे प्राचिन नाव अर्बुदांचल असे आहे.

इतिहास

संपादन

पुराणात या क्षेत्राचा अर्बुदारण्य म्हणुन उल्लेख आहे.त्यामुळे 'अबु' हे सध्या असलेले नाव त्याचा अपभ्रंश आहे. असे मानतात कि वशिष्ठ ऋषि यांनी, विश्वामित्र ऋषींशी त्यांच्या मतभिन्नतेमुळे, या पर्वताच्या दक्षिण भागात आपला शेवटचा जीवनकाल घालविला.

पर्यटन आकर्षण

संपादन

माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मीपासून वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरू आहे. माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे. येथे अनेक जैन मंदिरे आहेत.येथील दिलवाडा मंदिर हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला अचलगढ हा किल्ला आहे.

नखी तलाव हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक हिंदू मंदिरे आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.गुरू शिखर पर्वताच्या टोकावर दत्तात्रेयाचे मंदिर पण आहे.माऊंट अबू वर विष्णूच्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, दुर्गा ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत.

कसे जाल?

संपादन

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे अबू रोड आहे जे माउंट अबू गावापासुन आग्नेयेस २७ कि.मी. वर आहे.ते दिल्ली पालनपूर अमदावाद या रेल्वेमार्गावर आहे.भारताच्या बहुतेक मुख्य शहरांना जाण्यासाठी येथे रेल्वेसेवा आहे

लोकसंख्या

संपादन

भारताच्या इ.स. २००१च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २२,०४५ येवढी आहे.