१७०६३/१७०६४ अजिंठा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज हैदराबादच्या सिकंदराबाद ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड ह्या स्थानकांदरम्यान धावते. सिकंदराबाद ते मनमाडदरम्यानचे ६२० किमी अंतर ही गाडी १२ तासांत पूर्ण करते.

17604 (सिकंदराबाद - मनमाड) अजिंठा एक्सप्रेस
अजिंठा एक्सप्रेस मार्गे

वेळापत्रक

संपादन
  • १७०६३ अजिंठा एक्सप्रेस मनमाडहून रात्री २१:०० वाजता निघते व सिकंदराबादला दुसऱ्या दिवशी सकाळी ८:५५ वाजता पोचते.
  • १७०६४ अजिंठा एक्सप्रेस सिकंदराबादहून संध्याकाळी १८:१० वाजता निघते व मनमाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:५५ वाजता पोचते.

थांबे

संपादन
स्थानक कोड स्थानक नाव अंतर (किमी)
MMR मनमाड
NSL नागरसोल २५
RGO रोटेगांव ५३
LSR लासूर ८०
CSN छत्रपती संभाजीनगर ११४
J जालना १७६
PTU परतूर २२१
SELU सेलू २४९
MVO मानवत रोड २६३
PBN परभणी २९१
PAU पूर्णा ३१९
NED नांदेड ३५०
MUE मुदखेड ३७०
UMRI उमरी ३९२
DAB धर्माबाद ४२२
BSX बासर ४३१
NZB निजामाबाद ४६१
KMC कामारेड्डी ५३१
MED मेडचल ५९३
BMO बोलारम ६०७
MJF मलकजगिरी ६१७
SC सिकंदराबाद ६२१

बाह्य दुवे

संपादन