हिंदू कालमापन

निःसंदिग्धीकरण पाने
(हिंदू काल गणना या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू कालमापनात कालगणना करण्याची नऊ माने सांगितली गेली आहेत.

  • ब्राह्म- ब्रह्मदेवाच्या आयुष्यावरून
  • दिव्य - देवांच्या वर्षादि मानावरून (देवांचे एक अहोरात्र = १ सौरवर्ष व ३६० अहोरात्र = १ दिव्य वर्ष)
  • पित्र्य -
  • प्राजापत्य -मन्वंतरगणनेवरून
  • बार्हस्पत्य - गुरू या ग्रहाच्या राशीसंक्रमण कालावरून
  • सौर - सूर्याच्या परिभ्रमणकालावरून
  • सावन - एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत एक दिवस मोजून त्याप्रमाणे
  • चांद्र - चंद्रभ्रमण, तिथी इत्यादींवरून
  • आर्क्ष - नक्षत्रे, तारका इत्यादींवरून

यापैकी मनुष्यास उपयुक्त अशी चार माने आहेत-

  • सावन
  • सौर
  • चांद्र
  • नाक्षत्र

सौरवर्ष सौरमास चांद्रमास इत्यादींवरून ही कालगणना होते.

४,३२,००० या संख्येस ४,३,२,१ या संख्यांनी गुणले असता क्रमाने येणाऱ्या संख्येइतक्या सौरवर्षांची कृत युग(१७२८००० सौरवर्षे), त्रेता युग(१२९६००० सौरवर्षे), द्वापर युग(८६४००० सौरवर्षे), व शेवटी कलि युग(४३२००० सौरवर्षे) अशी चार प्रकारची युगे होतात.

या उपरोल्लेखित युगांची एकत्र बेरीज केली असता येणाऱ्या संख्येच्या सौरवर्षांएवढे 'महायुग' असते.

मन्वंतर गणना

संपादन

या प्रकारे ७१ महायुगे झाल्यावर एक मन्वंतर होते.

कल्प गणना

संपादन

४,३२,००,००,००० सौर वर्षांचे एक कल्प होते. हे १००० महायुगांबरोबर आहे.

ब्रह्मदेवाचा दिवस

संपादन

ब्रह्मदेवाच्या अहोरात्र मध्ये ८,६४,००,००,००० इतकी सौरवर्षे होतात. ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य १०० वर्षे इतके कल्पिलेले आहे. या कालास 'महाकल्प' म्हणतात. त्यानुसार ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य ३१,१०,४०,००,००,००,००० इतकी सौरवर्षे आहे.[ संदर्भ हवा ]

कलि युगातील शककर्ते

संपादन

वर्तमान कलियुगाचा प्रारंभ १७ फेब्रुवारी इसवी सनापूर्वी ३१०२ या रोजी झाला असे समजतात.[ संदर्भ हवा ]त्यानुसार त्याच्या प्रारंभापासून ३०४४ वर्षे युधिष्ठिर शक,त्यानंतर १३५ वर्षे उज्जयनीतील विक्रमाचा शक, नंतर, पैठणच्या राजाचा शालिवाहन शक वगैरे.

पहा : संवत्सर