समुद्रमंथन
समुद्रमंथन ही एक पौराणिक संकल्पना आहे.[१][२]
समुद्र मंथन एक प्रसिद्ध हिंदू धार्मिक आख्यायिका आहे. भागवत पुराण, महाभारत आणि विष्णू पुराणात आहे.[३]
चौदा रत्ने
संपादन- लक्ष्मी- विष्णूपत्नी
- कौस्तुभ मणी- श्रीविष्णूने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.
- कल्पवृक्ष पारिजात वृक्ष (कल्पद्रुम) प्राजक्ताचे झाड.[४]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).
- सुरा वारुणी- दैत्यांचे मादक पेय[५] ,दारू, मद्य [४]
- धन्वंतरी (देवांचे वैद्यराज)
- चंद्रदेव(चंद्रमा)[५] शिवाने मस्तकात धारण केले.
- कामधेनू-इच्छापूर्ती करणारी गाय.
- ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
- रंभा- मेनका, इत्यादी अप्सरागण.
- उच्चैःश्रवा- सात तोंडे असलेला घोडा.सुर्यदेवाचे वाहन.[५]
- हलाहल विष- कालकूट विष[६] वा शिवाने प्राशन केले .
- हरिधनु वा शारंग धनुष्य - भगवान विष्णूचा धनुष्य आहे.
- शंख - श्रीविष्णूचा पांचजन्य शंख आहे.
- अमृत-देवांचे पेय.
रामायण आणि महाभारत पुराणानुसार इतर रत्न
संपादनपुराण पासून पुराण पर्यंत भिन्न आहे आणि रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधेही किंचित वेगळी आहे.[७][८]
- कल्पवृक्ष ,
- पांचजन्य शंख ,
- ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी)
(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].[९]
पौराणिक कथा
संपादनभागवत पुराण, महाभारत आणि विष्णू पुराणात ही कथा आणि श्लोकांच उल्लेख आढळते
एकदा ,दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माला दिली. ह्या वेळी ऐरावत हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला ऐरावत हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून
ऐरावत हत्तीच्या पायांखाली तुडविली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, " तुझ वैभव नष्ट होईल ! " या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निःष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरू शुक्राचार्य ह्यांच्यापाशी संजीवनी विदया होती. त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवांकडे मात्र अशा प्रकारची विदया नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली.त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला.देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. पण मंदारचलच्या खाली आधार नसल्याने, समुद्रात बुडायला लागला.[१०] ते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म (कासव) कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन तयार झाले.[११]
वासुकी नागाच्या मुखाकडे दानव आणि शेपटीकडे देव होते, पुन्हा पुन्हा वासुकी नागाला पकडून ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि विषाचे धूर बाहेर आले. विषाचा धूर सर्वत्र पसरले देव-दानवांना त्रास होऊ लागला,[१२] विषाचा धूराने ढग तयार होऊन पर्जन्यवृष्टीतुन समुद्रात पडले. 'हलाहल' नावाचा भयंकर विष समुद्रात बाहेर येऊन मिसळले. मग सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली.शंकरने तळहातावर घेऊन विष पिले, परंतु घशातून खाली येऊ दिले नाही, आणि त्या विषाच्या परिणामामुळे शिवाचा गळा निळा झाला, म्हणून महादेवाना 'नीलकंठ' म्हणले जाऊ लागले. विषपान करताना काही विष पृथ्वीवर पडले होते, ज्याचा अंश आजही आपल्याला विषारी साप, विंचू आणि कीटकांमध्ये दिसते.[१३] यानंतर ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी)[१४][१५] समुद्र मंथनातून जन्म झाला.
लिंगमहापुराणानुसार आणि पद्मपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. दुःसह मुनि तिच्याशी लग्न केलं .
मग पुन्हा समुद्र मंथन सुरू झाले.हळू हळू समुद्र मंथनातून कामधेनू[१३] नावाची सुरभी गाय प्रकट झाली, ती अग्नियज्ञासठी सामग्री उत्पन्न करणारी होती महर्षि वसिष्ठ व सर्व ऋषींनी यज्ञकार्यासाठी तिला ग्रहण केले.आणि आता पशुपालन मानवाने दूध, दही, घी,लोणी तयार करून उपजीविकेचे साधनासाठी.
- 'ऐरावत' नावाचा शुभ्र आठ सोंडे चार दात असलेला हत्ती प्रकट झाले, इंद्राला प्राप्त झाले.ऐरावतला 'अभ्रमातंग', 'ऐरावण', 'अभ्रभूवल्लभ', 'श्वेतहस्ति', 'मल्लनाग', 'हस्तीमल्ल', 'सदादान', 'सुदामा', 'श्वेतकुंजर', 'गजाग्रणी' आणि 'नागमल्ल' अशी इतर अनेक नावे आहेत. '[१६] उच्चैःश्रवा ("तीक्ष्ण कानांचा") नावाचा ७ शिर असलेला शुभ्र उडणारा घोडा प्रकट झाला.उच्चैःश्रवा सूर्यदेवाचे वाहन बनला.[१७][१८]
- मग कल्पवृक्ष(पारिजात)) नावाचा वृक्ष प्रकट झाले.[१९]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).काही लोक कल्पवृक्ष वा कल्पद्रुम संस्कृत भाषेच्या उत्पत्तीशी जोडतात आणि काहींना असे वाटते की याला कल्पवृक्ष म्हणतात. तर काहीजण म्हणतात की पारिजातकवृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात.[१३]रंभा नावाची अप्सरा देवांगना,हिंदू पुराणांनुसार स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय अप्सरा होत्या.
- नंतर देव वरुणाची पत्नी,वारुणी देवी यांची उत्पत्ती झाली तिचा हातात सुरा अर्थात मदिरा होते ते स्वीकार दानव असुरांने केला.[२०] वारुणी असे नाव देण्यात आले. वरुण म्हणजे पाणी. पाण्यापासून उत्पत्ती झाल्यामुळे, तिला वारुणी म्हणले गेले. तेथे असुरांच्या बाजूने वरुण नावाचा एक देव आहे.[१३]
- नंतर देव - दानव लवकरात समुद्र मंथन करु लागले.समुद्र मंथनातून 'कौस्तुभ मणी' उत्त्पन झाले भगवान विष्णूंनी आपल्या गळात वा हृदयावर धारण केलेले रत्न होते.
- कौस्तुभ मणी भक्तीचे प्रतिक आहे.[२१]हरिधनु (शारंग धनुष्य) - भगवान विष्णूचा धनुष्य आहे.विष्णूच्या इतर शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र, नारायणशास्त्र, वैष्णवशास्त्र, कौमोदकी आणि नंदक तलवार यांचा समावेश आहे.आणि त्याचबरोबर पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून 'शंख'तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे.[२२] विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले.·[२३][२४]
- समुद्र मंथनातून तेजस्वि प्रकाश व श्वेतवर्णी 'चंद्रदेवाचा' जन्म झाला. ज्याला भगवान शिवाने आपल्या मस्तकावर धारण केले.
- देव-दानवांनी समुद्र पुन्हा धुसळले,समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या आहे.ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज,तेजस्विनी,सुन्दर होती.
देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले . लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. विवाह संपूर्ण झाले.
- समुद्र मंथनातून सर्वांत शेवटी श्याम वर्ण, चतुर्भुज देव धनवंतरी सुवर्ण अमृत कलशांसह प्रकट झाले.[२५]
हे पाहून दानव चकीत झाले,"राक्षसांनी धन्वंतरीच्या हातातून अमृतकुंभ पळवून नेले त्याकरिता विष्णूंना देवदानव भांडण करताना दिसले. दुर्वासाचा शापामुळे ,देवांना शक्ती नव्हती ते राक्षसांशी लढू शकतील,सुवर्ण अमृतकुंभ घेऊ शकतील, म्हणून ते निराश झाले .देवांचा नैराश्य पाहून भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. मग विश्वमोहिनीचे रूप ती नवीन तरुण मुलगी आपल्याकडे येताना पाहिली, तेव्हा त्यांनी सर्व भांडण विसरले आणि त्या सुंदर मुलीकडे पाहू लागले, हे पाहून, राक्षस आणि देवता, असुर स्वरभानु (राहू/केतु, कामदेवाला भस्म करणारे भगवान शंकरदेखील मोहित झाले आणि पुन्हा पुन्हा मोहिनीकडे पाहिले.जेव्हा विश्वमोहिनीच्या रूपाने विष्णू म्हणाले, "हे देवता आणि राक्षस! महर्षि कश्यप यांची मुले असल्याने तुम्ही दोघे भाऊ-भाऊ आहात, तरीही तुम्ही एकमेकांशी भांडता. मी एक स्वेच्छाचारिणी स्त्री आहे. ज्ञानी लोक अशा स्त्रीवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवता?," सर्वांनी एकत्रितपणे अमृतपान केले हे चांगले आहे. "[३] मोहिनी देवांना आणि दैत्यांना अमृत वाटप करताना; त्याचवेळी असुर स्वरभानु, दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही थोडं अमृत प्रासन करताना सूर्य आणि चंद्राने विष्णूला(मोहिनी) या कृत्याची माहिती दिली ते ओळखले कि तो स्वरभानु (राहू/केतु) [२६] आहे ;रागाने मोहिनीने स्वरभानु (राहू/केतु) अमृत पितानाच सुदर्शनचक्राने शिरच्छेद केला, स्वरभानुचे (राहू/केतु)अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले .ब्रह्मदेवांनी राहूला सर्पाचे शरीर दिले आणि केतूला सर्पाचे डोके दिले आणि ’छायाग्रह’ बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो.[२७] या कारणमुळे अवकाशात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते.[२८][२९] शेवटी अमृत पिऊन देव अमर झाले. त्यांना राक्षसांवरील युद्धात जय मिळाला.
श्लोक
संपादनसमुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांचा निर्देश पुढील श्र्लोकात आढळतो. हा श्लोकहिंदू विवाहविधीत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकात समाविष्ट आहे.
लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकसुराधन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधा: सुरेश्वरगजो रंभादिदेवाङ्गना: ॥
अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङ्खोऽमृतं चांबुधे: ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् ॥[३०]
(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].[९]
●लक्ष्मी ●कौस्तुभ(मणी) ●पारिजातक व कल्पवृक्ष ●रंभा(अप्सरा) ●धन्वंतरी(विष्णू अवतार) ●चंद्रदेव ●कामधेनू(गाय) ●ऐरावत(हत्ती) ●उच्चैःश्रवा (घोडा) ●हलाहल (विष) ●अमृत ●शंख ●धनुष्य(विष्णू अवतारांसाठी) ●सुरा(वारुणी)[३१]
भागवत पुराणातील चौदा रत्नाचे संस्कृत श्लोक
संपादनभागवत पुराणातील संस्कृत श्लोक
संपादन- श्रीमद् भागवत पुराण अष्टमः स्कंधः सप्तमोऽध्यायः[३२]
श्रीशुक उवाच -
ते नागराजमामंत्र्य फलभागेन वासुकिम् ।
परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमब्धिं मुदान्विताः ॥ १ ॥
आरेभिरे सुसंयत्ता अमृतार्थे कुरूद्वह ।
हरिः पुरस्तात् जगृहे पूर्वं देवास्ततोऽभवन् ॥ २ ॥
संस्कृत शब्दांचे अर्थ- कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठा परीक्षित राजा - मुदान्विताः - आनंदित झालेले - ते - ते देव व दैत्य - फलभागेन - फळांतील भाग देऊ करून - नागराजं वासुकिं - सर्पाचा राजा जो वासुकि त्याला - आमन्त्र्य - बोलावून - (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून - तस्मिन् - त्या - गिरौ - पर्वतावर - परिवीय - गुंडाळून - अमृतार्थं - अमृताकरिता - सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे - अब्धिं (मथितुं) - समुद्राचे मंथन करण्यास - आरेभिरे - आरंभ करिते झाले - हरिः - श्रीविष्णू - पूर्वं - प्रथम - पुरस्तात् - पुढच्या बाजूस - जगृहे - धरिता झाला - ततः - त्याच्या मागोमाग - देवाः - देव - अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. (१-२)
मराठी समश्लोकी [३३]
परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या ।
अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥
नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥
अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले ।
अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥
देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥
मराठी समश्लोकी ---श्री मद्भागवताच्या स्कंध ८ वा - अध्याय ७ वा अध्याय १.२
मराठी भाषांतरातला विष्णूदास वसिष्ठ यांचा समश्लोकी अनुवाद.
- श्रीमद् भागवत पुराण अष्टमः स्कंधः पञ्चमोऽध्यायः[३४]
पयोधिं येन निर्मथ्य सुराणां साधिता सुधा ।
भ्रममाणोऽम्भसि धृतः कूर्मरूपेण मन्दरः ॥ १० ॥
येन - ज्याने - पयोधिं - समुद्राला - निर्मथ्य - मंथून - सुराणां - देवांना - सुधा - अमृत - साधिता - मिळवून दिले - अंभसि - उदकात - भ्रममाणः - फिरणारा - मंदरः - मंदरपर्वत - कूर्मरूपेण - कूर्मरूपाने - धृतः - उचलून धरिला. ॥१०॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला. (१०)
मराठी समश्लोकी-समुद्र मंथिला त्यांनी देवांना ती दिली सुधा । कच्छरूप धरोनीया मंदराचल पेलिला ॥ १० ॥
श्रीमद् भागवत पुराण अष्टमः स्कंधः अष्टमोऽध्यायः[३५]
- कौस्तुभाख्यमभूद् रत्नं पद्मरागो महोदधेः ।
तस्मिन्मणौ स्पृहां चक्रे वक्षोऽलङ्करणे हरिः ॥ ५ ॥
महोदधेः - महासागरातून - कौस्तुभाख्यं - कौस्तुभ नावाचे - पद्मरागः - पद्मराग जातीचे - रत्नं - रत्न - अभूत् - उत्पन्न झाले - हरिः - विष्णू - वक्षोऽलङकरणे तस्मिन् मणौ - वक्षस्थलावर भूषणाप्रमाणे शोभेल अशा त्या रत्नाविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला. ॥५॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. (५)
मराठी समश्लोकी- कौस्तूभ मणि हे रत्न निघाले सागरी पुन्हा । अजिते इच्छिले त्याला सदैव हृदयास तो ॥ ५ ॥
- ततोऽभवत् पारिजातः सुरलोकविभूषणम् ।
पूरयत्यर्थिनो योऽर्थैः शश्वद्भुवि यथा भवान् ॥ ६ ॥
ततः - नंतर - सूरलोकविभूषणं - देवलोकांचा अलंकार झालेला - पारिजातः - पारिजात वृक्ष - अभवत् - उत्पन्न झाला - यथा - जसा - भुवि - पृथ्वीवर - भवान् - तू परीक्षित राजा - यः - जो - शश्वत् - नित्य - अर्थैः - पदार्थांनी - अर्थिनः - याचकांच्या इच्छा - पूरयति - पूर्ण करितो. ॥६॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. तू ज्या पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. (६)
मराठी समश्लोकी- पारिजात पुन्हा आला सुरलोक विभूषणो । इच्छिता सर्व जो देई जसे देता तुम्ही जगा ॥ ६ ॥
- ततश्चाप्सरसो जाता निष्ककण्ठ्यः सुवाससः ।
रमण्यः स्वर्गिणां वल्गु गतिलीलावलोकनैः ॥ ७ ॥
ततःच - त्यानंतर आणखी - निष्ककण्ठयः - सुवर्णपदके गळ्यात आहेत ज्यांच्या अशा - सुवाससः - सुंदर वस्त्रे नेसलेल्या - वल्गुगतिलीलावलोकनैः - सुंदर गमन, क्रीडापूर्वक अवलोकन ह्यांच्या योगाने - स्वर्गिणां - देवांना - रमण्यः - रमविणाऱ्या - अप्सरसः - अप्सरा - जाताः - उत्पन्न झाल्या. ॥७॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. (७)
मराठी समश्लोकी- वस्त्रालंकार लेवोनी निघाल्या अप्सरा पुन्हा । पाहता चालता युक्त देवांना सुख देत ज्या ॥ ७ ॥
- ततश्चाविरभूत्साक्षात् श्री रमा भगवत्परा ।
रञ्जयन्ती दिशः कान्त्या विद्युत् सौदामनी यथा ॥ ८ ॥
ततःच - त्यानंतर आणखी - साक्षात् श्रीः - प्रत्यक्ष संपत्ती - यथा - ज्याप्रमाणे - सौदामनी - सुदामा पर्वतावर उत्पन्न झालेली - विद्युत् - वीज - कान्त्या - कांतीने - दिशः - दिशांना - रञ्जयन्ती - शोभविणारी - भगवत्परा - भगवंताविषयी निष्ठा आहे जिची अशी - रमा - लक्ष्मी - आविरभूत् - प्रगट झाली. ॥८॥
संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ति लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. (८)
मराठी समश्लोकी- मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा । भगवत्शक्ति जी नित्य जिचे तेज विजे परी ॥ ८ ॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणांच नराधिपम् ॥ १०-२७ ॥
संदर्भित अन्वयार्थ-अश्वानाम् = घोड्यांमध्ये, अमृतोद्भवम् = अमृताच्यासह उत्पन्न होणारा, उच्चैःश्रवसम् = उच्चैःश्रवा नावाचा घोडा, गजेन्द्राणाम् = श्रेष्ठ हत्तींमध्ये, ऐरावतम् = ऐरावत नावाचा हत्ती,च = तसेच, नराणाम् = मनुष्यांमध्ये, नराधिपम् = राजा, माम् = मी आहे असे, विद्धि = तू जाण ॥ १०-२७ ॥
अर्थ
घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. ॥ १०-२७ ॥
कुंभमेळा आख्यायिका
संपादनविष्णूने उरलेले अमृत आपले वाहन असलेल्या गरुडाकडे दिले आणि त्याला ते देवलोकी सुरक्षित ठेवण्यास सांगितले. गरुड देवलोकात अमृताचा कुंभ नेत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले. ज्या ठिकाणी ते अमृत सांडले त्या ठिकाणांना पुराणात तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. त्या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो.[३८]
विष्णू पुराणातल्या[३९] एका कथेनुसार एकदा देवांचा राजा इंद्र कोठूनतरी वैकुंठ लोकाला परत येत होता. त्याचवेळी दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. दुर्वास ऋषींनी हत्तीवर बसलेल्या इंद्राला पहिले आणि त्याला विष्णू समजून त्याच्या दिशेने एक फुलांची माळ फेकली. परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या इंद्राने ती माळ हत्तीच्या डोक्यावर फेकली. हत्तीने डोके झटकून ती माळ जमिनीवर पाडली आणि ती त्याच्या पायाखाली आली. दुर्वास ऋषींनी हे पाहिले, ते संतप्त झाले आणि त्यांनी इंद्राला 'तुझे सर्व वैभव नष्ट होऊन समुद्रात पडेल आणि तुझे दानवांशी युद्ध होऊन त्यात तू हरल्यावर स्वर्गाचे राज्य गमावशील' असा शाप दिला. आपले वैभव नष्ट झाल्यावर इंद्रदेव इतर सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले वैभव परत मिळण्यासाठी काय करावे याचा सल्ला विचारला. विष्णूने समुद्रमंथन करून संपूर्ण वैभव परत मिळवावे आणि सागरमंथनातून अमृत प्राप्त करून घेऊन त्याचा उपभोग करावा असा मार्ग सुचवला. त्यानंतर मंदार पर्वताच्या शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करू लागले. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) मंदार पर्वताची रवी करून समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल पर्वत उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले. सर्वानी समुद्रदेवाला सांगितले की, "आम्ही तुझे मंथन करणार आहोत." तेव्हा समुद्रदेव म्हणाले, "जर तुम्ही मलाही अमृतातील हिस्सा द्याल तर मी मंथनाचे कष्ट सहन करीन." तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आणि समुद्रमंथन सुरू झाले. या प्रकारे देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. वासुकी नागाच्या मुखाकडील बाजूस दैत्य आणि शेपटीकडील बाजूस देव होते. पुन्हा पुन्हा वासुकी नाग ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि धूर बाहेर येई. त्या धुराने ढग तयार होऊन ते ढग थकलेल्या देवांवर पर्जन्यवृष्टी करू लागले. पर्वतावर झाडांच्या घासल्या जाण्यामुळे आग लागली. तेव्हा भगवान इंद्रानी पर्जन्यवृष्टी करून पर्वत शांत केला. वृक्षांचे दूध आणि औषधी रस समुद्रात आले. औषधांच्या अमृतासमान रस आणि दूध व सुवर्णयुक्त मंदाराचलावरील मणी यांच्या एकत्रीकरणाने पावन झालेल्या जलाला स्पर्श केल्याने देवांना अमरत्व प्राप्त होऊ लागले. त्या संमिश्रणाने समुद्राचे पाणी दूध बनले. त्या दुधापासून तूप तयार झाले. सुरुवातीला याच समुद्रमंथनातून विष हलाहल निर्माण झाले होते. भगवान ब्रह्मदेवच्या विनंतीवरून भगवान शंकरदेवाने ते विष प्राशन केले. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले.[४०] त्यानंतर देव - दानवांनी अजून जोराने मंथन केले. त्यावेळी समुद्रातून अगणित किरणांचा व शीतल प्रकाशी व श्वेतवर्णी असा प्रकट झाला. चंद्रानंतर देवी लक्ष्मी आणि अप्सरा रंभा, सुरा (वारुणी) यांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी श्वेतवर्णी उच्चैःश्रवा घोडा निर्माण झाला. भगवान नारायणांच्या वक्षावर सुशोभित होणारा उज्ज्वल कौस्तुभमणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनु गाय व कल्पवृक्ष, पारिजातक तयार झाले. लक्ष्मी, सुरा, चंद्र आणि उच्चैःश्रवा हे सर्व आकाशातून देवलोकी गेले. त्यानंतर हाती अमृतचा कमंडलू घेऊन विष्णू अवतार देव धन्वंतरी प्रकट झाले.[४१] हा चमत्कार बघून दानवांमध्ये 'हे माझे, हे माझे' असा गोंधळ झाला. त्यानंतर चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती निर्माण झाला. त्यास व उचैःश्रवा याला इंद्राने घेतले. अमृत आणि लक्ष्मी या दोघांच्या प्राप्तीसाठी दानवांमध्ये फूट पडली. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून दानवांकडून अमृत घेतले आणि ते देवतांना दिले. देवतांनी ते अमृत प्राशन केले. तेव्हा केतू व राहूसुद्धा देवतांचे रूप धारण करून अमृत पिऊ लागले. अमृत राहूच्या कंठापर्यंत गेले असता चंद्रदेव आणि सूर्यदेव यांनी राहूचे खरे रूप उघड केले. लगेचच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले. ते पृथ्वीवर पडून तडफडू लागले. तेव्हापासूनच त्यांचे सूर्य व चंद्राबरोबर वैमनस्य राहिले. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यावेळी भगवान विष्णूंचे आणि नारायण अशी दोन्ही रूपे दिसू लागली. सुदर्शन चक्राने दानव कापले जाऊ लागले. तेव्हा दानव हे पृथ्वीत आणि समुद्रात लपले. देवांचा विजय झाला. मंदाराचलाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले गेले. देवांनी मुख्यतः भगवान विष्णूने व इंद्राने सुरक्षिततेसाठी भगवान गरुडाकडे अमृत दिले.[१]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ यादी
संपादन- ^ a b Chandak, Kanhaiya Lal (2010-01-01). Bharatiya Sanskriti Ke Aadhar Granth (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788188267958.
- ^ Varadpande, Manohar Laxman (2009). Mythology of Vishnu and His Incarnations (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788121210164.
- ^ a b "समुद्र मन्थन". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-09-05.
- ^ a b "समुद्र मंथन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ a b c "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "कालकूट". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2015-08-22.
- ^ Astrologer. "Samudra Manthan-churning of the ocean and its gifts- milky way". AstroPeep.com (इंग्रजी भाषेत). 2013-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "Samudra manthan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-27.
- ^ a b "समुद्रमंथन". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-10 रोजी पाहिले.
- ^ Deepak. "समुद्र मंथन की कथा और उसके पीछे छिपा जीवन का उपदेश". Hindu Gods, मंत्र and Vrat Katha - Nav Hindu (इंग्रजी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "समुद्रमंथन". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "पुराण कथा: समुद्र मंथन कथा". पुराण कथा. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ a b c d जोशी 'शतायु', अनिरुद्ध. "Samudra Manthan | समुद्र मंथन से प्राप्त चौदह रत्नों का रहस्य, जानिए". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "अलक्ष्मी". विकिपीडिया. 2019-08-21.
- ^ "लक्ष्मी की बड़ी बहन दुर्भाग्य की देवी ज्येष्ठा देवी को अपने घर से रखें दूर नहीं तो…". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "ऐरावत - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "सूर्य वंदना". fr-fr.facebook.com (फ्रेंच भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "उच्चैःश्रवा". विकिपीडिया. 2019-09-06.
- ^ "कल्पवृक्ष". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "चौदा रत्ने". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "समुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ | कौस्तुभ मणी". web.bookstruck.in (इंग्रजी भाषेत). 2021-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "समुद्र मंथन में से निकले थे ये 14 रत्न, जानिये इन रत्नों के पीछे छिपे अर्थ - Live India". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ "जानें समुद्र मंथन से प्राप्त चौदह रत्न कौन से थे". Jagranjosh.com. 2019-09-10 रोजी पाहिले.
- ^ "शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?". www.timesnowmarathi.com. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-10 रोजी पाहिले.
- ^ "धन्वन्तरि". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2020-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-10 रोजी पाहिले.
- ^ "राहु - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2019-09-02 रोजी पाहिले.
- ^ "श्रीमद् भागवत पुराण - अष्टमः स्कन्धः - अध्याय ९ वा". satsangdhara.net. 2019-09-15 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ नवभारतटाइम्स.कॉम. "2019 Surya grahan science and myth: सूर्यग्रहण को लेकर क्या कहते हैं धर्म और विज्ञान". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2019-09-02 रोजी पाहिले.
- ^ "विष्णु". विकिपीडिया. 2019-09-04.
- ^ "पान:छन्दोरचना.djvu/35 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ Sutton, Komilla (1999-01-20). Essentials of Vedic Astrology (इंग्रजी भाषेत). The Wessex Astrologer. ISBN 978-1-902405-79-7.
- ^ "श्रीमद् भागवत पुराण - अष्टमः स्कंधः - सप्तमोऽध्यायः". satsangdhara.net. 2020-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण - स्कंध आठवा - अध्याय ७ वा". satsangdhara.net. 2020-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "श्रीमद् भागवत पुराण - अष्टमः स्कंधः - पञ्चमोऽध्यायः". satsangdhara.net. 2020-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "श्रीमद् भागवत पुराण - अष्टमः स्कंधः - अष्टमोऽध्यायः". satsangdhara.net. 2020-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-15 रोजी पाहिले.
- ^ "श्रीमद् भगवद्गीता | Gita Supersite". www.gitasupersite.iitk.ac.in. 2019-09-09 रोजी पाहिले.
- ^ hariom. "अध्याय १० – श्लोक २७". The Gita Marathi (इंग्रजी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ MURTY, SUDHA (2018-04-01). GARUDJANMACHI KATHA. Mehta Publishing House. ISBN 9789387789722.
- ^ Wilson, Horace Hayman (1840). The Vishńu Puráńa: A System of Hindu Mythology and Tradition (इंग्रजी भाषेत). J. Murray.
- ^ Gokhale, Namita (2008-09). Shiv Mahima (Hindi) (हिंदी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-400146-0.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Sacitra Āyurveda (हिंदी भाषेत). Ṡrī Baidyanātha Āyurveda Bhavana. 1998.