सदस्य चर्चा:Tiven2240/धूळपाटी-मुखपृष्ठ
@Mahitgar:@V.narsikar:@अभय नातू:@Rahuldeshmukh101:
आता पर्यंत झालेले कामात काही सुजाव/तक्रार खाली नोंदवे. छायाचित्र तसे व्हिडिओही मराठीवर असो याकरिता @संतोष दहिवळ: याना संदेश दिला आहे. @Nitin.kunjir: यांनी विराट कोहली लेखात सुधारणा केली आहे याला सादर मान्य द्यावे अशी आशा. मुखपुष्ठात जर नवीन काय असेल तर त्याची कल्पना द्यावे.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:०६, १ मार्च २०१७ (IST)
- @Mahitgar:@V.narsikar:@अभय नातू:@Rahuldeshmukh101:@Nitin.kunjir:@संतोष दहिवळ:
- नवीन बद्दल केली आहेत जर कामात काही सुजाव/तक्रार खाली नोंदवे अशी विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३८, २ मार्च २०१७ (IST)
- तुमच्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद.
- वरवर निरीक्षण केल्यावर दिसलेल्या गोष्टी -
- १. रंग भडक दिसत आहेत. सौम्य रंगसंगती आकर्षक असते
- २. आपणास जे जे ठावें, ते इतरांसी सांगावे, शहाणे करोनी सोडावे, सकलजन. हे येथील ब्रीदवाक्य बदलून ज्ञान ही शक्ती आहे असे बदलू नये.
- अभय नातू (चर्चा) १९:१३, २ मार्च २०१७ (IST)
- काळ्या पृष्ठभूमीवरील चित्र व अक्षरे नीट दिसत नाहीत. पृष्ठभूमी लाईट रंगात हवी असे वाटते.तसेच काळा रंग हा अधोगतीचा / निषेधाचा निर्देशक आहे असे माझे मत आहे. भारताच्या ध्वजाचीही पृष्ठभूमी काळ्या रंगात नको असे वाटते.बाकी लूक बरा वाटत आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १५:२५, ७ मार्च २०१७ (IST)
रंगसंगती
संपादनकाही सूचना --
१. नवीन मांडणीमधील रंगसंगती भडक दिसत आहे. उठून दिसणे व भडक असणे यांत फरक आहे आणि आत्ता येथे असलेले रंग दुसऱ्या प्रकारात मोडतात. तरी सौम्य रंगाची निवड करण्याची विनंती.
२. पानावरील रंगसंगती एकाच पॅलेटमधील असावेत. पिवळा, निळा, पोपटी, असे रंग केल्याने पान डोळ्यांस सुसह्य होत नाही. कोणताही रंग निवडला तरीही पानावरील वेगवेगळे विभाग त्याच्याच variationमध्ये असावेत.
३. सारख्या विभागांचे रंग जवळजवळचे असावेत, उदा. सहाय्य विषयक विभाग, लेखांची/वर्गांची/दालनांची यादी असलेले विभाग, सदरे, इत्यादि. असे असताही संपूर्ण पानावर एकच पॅलेट असावा (#२ पहा)
३. आत्ता येथे कार्यरत असलेले सदस्य ही नवीन सांख्यिकी जरूर ठेवावी.
४. सोशल नेटवर्किंग स्थळांचे दुवे हे अधिकृत खात्यांकडे निर्देशित आहेत का?
५. स्वागत संदेशाचा आकार छोटा करावा. यात रिअल एस्टेट वाया जात आहे. मुखपृष्टाचा मुख्य उद्देश स्वागत करणे हा नसून महत्वाचे विभाग प्रस्तुत करणे आहे. या निळ्या पट्टीतील मजकूराच्या वरची, खालची रिकामी जागा घालवावी.
६. या पानावर भारताच्या झेंड्याची गरज नाही. ठेवावयाचाच असल्यास आकार छोटा करावा. विकिपीडिया हा कोणा एका देशापुरता नसून संपूर्ण जगासाठी आहे.
७. लेखांची अक्षरवार यादी (०-९, अ, आ, इ,....) घालवावी. याची उपयुक्तता आता उरली नाही.
८. त्याच्या खालची पट्टीही घालवावी. तेथील जवळजवळ सगळे दुवे डावीकडे आहेतच.
९. दालनांच्या यादीवरील रंगाच्या पट्ट्यांचे सुसूत्रीकरण करुन त्यात काहीतरी लॉजिक आणावे.
१०. शक्य तितक्या कमी जागेत जास्तीत जास्त माहिती (गिचमिड न करता) कशी घालता येईल याचा अभ्यास करुन मगच मुखपृष्ठाची पुनर्बांधणी करावी.
इतर जसे दिसेल/सुचेल तशा नोंदी करेन.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:२६, ३१ मार्च २०१७ (IST)
- वरिल सर्व बिंदू पटातात. शिवाय,
- भारताचा झेंडा नसावा.
- दालनांच्या यादीमध्ये शक्यतो धर्माशी निगडीत दालने मुखपृष्ठावर नकोत. अमुक क व तमुक का नाही यावर उगाच वाद नको.
- मुखपृष्ठमथळ्याच्या आणि मासिक सदरामध्ये जे चित्र आहे, ते कृपया काढावे.
- मुखपृष्ठ फारच लांब आहे. मी स्वतः, 'आपणास हे माहीत आहे का?' या सेक्शन खाली कधी स्क्रोल करत नाही. काही सेक्शन काढून टाकू शकतो का? संक्षिप्त सूची संक्षिप्त करयची गरज आहे.
- मासिक सदर व उदयोन्मुख लेख याची लांबी कमी करू शकतो.
- @Tiven2240: क्र. ५ बदल कराल का? लगेच पडताळायला सोपे होईल. मी तुमच्या सदस्य पानात बदल करू इच्छित नाही. - प्रबोध (चर्चा) ०१:२५, २९ एप्रिल २०१७ (IST)
@Prabodh1987: कसे करावे सुचत नाही जर तुम्हाला ठाऊक असेल तर करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:१३, २९ एप्रिल २०१७ (IST)
- @Tiven2240: साचा:मुखपृष्ठ सदर व साचा:उदयोन्मुख लेख सदर यांची तुमच्या सदस्य नामविश्वात कॉपी तयार करा. धूळपाटी-मुखपृष्ठ या तुमच्या पानामध्ये नवे साचे टाका. - प्रबोध (चर्चा) ०१:४२, ३ मे २०१७ (IST)
सिंटॅक्स
संपादन@टायवीन, तुमच्या या पानाचा सिँटॅक्स बहुधा ब्रेक झाला आहे. तो नीट केल्यास लक्षात घेण्यास सोपे जाईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा)
@Mahitgar:सर ते विडिओ मध्ये गडबड आहे यासाठी मी चर्चापानावर संदेश टाकला आहे परंतु जवाब नाही आला. ते आजचा विडिओची साईझ कमी केली की मग सर्व बरोबर सर्व्ह होणार--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:३८, २१ एप्रिल २०१७ (IST)