Pravin solaskar
![]() |
Pravin solaskar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Pravin solaskar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,९१५ लेख आहे व १३७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
सोळस्कर आणि शाकाहारीत्व
संपादनएक पद्धत पूर्वापार आहे. कधीपासून आहे याची काही आम्हालाही कल्पना नाही. संपूर्ण गाव हे शाकाहारी आहे. गावातील एकही घर मांसाहार करीत आता काही मुलं शिकून नोकरी- धंद्यासाठी शहरात गेली आहेत. शहरातील रीतिरिवाजही वेगळे असतात. आपण जेथे जातो तेथल्या परंपरेप्रमाणे राहावं लागतं. कदाचित काही मुलं हरात गेल्यावर तेथेच राहत असल्यामुळे मांसाहार करीत असावेत. पण असं कोणी केल्याचं अजून तरी कानावर आलेलं नाही. जो पगडा लहान वयात असतो त्यामुळे त्याप्रमाणेच जडणघडण होते. तरी सर्वांना हे जमेलच असे नाही. दुसरं एक कोडं मलाही पडलं आहे. यामागे हेतू काय असावा. सगळ्या गावावर त्याचा प्रभाव कसा पडला. ज्या मुली बाहेर दिल्या जातात, त्याही त्या घराचा रीतिरिवाज काहीही असला तरी मांसाहार करीत नाहीत. लग्न ठरतानाच याची बरीच चर्चा होते. या कारणासाठी काही वेळा सोयरीकही मोडली आहे. आता एखादी प्रथा पडल्यानंतर ती काही अशी सहजासहजी मोडत नाही. ज्या मुली लग्न होऊन गावी येतात, त्या त्याच्यापूर्वी परंपरेप्रमाणे काही मांसाहारही करीत असतात. पण गावी लग्न होऊन आल्यावर कोणीही आजवर मांसाहार केल्याचं उघड झालेले नाही. आता असा काही सगळ्यांवर दंडक नाही. तसे कोणाचे बंधन नाही. तरीही रूढी सुरू आहे.
प्रवीण भिकोबा सोळस्कर
नमस्कार,
आपले विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी पानावरील लेखन संपादन पाहीले. आपल्या प्राथमीक सहाय्यार्थ सोळशी गाव आणि सोळस्कर (आडनाव) हे मराठी विकिपीडियाच्या कक्षेत बसू शकेल अशा मजकुराचे दोन लेख बनवले आहेत. साहाय्य पानावर लेखाचा विस्तार कसा करावा? या बाबत प्राथमीक मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल. खेडी आणि गावांबाबत मराठी विकिपीडियावरील लेखन शैलीची चौगाव या लेखावरूनही आपणास कल्पना येण्यास मदत व्हावी असे वाटते.
विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी येथील आपल्या लेखनाचा काही भाग आख्यायिका + संदर्भ उपलब्ध नसलेली आपली व्यक्तीगत मते असा आहे. दुजोरा मिळण्याची शक्यता नसलेले अथवा संदर्भ नसलेले आणि व्यक्तीगत मतांचा अंतर्भाव असलेला लेखनाचा भाग मराठी विकिपीडियाच्या कक्षेत (परिघात) बसणार नाही. (मराठी विकिपीडियात दुसऱ्यांची मते स्वत:च्या शब्दात ज्याचे मत आहे त्याच्या संदर्भासहीत लिहावे लागते, स्वत:ची मते लिहिता येत नाहीत). मराठी विकिपीडियाच्या कक्षेत न बसू शकणारा संदर्भ उपलब्ध नसलेला आपल्या व्यक्तीगत मतांचा भाग इतर मराठी संकेतस्थळे जसे की मायबोली, मनोगत, मिसळपाव संकेतस्थळ, ऐसी अक्षरे, मराठीमाती किंवा अशाच इतर संस्थळावरून प्रकाशित करण्याचे अधिक उत्तम पर्याय आंतरजालावर उपलब्ध असू शकतील.
- मराठी विकिपीडियावरील लेखात आपण जेव्हा जेव्हा लेखन संपादन कराल तेव्हा आपले सदस्य नाव लेखाच्या इतिहासात आपोआप नोंदवले जाते. मराठी विकिपीडियाच्या लेखात लेखक आपली नावे नोंदवत नाहीत परंतु आपापसात चर्चा करताना संवाद साधण्याच्या सोईच्या दृष्टीने सदस्य नाव नोंदवले जाते. कोणत्याही केस मध्ये मोबाईल क्रमांक आणि व्यक्तीगत संपर्क पत्ता देण्याचे टाळावे.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०१:५९, १ जून २०१५ (IST)