नमस्कार,

लता मंगेशकर यांच्या लेखावर आपण जागोजागी "बोल्ड फॉन्ट"चा वापर केलेला दिसतो. माझ्या माहितीत इतर लेखांमध्ये अशी सगळीकडे बोल्ड अक्षरे वापरली जात नाहीत. आपणांस विनंती आहे, की आपण हे बदल काढून टाकावेत.

धन्यवाद. --अमर राऊत (चर्चा) १८:०२, ६ फेब्रुवारी २०२२ (IST)

धन्यवाद साहेब मार्गदर्शन केल्याबद्दल. मी नक्कीच हे लक्षात ठेवेन. Omkar Jack १९:४७, ६ फेब्रुवारी २०२२ (IST)

आपले लिखाणसंपादन करा

नमस्कार, असे दिसून येत आहे की आपण विकिपीडियावर विविध लेख आहे तसे उतरवत आहात. एक तर विश्वकोशीय लिखाण आणि लेखांमध्ये खूप फरक असतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे लेख विनापरवानगी कॉपी करत आहात.

विनंती आहे, हे त्वरित थांबवावे. - अमर राऊत (चर्चा) १८:५८, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)

चुक् झाली साहेब. माफ करा. पुन्हा असे चुकिचे नाही करणार. Omkar Jack १५:५३, १ मार्च २०२२ (IST)

कार्यशाळासंपादन करा

मराठी विकिपीडिया वर सद्या २ कार्यशाळा महिला महिना अंतर्गत, विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२२विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ चालू आहे. --Tiven2240 (चर्चा) १९:५७, १४ मार्च २०२२ (IST)

द काश्मीर फाइल्ससंपादन करा

नमस्कार, कृपया नोंद घ्यावी की इंग्रजी विकिपीडियावरील मजकूर भाषांतरित करताना शुद्धलेखन तपासणे आवश्यक आहे. तसेच तेथील संदर्भ देखील कॉपी पेस्ट करावी लागतात. यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, तिथे पण कुणीतरी विकिपीडियाला अपेक्षित नसलेलं लिखाण करत असते. जे आपण इकडे भाषांतरित करतो. पण काही वेळात किंवा काही दिवसांनी तेथून ते उडवलेले असते. त्यामुळे भाषांतरीत करताना तेथून योग्य तेच उचलावे, इतकंच अपेक्षित आहे. बाकी तुम्हाला विकिपीडियावर लिखाणाचा अनुभव असल्यामुळे इतर काही सांगत नाही. पुढील लेखनास शुभेच्छा.- संतोष गोरे ( 💬 ) १०:०२, १९ मार्च २०२२ (IST)

ठिक आहे साहेब, मी भाषांतर करताना हे लक्षात ठेवेन. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. Omkar Jack १०:११, १९ मार्च २०२२ (IST)
वर लिहिल्याप्रमाणे इंग्लिशमधून भाषांतर करताना शुद्धलेखन, व्याकरण आणि प्रतिशब्द यांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तुम्ही तयार केलेल अनेक लेख या निकषांनुसार तद्दन कमी प्रतीचे ठरतात.
योग्य ते बदल कराल ही आशा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:४३, ६ एप्रिल २०२२ (IST)
सर, मी सध्या लॅपटॉप वर मराठी टायपिंग शिकत आहे त्यामुळे अनेकदा भाषांतर केलेले परिच्छेद लॅपटॉप वर सुधारणे कठीण जाते व ती संपादने अशुद्ध राहतात; मी जेव्हा मोबाईल संपादन करेन तेव्हा ज्या चुका आधी केल्या आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. Omkar Jack १२:१५, ९ एप्रिल २०२२ (IST)