शिंकान्सेन (新幹線?) ही जपान रेल्वे ने चालवलेली जपान मधील अतिउच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रणाली आहे. ताशी २१० कि.मी. (१३० मैल) या वेगाने धावणारी पहिली शिंकान्सेन - तोकाइदो शिंकान्सेन - १९६४ साली कार्यान्वयित करण्यात आली. आजच्या दिवसाला, एकूण २,४५६ कि.मी. (१,५२८ मैल) एवढ्या अंतराचे जाळे असलेली शिंकान्सेनची प्रणाली जपानच्या Honshu (होन्शू) आणि Kyushu (क्यूशू) या बेटांवरील जवळ जवळ सर्व मुख्य शहरांना जोडते. भूकंप आणि टायफून (वादळे) प्रवण प्रदेश असून सुद्धा शिंकान्सेन प्रणालीतील गाड्या ताशी ३०० कि.मी. (१८५ मैल) पर्यंतच्या वेगाने धावतात. परीक्षणाच्या वेळेस, परंपरागत रुळांवर धावणाऱ्या गाड्यांनी १९९६ साली ताशी ४४३ कि.मी. (२७५ मैल) ची वेगमर्यादा गाठली, तर आधुनिक मॅगलेव्ह तंत्रज्ञानावर आधारित गाड्यांनी २००३ साली ताशी ५८१ कि.मी. (३६१ मैल) एवढी वेगमर्यादा गाठून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

३०० (डाविकडे) व ७०० मालिकेतील शिंकान्सेन तोकयो स्टेशनवर
शिंकान्सेन ५०० मलिका, क्योतो स्टेशन मार्च २००५

जपानी भाषेत शिंकान्सेन या श्ब्दाची अशी फोड होते - शिन्‌ (Shin) अर्थात नवीन, कान्‌ (Kan) अर्थात मुख्य (Trunk), सेन्‌ (Sen) अर्थात मार्गिका - जो रुळांच्या मार्गिकेला संबोधतो तर त्यावरून धावणाऱ्या गाड्याना अधिकृतरीत्या "Super Express" - 超特急 - चोऽतोक्क्यू) म्हणतात. परंतु खुद्द जपानम्ध्येदेखील हा भेदभाव न करता शिंकान्सेन या शब्दाने सर्व प्रणालीला संबोधले जाते. शिंकानसेन प्रणालीतील गाड्यांच्या मार्गिका स्टॅण्डर्ड गेज मापाच्या आहेत. अतिवेगाने धावता यावे म्हणून शिंकान्सेनचे मार्ग जेवढे आणि जिथे जमतील तिथे सरळ ठेवण्यात आले आहेत आणि वळणांची वक्रता जेवढी कमी ठेवता येईल तेवढी कमी ठेवण्यात आली आहे. सरळ मार्ग आखण्यासाठी डोंगरांमधून बोगदे आणि दऱ्यांवर वायाडक्ट (पूल) बांधण्यात आले आहेत. बहुतांशी हे मार्ग जनिनीपासून एक ते दोन मजले उंचीवरून जातात. अशा पद्धतीने शहरांमधील रस्ते, इतर रेल्वे मार्ग, घरे, शेते इत्यादींचा अडथळा टाळण्यात आला आहे.


हेही पाहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: