क्युशू शिनकान्सेन (जपानी: 九州新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. २००४ सालापासून कार्यरत असलेला व २५७ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग पश्चिम जपानमधील फुकुओकाकागोशिमा ह्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच सॅन्यो शिनकान्सेन मार्गाद्वारे फुकुओकापासून ओसाका तसेच तोक्यो शहरांपर्यंत प्रवास करता येतो.

सॅन्यो शिनकान्सेन
८०० प्रणालीची शिनकान्सेन गाडी
स्थानिक नाव 九州新幹線
प्रकार शिनकान्सेन
प्रदेश जपान
स्थानके १२
कधी खुला २००४
चालक क्युशू रेल्वे कंपनी
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी २५६.८ किमी (१६० मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग २६० किमी/तास
मार्ग नकाशा

प्रमुख शहरे

संपादन

क्युशू शिनकान्सेन मार्ग जपानच्या क्युशू प्रदेशातील फुकुओका, सागा, हिरोशिमा, कुमामोतोकागोशिमा ह्या राजकीय विभागांमधून धावतो व जपानमधील खालील प्रमुख शहरांना जोडतो.

इ.स. २०२२ मध्ये नागासाकी शहर क्युशू शिनकान्सेन मार्गाला जोडले जाईल.

इंजिन व डबे

संपादन

आजच्या घडीला क्युशू शिनकान्सेनवर ६ डबे असलेल्या ८०० प्रणालीच्या रेल्वेगाड्या वापरण्यात येतात. हिताची कंपनीने बनवलेल्या ह्या गाडीचा कमाल वेग २६० किमी/तास इतका आहे.

बाह्य दुवे

संपादन