क्युशू
(क्यूशू या पानावरून पुनर्निर्देशित)
क्युशू (जपानी: 九州, नऊ प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या नैऋत्येला व शिकोकू बेटाच्या पश्चिमेला वसले आहे.
क्युशू | |
---|---|
| |
क्युशू बेटाचे स्थान | पूर्व आशिया |
क्षेत्रफळ | ३५,६४० वर्ग किमी |
लोकसंख्या | १,३२,३१,९९५ |
देश | जपान |
फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकूण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी फुकुओका, सागा, कुमामोतो, नागासाकी, ओइता, कागोशिमा व मियाझाकी हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर ओकिनावा प्रभाग हा रूकू द्वीपसमूहामधील एका बेटावर वसला आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |