लेन्ट

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १५:४६, ६ फेब्रुवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)



चाळीस दिवसांची यातनामय वारी

या लेख http://navshakti.co.in/prarthana/parisar/43506/ येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(फेब्रुवारी २०१७)



दिनांक 22 फेब्रुवारी (बुधवार) पासून ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट म्हणजेच 40 दिवसांचा उपवास काळ सुरू झाला आहे. आपण सारे या जगातील घडी दोन घडीचे प्रवासी आहोत. हे जीवन आपल्याला उसने मिळाले आहे. आपण इथले स्थलांतरीत नाही आहोत. आपण केवळ इथले तीर्थकरी नि वारकरी आहोत. मरताना आपण सोबत काही नेत नसतो. पण आपलं प्रेम, आपल्या आशा आणि जगताना प्रकट केलेला चांगुलपणा आपण या जगात सोडून ठेवून जात असतो. या सार्यांचे भान राखण्यासाठी आणि मृत्युपूर्वी देवपुत्र येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस भोगलेल्या यातनामय काळाचे स्मरण करण्याचे हे दिवस होत. राखेच्या बुधवारच्या दिवशी चर्चमध्ये भावपूर्ण प्रार्थनासोहळा आयोजित केला जातो. धर्मगुरू राखेच्या साह्याने भाविकांच्या कपाळावर क्रूसाची खूण काढतात व त्यांना उपवासकाळाचे स्मरण करून देतात. या काळात भाविकजण छानछौकीचा नि आपल्या आवडीनिवडीचा त्याग करतात व ख्रिस्ताठायी आपली श्रद्धा व्यक्त करतात. या काळात प्रत्येकजण चांगली व्यक्ती म्हणून वागून देवाच्या जास्त जवळ जावी, हे अभिप्रेत असते. खरंतर ही प्रक्रिया दरदिवशी नि सातत्याने व्हायला हवी असते.गुडफ्रायडेच्या (ख्रिस्तमरणाच्या) एक आठवडा आधी `पाम संडे’ मानला जातो. या दिवशी श्रद्धानंत मंडळी चर्चमध्ये मिस्साच्या प्रार्थनेला जाताना सोबत माडाच्या झावळ्याच्या पात्या घेऊन जातात. येशू ख्रिस्त `सुवार्ता’ प्रसारासाठी जाई तेव्हा तेव्हाचे त्याचे भक्तगण या झावळ्यांच्या पात्या उंचावून त्याचे स्वागत करीत.

चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी आशीर्वादीत केलेल्या या पात्या ख्रिस्ती लोक घरी आणतात व त्याचे क्रूस तयार करून घरात टांगवून ठेवतात. वर्षभरात सुकून गेलेल्या त्या पात्यांच्या क्रूसांची जाळून राख केली जाते व ती `ऍश वेनेस्डे’ म्हणून पाळल्या जाणार्या दिवशी वापरली जाते व त्या दिवसापासून उपवास काळाला प्रारंभ होतो. येशू मरणातून (राखेतून) उठला, त्याचे हे सारे विधी प्रतिक असतात. तसेच, `तू मातीतून जन्मलास नि मातीत मिळणार आहेस’ (ठशाशालशी rंहरीं rंर्ही रीं र्वीं रपव र्वीं rंर्ही ाrहरश्रश्र-ाrर्शींप) ह्या बायबलमधल्या वचनाचेसुद्धा भाविकांना स्मरण करून देण्यात येते. राखेला इंग्रजीत अडक म्हणतात व त्या शब्दातून ध्वनीत होणारा गर्भितार्थ असा ःअ म्हणजे रललशrिंरपलश (स्वतःचा कमीपणा, न्युनत्त्व मान्य करणे)ड म्हणजे ाrाrऊाrाrशपवशी (शरण जाणे)क म्हणजे र्हालश्रशपशी (परमेश्वरापुढे लीन होणे)या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिस्ती धर्मियांकडून त्याग, मनन, सत्कार्ये यांची अपेक्षा असते. हा काळ प्रार्थना आणि उपवासात घालवायचा असतो. ख्रिस्ती भाविकांनी हा काळ सतत बायबलचे वाचन करण्यात घालवावा, असा धर्मगुरू उपदेश करतात. `क्रूसाची वाट’ ही या काळातील महत्त्वपूर्ण घटना असते.

क्रूसावर टांगून मारला जाण्याआधी येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर त्याच क्रूसाचे जड ओझे देण्यात आले होते व त्या ओझ्याखाली पडत, अडखळत नि चाबकाचे फटके खात आणि डोक्यावरील काटय़ाच्या मुकुटामुळे होणार्या वेदना सहन करीत ख्रिस्ताने ती वाट पार केली होती. `तू राजा आहेस ना’, अशी त्याची चेष्टा करीत तेव्हाच्या रोमन सम्राटाच्या सैनिकांनी त्याला `कंटक किरीट’ ल्यायला लावून सुशोभित केले होते. मानवी असीम क्रूरतेचा तो काळा इतिहास पुन्हा पुन्हा आठवून भाविक मंडळी देवपुत्राने मानवतेच्या कल्याणासाठी भोगलेल्या वेदनांचे आणि केलेल्या त्यागाचे स्मरण करीत असतात. या चाळीस दिवसात भाविक एकवेळेचे जेवण घेतात व उपास पाळतात. त्या काळातील रविवारचे दिवस मात्र उपासासाठी समाविष्ट नसतात. तो प्रत्येक रविवार एक प्रकारचा `मिनी ईस्टर’चा दिवस असतो. (ईस्टर हा दिवस ख्रिस्ताच्या पुनरुत्स्थानाचा दिवस होय.) मांस-मच्छी न खाणे, दारू न पिणे, केसदाढी वाढविणे; अशी काही पथ्ये श्रद्धाळू मंडळी उपासकाळात पाळत असतात.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले