शीव टेकडी किल्ला

मुंबई शहरातील किल्ला
Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १५:२८, ३० जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)


माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रिवा किल्ला व सायनचा किल्ला, हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले.

या लेखातील मजकूर http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Sion_Fort-Trek-S-Alpha.html येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(जानेवारी २०१७)



External Wall of Sion Fort

पहाण्याची ठिकाणे

सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत २ तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायर्‍यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शीवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्‍या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.

पोहोचण्याच्या वाटा

मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूस उतरुन डाव्या हाताच्या फूटपाथने ३ मिनिटे चालल्यावर पूर्वद्रुतगती महामार्ग येतो. हा महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्ष उभे असलेला रस्ता लागतो. ह्या रस्त्याने २ मिनिटातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले