भविष्यार्थता आणि वार्तांकनीय कालसापेक्षता उदाहरणार्थ काल आज उद्या,गेल्यावर्षी,यावर्षी,पुढच्यावर्षी,गेल्या/हा/येता आठवडा,होईल टाळावी
हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/1
विश्वकोश संकल्पना
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चूका करत असत्तात ते नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/2
हवे होते अपेक्षा, विकिपीडिया आणि सहप्रकल्प परीघ
प्रथम, हे लक्षात घ्या विकिपीडिया स्वयं-प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला देते, तसा विकिपीडिया लेखन संकेत आहे
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) विकिक्वोट्स या विकिपीडियाच्या सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्डूलिपी) आणि स्रोत इत्यादी तसेच त्यांची भाषांतरे करिता विकिस्रोत मध्ये देता येते,
तुम्हाला शैक्षणिक पुस्तकांचे गाईड मार्गदर्शक किंवा असे करावे असे करू नये स्वरूपातील नवे प्रताधिकारमुक्त पुस्तकीय लेखन , नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता विकिबुक्स मध्ये अंतर्भूत करता येते.
एखाद्या शब्दाचे अर्थ व्यूत्पत्ती इत्यादी सांगणारे लेखन बहूभाषी डिक्शनरी विक्शनरीसहप्रकल्पात करता येते, बातम्यांकरिता विकिन्यूज, चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन विकिस्पेसिज नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
तर विकिबुक्स,अवतरणांच्या संचयाकरिता विकिक्वोट्स,
विकिपीडियाच्या समन्वय सहप्रकल्पांचा परीघ
विकिमिडीया फाउंडेशन तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकि हे निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे करतेमिडीयाविकि संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.
तुम्ही मिडीयाविकि सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/3
विकिपीडिया अनुदिनी(ब्लॉग) अथवा आगामी कार्यक्रम लिहिण्याची जागा नव्हे. अधिक माहिती
- अनुदिनी,आगामी कार्यक्रम माहिती किंवा इतर विकिपीडिया किंवा तिच्या कोणत्याही सहप्रकल्पाच्या कक्षेत न सामावली जाणारी माहिती करिता इतर मराठी संकेतस्थळे पहावी. मराठी विकिपीडियन लोकांना उद्देशून संपर्क करावयाचा असेल तर mr-wiki याहू ग्रूप आर्कूट किंवा फेसबूकवरील ग्रूप किंवा गूगल sms वापरावे.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/4
विकिपीडियात स्वयं-प्रसिद्धी टाळा, संबधीत विकिपीडिया लेखन संकेत पाळा
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच करते.सदस्य स्वतःचे इतरत्र झालेले लेखन, छायाचित्र प्रताधिकारमुक्त करणार असतील तर त्याचेसुद्धा स्वागत आहे.
परंतु विकिपीडियातील माहितीची विश्वकोशिय विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करू नयेत अथवा करवून घेऊ नये.लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.
मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
एखाद्या लेखातून आपले प्रताधिकारीत/बौद्धीक संपदा लेखन/छायाचित्र अनवधानाने समाविष्ट झाले असल्यास तो मजकुर आपण स्वतःहून वगळू शकता व तशी संबंधीत चर्चा पानावर नोंद करू शकता.
व्यक्ती/संस्थाविषयक एखादा मजकुर, संदर्भ न देता बदनामी करणारा आढळल्यास त्याची नोंद संबधीत चर्चा पानावरकरून असा मजकुर वगळण्याची विनंती इतर सदस्यांना संबधीत चर्चा पानावर आणि विकिपीडिया:चावडीवर करावी.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/5
विकिपीडीया लेखातून लेखाच्या वाचकास संबोधन करणारे -मीत्रांनो,वाचकहो,वाचकांना, तुम्ही/आपण तुम्हाला/आपणास शब्द टाळा.
चर्चा पानांवर विकिपीडिया सुधारण्याच्या दृष्टीने होणार्या संपर्क/समन्वया पुरते आवश्यक तेथेच हे शब्द मर्यादित ठेवावेत
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/6
विकिपीडीया लेखातून अविश्वकोशिय प्रमाणपत्र आणि वार्तांकन करणारे -आढळते/आढळतो/आढळून आले , दिसते, दिसून येते शब्द टाळा.
टाळावयाची अविश्वकोशिय प्रमाणपत्रे/वार्तांकन उदाहरणे
मर्यादित प्रमाणात संदर्भासहीत( ह्यांनी असे म्हटले,या पुस्तका प्रमाणे) असे लेखन चालू शकते.पण स्वतःची प्रमाणपत्र विशेषणे आणि दुषणे देऊ नयेत.
- टाळावयाची अविश्वकोशिय प्रमाणपत्रे/वार्तांकन उदाहरणे
- प्रसिद्ध आहे (अगदीच आवश्यक असेल तर परिचीत/ज्ञात शब्द वापरावेत)
- यामुळे त्या विभागांची गोडी अधिक वाढलेली दिसते
- खास, आकर्षण
- ग्रामीण भागात, खास करून जत्रा किंवा आठवडे बाजारात, हे चित्र आपणांस हमखास बघावयास मिळते.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/7
विकिपीडियातील लेखन म्हणजे समुपदेशन किंवा सल्ला नव्हे
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/8
विकिपीडीया लेखातून अनेक,खूप,जगभरात,अखिल विश्वात इत्यादी अतीरंजन आणि subjectivity शब्द/वाक्यप्रयोग टाळा
अतीरंजन आणि subjectivity उदाहरणे
- शांततेचा संदेश देत/दिला पुरेसे आहे अखिल (जग)विश्वाकरिता असला तरी अतीरंजन होते म्हणून टाळावा
- जगभर अनुयायी आहेत.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/9
अलंकृत लेखन आणि विशेषणांचा वापर शब्द/वाक्य प्रयोग टाळावेत. अधिक माहितीकरिता
विकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश आहे.जो की, शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो, ते पुढे संदर्भ देण्याकरिता. त्या करिता माहिती निव्वळ वस्तुनिष्ठ (फॅक्टस) असावी लागते. अलंकृत भाषा आणि विशेषणांच्या वापराने बर्याचदा वाचक, तो लेख किंवा विकिपीडिया एखाद्या व्यक्तिचा किंवा गटाचे समर्थन करते(soft corner), असे समजू शकतो आणि लेखाची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका असतो आणि विश्वासार्हता धोक्यात येण्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता बळावते.
प्रत्येक वाचक स्वत:चे मत स्वत: बनवण्यास समर्थ असतो. अधिकात अधिक विश्वासार्ह माहिती वाचकास पुरविल्यास त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो.
बर्याचदा स्वतःच्या लेखनातील अलंकृतता स्वतःस टाळणे अवघड जाते याकरिता इतरांच्या लेखनातील अलंकृतता/विशेषणे वगळण्यास/वाक्यांचे पुर्नलेखन करण्यास सहकार्य करा.
खरोखरीच, प्रसिध्द्,अतिसुन्दर, रमणीय, अगदी,सर्वोत्तम, अत्युच्च, महान,
सर्वोत्तम, अत्युच्च, महान, थोर, परमपूज्य, लोकहृदयसम्राट
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/10
विकिपीडिया हे कोणत्याही संस्थेचे तक्रार निवारण केंद्र नाही.अशा विनंत्या टाळाव्यात
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/11
व्यक्तीगत इमेलवर माहिती मिळण्याची शक्यता कमी असते.अशा विनंत्या टाळाव्यात.अशा विनंत्या करिता इतरमराठी संकेतस्थळे पहा
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/12
लेख कसे असु नयेत
- विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
- विकिपीडियातील लेख छापील ज्ञानकोशाप्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
- विकिपीडियातील लेख हा शब्दकोश नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश येथे आहे.
- विकिपीडिया लेख हे मूळ संशोधन किंवा पहिलेच संशोधन असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीन विचार पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
- विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
- विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.
- विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या-निवारण जागा नाही.
- विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
- नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची यादी नाही.
- दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
- विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
- विकिपीडियातील लेख ऐतिहासिक संदर्भातील तज्ञ इतिहास संशोधकांना मान्य होईल अशी माहिती देतात पण ते काल्पनिक/भावनिक इतिहासवर्णन किंवा कथाकथन करत नाहीत.
- आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
- विकिपीडियातील लेख वार्तांकन नाहीत, पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
- हे व्यक्ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
- दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
- चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
- विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
- आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
- पाठ्यपुस्तक नाही.
- ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
- संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
- विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
- विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्तिपरत्वे व्यक्तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. विकी धोरणांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/13
विकिपीडियावरील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम अनुसरून असावे.
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/14
भविष्यार्थता आणि वार्तांकनीय कालसापेक्षता उदाहरणार्थ काल आज उद्या,गेल्यावर्षी,यावर्षी,पुढच्यावर्षी,गेल्या/हा/येता आठवडा,होईल टाळावी
विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/15
लिखाण तृतीय पुरूषी अकाल्पनिक व वस्तुनिष्ठ असावे
- प्रथमपुरूषी मी-आम्ही-आपले-आपण, द्वितीय पुरूषी तू-तुम्ही-आपण-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखांच्या पानातून असू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.)
- लेखन अलंकारिक नसावे आणि विशेषणे, व्यक्तिगत तर्क/मते, कथाकथने, वर्णने, वार्तांकने वा स्तुती-प्रौढी,सल्ले विरहित असावे.