विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/2
प्रथम, हे लक्षात घ्या विकिपीडिया स्वयं-प्रसिद्धी टाळण्याचा सल्ला देते, तसा विकिपीडिया लेखन संकेत आहे
बरेच लोक कथा कविता पुस्तके इत्यादी बद्दल पृच्छा करित असतात. कोणतेही प्रकाशित साहित्य किंवा साहित्यिका बद्दल त्रोटक समालोचन/समीक्षणात्मक माहिती तुम्हाला संबधीत वैश्वकोशिय लेखात मराठी विकिपीडियातच उपलब्ध करता येईल किंवा तशी अपेक्षा व्यक्त करता येईल. लेखकाची किंवा लेखातील प्रसिद्ध वाक्ये (काव्ये नव्हे) विकिक्वोट्स या विकिपीडियाच्या सहप्रकल्पामध्ये अंतर्भूत करता येतील. अप्रताधिकारीत म्हणजे copyright free मुळदस्तावेज कथा कविता लेख पुस्तके इत्यादी साहीत्य (पाण्डूलिपी) आणि स्रोत इत्यादी तसेच त्यांची भाषांतरे करिता विकिस्रोत मध्ये देता येते,
तुम्हाला शैक्षणिक पुस्तकांचे गाईड मार्गदर्शक किंवा असे करावे असे करू नये स्वरूपातील नवे प्रताधिकारमुक्त पुस्तकीय लेखन , नवीन पुस्तकांच्या निर्मीतीकरिता विकिबुक्स मध्ये अंतर्भूत करता येते.
एखाद्या शब्दाचे अर्थ व्यूत्पत्ती इत्यादी सांगणारे लेखन बहूभाषी डिक्शनरी विक्शनरीसहप्रकल्पात करता येते, बातम्यांकरिता विकिन्यूज, चित्र छायाचित्र ध्वनी आणि चलचित्रमुद्रीका आणि इतर फाईल्सच्या संचयाकरिता विकिकॉमन्स इत्यादी सहप्रकल्पांसोबतच विकिमिडीया फाऊंडेशन विकिस्पेसिज नावाचा जैवकोशाचा पण कणा आहे.
तर विकिबुक्स,अवतरणांच्या संचयाकरिता विकिक्वोट्स,
विकिमिडीया फाउंडेशन तिच्या संकेतस्थळांच्या सुसूत्रीत व्यवहाराच्या दृष्टीने मेटाविकि हे निती नियमावलींचे चर्चा व नियमन करते, दुरगामी व्यूहरचनेची योजना प्रस्ताव व त्यावरील चर्चा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे करतेमिडीयाविकि संकेतस्थळावरून सॉफ्टवेअर डेव्हलपर लोकांचे व वापरणार्यांचे कार्य चालते तर विकिमिडीया फाउंडेशनचे स्वत:चेपण संकेतस्थळ आहे जेथे प्रवेश मर्यादित स्वरूपातच उपलब्ध केला जातो. मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आणि सॉफ्टवेअर संबधीत सूचना आणि तक्रारींची दखल बगझीला येथे घेतली जाते.
तुम्ही मिडीयाविकि सॉफ्टवेअर स्वत:चे मराठीतील स्वतंत्र संकेतस्थळ घडवण्याकरितासुद्धा वापरू शकता अथवा चक्क या सॉफ्टवेअरच्या डेव्हेलपमेंटमध्ये सहभाग घेऊ शकता.