विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य विकिपरिघ सजगता/4
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच करते.सदस्य स्वतःचे इतरत्र झालेले लेखन, छायाचित्र प्रताधिकारमुक्त करणार असतील तर त्याचेसुद्धा स्वागत आहे.
परंतु विकिपीडियातील माहितीची विश्वकोशिय विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करू नयेत अथवा करवून घेऊ नये.लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.
मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
एखाद्या लेखातून आपले प्रताधिकारीत/बौद्धीक संपदा लेखन/छायाचित्र अनवधानाने समाविष्ट झाले असल्यास तो मजकुर आपण स्वतःहून वगळू शकता व तशी संबंधीत चर्चा पानावर नोंद करू शकता.
व्यक्ती/संस्थाविषयक एखादा मजकुर, संदर्भ न देता बदनामी करणारा आढळल्यास त्याची नोंद संबधीत चर्चा पानावरकरून असा मजकुर वगळण्याची विनंती इतर सदस्यांना संबधीत चर्चा पानावर आणि विकिपीडिया:चावडीवर करावी.