लिखाण तृतीय पुरूषी अकाल्पनिक व वस्तुनिष्ठ असावे
- प्रथमपुरूषी मी-आम्ही-आपले-आपण, द्वितीय पुरूषी तू-तुम्ही-आपण-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखांच्या पानातून असू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.)
- लेखन अलंकारिक नसावे आणि विशेषणे, व्यक्तिगत तर्क/मते, कथाकथने, वर्णने, वार्तांकने वा स्तुती-प्रौढी,सल्ले विरहित असावे.