विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३३

मराठी भाषा दिवसानिमित्त संपादनेथॉन (संपादन मॅरेथॉन)

संपादन

नमस्कार मंडळी!

दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसानिमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित करावी काय ? या संपादनेथॉनात आपण एका दिवसात मराठी विकिपीडियावर शक्य तितकी संपादने करायची व यातून एका दिवसात आपण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीला आपल्या सर्व ताकदीनिशी शक्य तितका मोठ्ठा रेटा द्यायचा हा मुख्य हेतू. आपण या संपादनेथॉनात खालील गोष्टी करू शकतो :

  • अस्तित्वात असलेल्या लेखांमध्ये भर घालून त्यांना पुष्ट करणे
  • लेखांचे वर्गीकरण करणे, नवीन वर्ग बनवणे
  • लेखांमध्ये विकिमीडिया कॉमन्स येथून विषयाला सुसंगत चित्रे शोधून चिकटवणे
  • किमान तीन-चार ओळींसह नवीन लेख बनवणे
  • शुद्धलेखन व व्याकरण दृष्ट्या लेख सुधारणे
  • विकिपीडियाविषयी सहायक पाने (मदत, धोरणे, प्रकल्प, दालने इत्यादी) बनवणे

या दिवशी आपण मोठ्ठा रेटा देऊन दिवसभरात घडलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून आपल्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करू शकतो. त्यावरून आपल्याला पुढील वाटचालीसाठी काही मोलाची माहिती उपलब्ध होऊ शकेलच; पण त्याचबरोबर आपण विविध ऑनलाइन व छापील माध्यमांमधून याबद्दल वार्तांकन घडवून आणून मराठी विकिपीडिया प्रकल्पाची जाहिरात करण्यासाठी हा इव्हेंट वापरू शकू.

आपली काय मते ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०८, ८ फेब्रुवारी २०११ (UTC)

 

२७ फेब्रुवारी रविवार आहे. किती मंडळी घरकामात व्यस्त असतील माहिती नाही, पण एखादा रविवार मातृभाषेसाठी द्यावा की!
२७ तारीख स्थानिक प्रमाणवेळेनुसार मोजावी कि भारतीय प्रमाणवेळेनुसार?
अभय नातू १८:५५, ८ फेब्रुवारी २०११ (UTC)
दिवस स्थानिक कालविभागानुसार धरायला हरकत नाही. त्यामुळे दिवस २४ तासांहून अधिक होईल; पण नंतरची आकडेवारी तपासताना वाढलेल्या दिवसाचा विचार करून सरासरी जाहीर करता येईल.
खेरीज, अजून एक विचार - २७ तारीख रविवारी असल्याने व तो वीकेंड असल्यामुळे सर्वांना त्याच दिवशी रेटा द्यायला पुरेसा वेळ मिळेल की नाही सांगता येणार नाही; मात्र त्याऐवजी संपादनेथॉन जर शनिवार-रविवार अशी दोन दिवस चालू ठेवली, तर मात्र एरवी सक्रिय असणार्‍या सदस्यांकडून चांगला प्रतिसाद लाभू शकेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:५१, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)
संकल्पजी, मी आपला हा संदेश फेसबूकमधील माझ्या पानावर शेअर केला तर दोघांनी पसंती नोंदवली.तर एकुण फुल न फुलाची पाकळी प्रतिसाद मिळेल अशी आशा करावयास हरकत नसावी.तर मग संपादनेथॉन होऊन जाण्यास हरकत नसावी , संपादनेथॉन शब्दही चांगला आहे फक्त आपल्या विवादपटूंनी मुख्यकाम बाजूला ठेवून या शब्दाबद्दल चर्चा करत बसू नये एवढी प्रांजळ अपेक्षा. बाकी आपली सहमती असेल तर सेंट्रल नोटीस, मेलिंगलीस्ट इत्यादीतून यास प्रसिद्धी देणे सुरू करता येईल माहितगार १८:३०, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

लेखसंख्या, इ.

संपादन

वरील विषयाला थोडेसे संदर्भित असे --

मराठी विकिपीडियावर याक्षणी ३२,५८० लेख आहेत. पैकी ३,२५८ लेख म्हणजे एकूण लेखांपैकी १०% लेख १७४ बाइट किंवा त्याहून लहान आहेत. १७४ शब्द नव्हेत, १७४ अक्षरेही नव्हेत, तर १७४ बाइट! आशा आहे संपादनेथॉनदरम्यान व इतरही काळात, सदस्य लहान लेखांमध्ये भर घालण्याकडेही लक्ष देतील.

अभय नातू २०:०३, १२ फेब्रुवारी २०११ (UTC)

सगळ्यात मोठ्या लेखांपैकी पहिले ३,२५८ लेख ५,४२२ बाइट किंवा त्याहून मोठे आहेत.

अभय नातू ०१:५४, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)

हे असे का ?

संपादन

मी अनामिक संपादन करताना, मला येथे मराठी टयपींग सुविधा उपलब्ध असल्याचे आणि धूळपाटीवर सराव करण्याचे निर्देशित केले जाते पण सुविधा प्रत्यक्षात सदस्य खाते उघडून प्रवेश करत नाही तोपर्यंत उपलब्ध होत नाही. माझी मागणी आहे एक तर अनामिक संपादनकरताना रोमन लिपीच्या वापरास मान्यता द्यावी अथवा अनामिक संपादकांनाही देवनागरी टयपींगची सुविधा उपलब्ध करावी. संकेत ०८:३०, २२ फेब्रुवारी २०११ (UTC)

तांत्रिक बाजू

संपादन

नमस्कार संकेत,
सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते : मराठी विकिपीडियाची स्थापना मराठी भाषेत मुक्त ज्ञानकोश प्रकल्प घडवण्याच्या उद्देशाने झाली असल्याने, त्याची एकमेव भाषा मराठी व प्रमाणलिपी देवनागरी आहे.
बाकी, तुम्ही नोंदवलेले निरीक्षण पडताळून पाहिले - अनामिक सदस्यांना देवनागरी टंकलेखनाची सुविधा संपादनचौकटीत मिळत नाही, असे दिसते. देवनागरी लिप्यंतरणाची सुविधा जावास्क्रिप्ट या स्क्रिप्टिंग भाषेत लिहिली आहे; ज्यांचा संबंध जावास्क्रिप्ट कोड व विकिपीडियाचे आधारभूत सॉफ्टवेअर असलेल्या मीडियाविकी सॉफ्टवेअराच्या काही फायलींशी येतो. त्यात तुम्ही नोंदवलेल्या समस्येवर काही उत्तर सापडते का, ते पाहावे लागेल. त्यासाठी मराठी विकिपीडियावरच्या, किंवा मेटाविकीच्या मंडळींचे मार्गदर्शन लागेल. अर्थात या कामी, आपणदेखील सहभाग/ पुढाकार घेऊ शकता; कारण हा विकिप्रकल्प असल्यामुळे आपल्या सर्वांचा सामायिक उत्तरदायित्वाचा प्रकल्प आहे.
दरम्यान, तुम्ही लॉगिन होऊन संपादने करणे सोपे ठरेल (खरे पाहता, काही विशेष कारणे असल्याशिवाय अनामिक राहून संपादने करण्यात फारसे काही हशील नसावे.). खेरीज बरहा वगैरे सॉफ्टवेअरांचा वापर करून तुम्ही मराठी विकिपीडियाच्या देवनागरी टकलेखन सुविधेविना काम करू शकता.

कृपया खालील काही दुवे जरूर पाहा :

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:००, २२ फेब्रुवारी २०११ (UTC)

पण का?

संपादन

रोमन टंकलेखनाचा सराव करायचा असेल तर, टायपिंग वर्गात दाखल व्हावे. त्यासाठी विकिपीडियावर संपादन करण्याच्या फंदात पडू नये. आणि जर का आपण सदस्य असू तर, अनामिक संपादन करण्यात काय हंशील? J ०९:०७, २२ फेब्रुवारी २०११ (UTC)

मराठी भाषा दिवसानिमित्त सर्व मराठी विकिपीडियनांना शुभेच्छा!

संपादन

नमस्कार मंडळी!

मराठी भाषा दिवसानिमित्त सर्व मराठी विकिपीडियनांना शुभेच्छा! संपादनेथॉनेच्या आजच्या दिवसात अजून जबरी दौड मारू. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१०, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

मंडळी माझ्या सुद्धा मराठी भाषा दिवसनिमित्त सर्व मराठी विकिपीडियनांना शुभेच्छा! अजुन एक चांगली बातमी, आत्ताच इमेलवर इंग्रजी मराठी मशीन ट्रान्सलेशन करणार्‍या साकव या संकेतस्थळाचे त्यांच्या प्रगती बाबतचे इमेल आले आहे वाचून चांगले वाटले त्यांच्या इमेल खाली नमुदकरत आहे.माहितगार ०६:२९, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

मराठी भाषा दिवसाच्या सर्वाना शुभेच्छा.

मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून तुमच्याशी संपर्क साधण्याचा एक प्रयत्न.

http://www.saakava.com हे संकेतस्थळ १ मे २०१० - महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी सुरू करण्यात आले. या संकेतस्थळावर इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर दिले जाते. हे भाषांतर साकव या संगणक प्रणालीद्बारा करण्यात येते. गेले आठ महिने ही प्रणाली फारच प्राथमिक अवस्थेत होती. नियमितपणे या प्रणालीत आम्ही सुधारणा करत आलो आहोत आणि हे प्रयत्न आम्ही करतच राहू. या सुधारणा करताना, लोकांकडून आलेल्या वेगवेगळ्या सूचना आणि त्यांनी साकववर दिलेली वाक्ये यांचाही विचार करण्यात आला.

खरं तर संगणकीय भाषांतर प्रणाली विशेषतः वेगळ्या कुटुंबातल्या भाषांसाठी हा प्रचंड वेळखाऊ तसेच खर्चिक प्रकल्प आहे. अशा प्रकारचा मराठीतील हा बहुधा पहिलाच प्रकल्प असावा. निदान इतक्या सहजरीतीने वापरता येणारा तरी पहिलाच.

सध्या यामध्ये जवळपास दोन लाख शब्द (किंवा शब्दसमूह/वाक्प्रचार) आहेत. साधारणतः ज्या वाक्यरचना इयत्ता सातवीतील(मराठी माध्यम) विद्यार्थ्याला माहिती असणे अपेक्षित आहे, अशा वाक्यरचनांचा अंतर्भाव यामध्ये आहे. या प्रणालीत त्यानंतरच्या वाक्यरचनांचा अंतर्भाव करण्याचे काम सुरू आहे.

भाषांतर-क्षेत्राशी निगडित असलेल्या काही तज्ञांनी ई-पत्र पाठवून आम्हाला उत्तेजन दिले तसेच उपयुक्त अशा सूचनाही दिल्या. मुंबईची एक मुलगी दहावीला असून, मराठी ही तिची दहावीसाठी तिसरी भाषा आहे. साकव आपल्या मराठीच्या अभ्यासात उपयोगी पडल्याचे तिने आवर्जून लिहिले. यांमुळे आमचा हुरूप वाढला आहे. अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली. या सर्वांचे मनापासून आभार.

मराठी दिनानिमित्त जे संस्करण सादर करत आहोत त्याचा एक विशेष म्हणजे वेगवेगळ्या विषयांशी संबंधित अशा पारिभाषिक शब्दांचा समावेश. त्यासंबंधी अधिक माहिती संकेत-स्थळावर दिली आहे. अर्थात काही इतर संकेतस्थळांवरही असे शब्द उपलब्ध आहेत. आणखी काही विषयांतल्या पारिभाषिक शब्दांचे काम चालू आहे. त्यातले काही म्हणजे व्याकरण, पर्यावरणशास्त्र आणि वैद्यकशास्त्र. पारिभाषिक शब्द संगणकावर लगेच उपलब्ध असणे हे खूपच उपयोगी आहे, त्याचा आपण जरूर उपयोग करून पहावा.


सदर उपक्रमात आपण वेगवेगळ्या प्रकारे सहभागी होऊ शकता .

१. या संकेतस्थळाला आज तर भेट द्याच. सदर संकेतस्थळ वेळोवेळी वारंवार अद्ययावत केले जात असल्यामुळे, आज होण्या‐या चुका पुढच्या वेळी दुरुस्त झालेल्या असण्याची शक्यता आहे. म्हणून या संकेतस्थळाला वारंवार भेट द्या.

२. आपण भाषांतरासाठी दिलेली वाक्यं उपयुक्त असतात. त्यामुळे वेळवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना असणारी वाक्ये भाषातंरासाठी देऊन साकवला नवनवीन रचना शिकण्यास मदत करा.

३. एकाच प्रकारच्या वाक्यरचना जर चुकत असतील, तर Saakava.Suggestion@gmail.com या ठिकाणी आपण साकवच्या त्रुटी नोंदवू शकता.

४. हे ई-पत्र कृपया आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या परिचयाच्या अभ्यासकांना पाठवा, त्यामुळे साकवला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे शक्य होईल.

५ . भाषांतर, संगणकीय भाषांतर अशा प्रकारचे फोरम, ब्लॉग, ऑर्कुट/फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग यामध्ये साकवचा शक्य असल्यास उल्लेख करावा.



कळावे, ही विनंती.

आपला,

साकव.

मला साकव वरती काही काम करता येत नाही. तसेच मला काही भाषांतर करून मिळत नाही. error दाखवते. याचे काय कारण असू शकेल? मंदार कुलकर्णी

पहिली संपादनेथॉन संपूर्ण

संपादन

नमस्कार,

तुमच्या भरघोस योगदानामुळे मराठी विकिपीडियावरील पहिली संपादनेथॉन नुकतीच पार पडली. यात केलेल्या कामगिरीचे विश्लेषण येथे लिहिले आहे. तुमचे मत व प्रतिक्रिया जरूर कळवा.

अभय नातू १७:५९, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

आढावा

संपादन

संपादनेथॉनेचा आढावा संकलित केला आहे. या पानावर संपादनेथॉनेच्या कालावधीत वाचनीय मजकुरात लक्षणीय भर पडलेले लेख घेतले आहेत. या सूचीत काही लेख राहिले असल्यास, भर घालावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१४, २ मार्च २०११ (UTC)

मराठी विकिपीडियामधील सध्याच्या मराठी लेखन प्रणालीची विस्तारीत अंमलबजावणी प्रस्ताव: कौल

संपादन

अद्दापी प्रतिसाद न येऊनही प्रस्ताव विकिपीडिया:कौल पानावर कौलास टाकत आहे.माहितगार १७:२४, २७ मार्च २०११ (UTC) खालील सबंध प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर त्याचे अंतीम प्रारूप प्रणाली विक्सकांकरिता इंग्रजीत भाषांतरीत करून ह्वे आहे.

१) मराठी विकिपीडियाची मराठी विकिपीडियाची मराठी सध्याची लेखन प्रणाली मराठी विकिपीडियाची अविचल (by Default) लेखनप्रणाली असावी म्हणजे मराठी विकिपीडियात येणार्‍या सार्‍यांची सुरूवात आपोआप मराठीतून होईल.

१ अ. सध्या ज्यांना देवनागरी हवी त्यांना ती निवडावी लागते त्या एवजी तीने आपोआप सुरूवात होईल ज्यांना नको आहे त्यांना त्यातून स्वतः बाहेर पडावे लागेल.

बाहेर पडण्याची प्रक्रीया नेमकी कशी असेल ? ती आंतरविकि दुवे देण्या करिता आलेल्या अमराठी संपादकास कशी समजेल ? ते इंग्रजीत नोंदवा.

२) आपोआप कायम न झालेले नवागत अनामिक तसेच सदस्य खाती आणि आपोआप कायम झालेले अनामिक तसेच सदस्य खाती या सर्वांचा समावेश अविचल (by Default) लेखनप्रणालीत करावा.

३) प्रणाली व्हेक्टरसहित सर्व त्वचांना(skins) लागू असावी

३)मुख्य संपादन खिडकी,त्याच्या साधनपेटीतील संदर्भ आणि दुवा देण्यास सहाय्य करणारे संवाद गवाक्ष, आढावा, शोध खिडक्या,सर्व इनपुट बॉक्स विशेषतः त्यातील "type=create" गट ,सदस्य नोंदणी आणि सदस्य प्रवेश.या सर्व ठिकाणी मराठी विकिपीडियाची मराठी सध्याची लेखनप्रणाली अविचल (by Default) असावी.

४)मुख्य संपादन खिडकीच्या साधनपेटीतील विशेषवर्ण विभागातून अनावश्यक थाई,खमेर,आणि लाओ ह्यांची वर्णमाला हटवून त्या एवजी निम्न लिखीत मराठी देवनागरी वर्णमालेचा समावेश करावा

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ अः अ‍ॅ ऑ ऋ ॠ ऌ ॡ क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष त्र ज्ञ ा ि ी ु ू े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ् ृ ॄ ॢ ॣ ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ र्‍य र्‍ह ૐ

५)मुख्य संपादन खिडकीच्या साधनपेटीत विशेषवर्ण विभागातून व्हर्च्यूअल किबोर्ड सध्याची फोनेटीक तसेच विंडोज आयएमई इन्स्क्रीप्ट हे दोन्ही पर्याय उपलब्ध ठेवावेत.व्हर्च्यूअल किबोर्ड सदस्य नोंदणी आणि सदस्य प्रवेश येथेही दिसावा.

व्हर्च्यूअल किबोर्ड मला महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर उअपलब्धा आहे तसा अभिप्रेत आहे. तुम्हाला अजून काही चांगली उदाहरणे माहित असल्यास ती नोंदवा.

६)मराठी प्रणाली विकसकांनी ऑनलाईन मराठी शब्द सुचवणी डिक्शनरी सोबतच पारिभाषिक शब्द सुचवणी आणि शुद्धलेखन तपासणी हि एक्स्टेंशन्स उपलब्धकरून योग्य तपासणी नंतर मराठी विकिपीडियास जोडावीत. हा प्रस्ताव भाषांतरीतकरून चर्चे नंतर कौल पानावर हलवावा. कौलास सहमती मिळाल्यानंतर बगझिलावर विनंती करावी.

संबंधीत दुवे

माहितगार २०:३१, ४ मार्च २०११ (UTC)

कॉरल समुद्राची लढाई

संपादन

नमस्कार,

अनेक महिन्यांच्या संशोधन व लिखाणानंतर कॉरल समुद्राची लढाई हा लेख लिहून होत आलेला आहे. यात शुद्धलेखन व व्याकरणाचे बदल जशी गरज असेल तसे करावे. याचबरोबर संदर्भांचेही भाषांतर/पुनर्लेखन करावे.

पुढील एक-दोन महिन्यांत हा लेख मुखपृष्ठ सदर करता येईल अशी आशा/अपेक्षा आहे.

अभय नातू २२:००, ५ मार्च २०११ (UTC)

सांगकाम्या

संपादन

मराठी लेख बनवतांना त्या त्या पानावरील नावे आपोआप दुवे म्हणून परिवर्तीत करण्यासाठी सांगकाम्या बनवता येईल काय? उदा. हातोडी हा शब्द जेथे असेल त्या त्या लेखांमध्ये सर्वत्र सांगकाम्याने त्याचा चौकोनी कंस घालून विकी दुवा बनवावा. हे काम सध्या मी एक एक करून करत आहे. पण त्याला फार वेळ लागतो. या व्यतिरिक्त इतर काही युक्ती असल्यास ती मला कळवा. म्हणजे काम सुलभ होईल. निनाद ०४:५२, १७ मार्च २०११ (UTC)

तुमची सूचना रास्त आहे, मात्र त्यात एक संकेत भंगण्याची शक्यता आहे. समजा 'हातोडी' असा शब्द असलेल्या लेखांमध्ये सर्वत्र [[हातोडी]] असा विकिदुवा टाकला, तर एकाच लेखांत अनेकवार त्याच त्या लेखाला निष्कारण विकिदुवा जोडला जातो - जे विकिपीडियावरील लेखनसंकेतांना धरून नाही. एखाद्या लेखात शक्यतो एकदाच किंवा शक्य तितक्या कमी वेळा अन्य लेखांसाठीचे विकिदुवे घालावेत, असा संकेत आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:१३, १७ मार्च २०११ (UTC)

संकल्प म्हणतात त्या प्रमाणे एकाच पानात त्याच त्या दुव्यांचा अतीरेक होऊ नये, शिवाय त्या पेक्षा महत्वाचे एखादा शब्द विशीष्ट अर्थाने वापरलेला असल्यास तुम्ही त्या वाक्यातील त्या शब्दाचा संदर्भ आणि तो प्रत्यक्ष लेख पडताळून पाहिल्या शिवाय अचूकता येणार नाही म्हणून पूर्ण स्वयंचलीत सांगकामे वापरणे तर योग्य नव्हे. पण त्यापलीकडे कोणत्याही प्रकारची प्रणाली मराठी भाषेच्या ठेवणीस पूर्ण भावण्याची शक्यता कमी कारण मराठी भाषेत शब्दांची जेवढी (पद)रूपे होऊ शकतात आणि अशुद्धलेखन असलेली रूपे मोजून सांगकाम्यास देणे हेच एक फार मोठे काम होऊन बसेल.त्यामुळे विचारपुर्वक अर्धस्वयंचलीत म्हणजे तुम्ही स्वतः लक्ष ठेवून वापरत असलेले सांगकामे वापरण्यास हरकत नसावी.
वेळ वाचवण्याची दुसरी काही साधने आहेत त्याबद्दल मी इतरत्र सहाय्य पानांवर थोडे फार लिहिले आहे, पण फायरफॉक्स न्याहाळकाचे विकएडीट हे अ‍ॅडऑन कदाचित मला सांगकामे वापरणे येत नसल्यामुळे, मला तरी भन्नाट वाटते.वापरून पाहिल्या शिवाय प्रचिती येणार नाही
खरेतर वृत्त माध्यमातील बरीच संकेतस्थळे त्यांच्या कंटेट मॅनेजमेंट प्रणालीत बदल करून आपण म्हणता त्याप्रमाणे त्यांना महत्वपूर्ण वाटणार्‍या शब्दांवर दुवे उपलब्ध करत आहेत.जुन्या बग्सचा आणि स्ट्रॅटेजी विकिवर यापूर्वी काहीचर्चा झाली आहे का हे शोधू शकता अथवा नवीन प्रस्ताव मांडू शकता.
माहितगार ०६:०२, १७ मार्च २०११ (UTC)
एकाच पानात त्याच त्या दुव्यांचा अतीरेक होऊ नये, हे मान्य त्यासाठी सांगकाम्या फक्त पहिलाच दुवा परावर्तीत करण्यासाठी सांगकाम्या नियंत्रीत करता येईल. नवीन प्रस्ताव मांडण्याची इच्छा आहे, प्रयत्न करतो. मी फाफॉ वापरतो पण मला मोझिला वर विकएडीट सापडले नाही दुवा देता का प्लीज? निनाद ००:१०, १८ मार्च २०११ (UTC)
विकिपीडिया:फायरफॉक्स संलग्न सुविधा माहितगार ०१:०३, १८ मार्च २०११ (UTC)
धन्यवाद! :) वापरून पाहतो! निनाद ०१:३८, १८ मार्च २०११ (UTC)
दुव्यांचा अतिरेक होऊ नये याच बरोबर एका पानावर एका लेखाकडे एकच दुवा असावा हा इंग्लिश विकिपीडियाचा नियम बरोबर नाही. अनेकदा लेख वाचता वाचता तीन-चार स्क्रीन खाली आल्यावर एखादा शब्द पाहून त्यावर टिचकी मारावीशी वाटते. तेव्हा तेथे दुवा असावा म्हणजे वाचकाला त्या लेखातील त्या शब्दाचा पहिला उपयोग धुंडाळत बसावे लागणार नाही. हे मोठ्या लेखांत जास्त प्रकर्षाने जाणवते.
तरी एखाद्या लेखात अधूनमधून त्याच शब्दाकडे दुवा असायला हरकत नाहीच उलट असे दुवे असावे.
अभय नातू ००:२८, १८ मार्च २०११ (UTC)
ओके! तुम्ही दोघांनी नक्की काय ते ठरवून घ्या! :) मलाही असे दुवे असावेत असेच वाटते. आणि मोठ्या लेखात तर ते असलेच पाहिजेत. निनाद ००:४१, १८ मार्च २०११ (UTC)

विकिपीडिया प्रसिद्धी

संपादन

नमस्कार मंडळी!

मराठी विकिपीडियात लोकांचा सहभाग वाढावा, व त्यातून आपल्याला मल्याळम, बांग्ला वगैरे दक्षिण आशियाई विकिपीडियन समुदायांप्रमाणे दरमहा ५०-१०० सक्रिय सहभाग घेणारे सदस्य लाभावेत, म्हणून मराठी विकिपीडियाची प्रसिद्धी करणे आजघडीची गरज बनली आहे. (येथील सांख्यिकीनुसार मल्याळम विकिपीडियावर दरमहा पाचाहून अधिक संपादने करणारे ९०-१०० सक्रिय सदस्य असून बांग्ला विकिपीडियावर दरमहा पाचाहून अधिक संपादने करणारे ५०-एक सक्रिय सदस्य आहेत. मराठी विकिपीडियावर मात्र हा आकडा २०-२५ दरम्यानच गेली ४-५ वर्षे घुटमळत आहे.) यासाठी इथल्या सर्व सदस्यांनी (किमानपक्षी नियमित येणार्‍या सदस्यांनीतरी) जमेल तशी ऑनलाइन, ऑफलाइन प्रसिद्धी केल्यास हातभार लागेल. ऑनलाइन प्रसिद्धीसाठी मराठी संकेतस्थळांवरील फोरम, ब्लॉग, ईमेल, फेसबुक/ऑर्कुट इत्यादी सामाजिक नेटवर्किंग संस्थळे यांचा वापर करता येईल. ऑफलाइन प्रसिद्धीसाठी परिचित व संभाव्य सहभागीदार सदस्यांशी गप्पा, प्रत्यक्ष भेटीगाठींतून प्रात्यक्षिक/माहिती, पत्रकार किंवा इलेक्ट्रॉनिक पत्रकारांसोबत मराठी विकिपीडियाच्या प्रसिद्धीसाठी काही वार्तांकन घडवून आणण्याबद्दल चाचपण्या करणे इत्यादी कार्यक्रम हाती घेता येतील. यातले काही व्यक्तिगत पातळीवर, काही अन्य विकिपीडियनांना सोबत घेऊन सामूहिक पातळीवर पाठपुरावा करत अमलात आणता येतील.

व्यक्तिशः माझ्याकडुन गेल्या काही महिन्यांमध्ये चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देऊन अन्य सदस्यांना यासंबंधी बोलते आणि 'करते' करण्याच्या उद्देश या पोस्टीमागे आहे.

  1. नुकत्याच झालेल्या संपादनेथॉनेनंतर तीनेक आठवड्यांत ज्या लेखांमध्ये लक्षणीय प्रमाणात माहितीची भर पडली (व ज्यांच्यात माहितीचौकट, आंतरविकी दुव्यांची बाइट-वाढ वगळता मुख्य वाचनीय मजकुराची भर पडली), अश्या लेखांची ढोबळ यादी मी गेले काही दिवस राखत होतो. ती यादी माझी उठबस असणार्‍या मायबोली या संकेतस्थळावर टाकली - विकिपीडियाची रिक्षा. इथून पुढेही काही आठवड्यांच्या काळाने वाचनीय माहितीची भर पडत असलेल्या त्या-त्या कालावधीतल्या 'सक्रिय' लेखांची सूची या धाग्यावर नोंदवण्याचा मनसुबा आहे. त्यातून मराठी विकिपीडियाची वाचनीयता/उपयुक्तता लोकांना पटवणे व त्यामुळे मायबोलीकरांपैकी काही नेटिझनांना विकिपीडियाकडे ओढणे, हे प्रमुख उद्देश आहेतच; खेरीज मराठी विकिपीडियाच्या पानांचा हिटकाउंट व गूगल शोधात क्रमांकन वाढायचा अप्रत्यक्ष फायदाही होईल. (बाकी, संपादनेथॉनेनंतर मायबोलीकरांपैकी काही जणांनी अधूनमधून येत येथील लेखांमध्ये बर्‍यपैकी भर घातल्याचे माझे निरीक्षण आहे. हुर्रे! :) )
  2. फेसबुकावरही मी इथल्या काही वाचनीय लेखांचे आणि 'आगळ्या' विषयांवरील लेखांचे दुवे गेले काही आठवडे शेअर करत आहे. उदा.: जोहोर, फुकुशिमा १ अणुऊर्जा प्रकल्प, दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली इत्यादी. याद्वारेही वर नोंदवलेले परिणाम अपेक्षित आहेत.

अन्य सदस्यांनीही याविषयी आपापली मते, अनुभव, माहिती नोंदवावी, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:१४, १७ मार्च २०११ (UTC)

अगदी खूप लोक येतात असेही नाही तसे पहाता मोजकीच मंडळी येतात पण एक वैशिष्ट्य अस कि लेखनाचा आणि माहितीचा दर्जा चांगला असतो. बर्‍यापैकी लोकांना माहिती मिळते सहसा लोक सावकाशीने येतात.मनोगतावर चर्चा करूनही बराच कालावधी लोटला भेटलेली मंडळी आजतागायत अधूनमधून किमान डोकावूनतरी निश्चितच जातात.मागे म्हटल्या प्रमाणे टिकाकार मंडळी टिकाकरतील पण मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी विकिपीडीयावर योगदानही आवर्जून करतात हे खरे. माहितगार १९:४०, १७ मार्च २०११ (UTC)
माझे उपाय - * मी व्यक्तीशः अनेक लोकांना मराठी विकीवर येण्यासाठी उद्युक्त करत असतो. अनेकदा त्यांच्या आवडीच्या विषयात त्रोटक लेखन करून ते लेख 'पूर्ण कराल का?' अशी विचारणा करून त्यांच्याकडे दुवे पाठवत असतो. काही वेळा भर पडते काही वेळ नाही. (यातला एक प्रकार म्हणजे चुकीचे माहिती तेथे दिसली तर काही वेळा लोक हिरहीरीने बदलायला तुटून पडतात - पण काही लोक 'छ्या! काहीही लिहिलेले असते' असे म्हणून दूर जातात! :( )
  • काही वेळा मी लेख अर्धवट लिहून यात भर घालाल का म्हणून काही फोरम्सवर घेऊन जातो - जसे मुलाखत हा लेख मी मिसळपाव येथे नेला तेथे काही भर मिळाली आहे हे नोंदवण्याजोगे!
  • तसेच जेव्हा जेव्हा मराठी विकीविषयक दुवे देणे शक्य असते तेथे मी ते देत असतो.
  • काही वेळा विकेच्या उपक्रमांच्या चेन इमेल्स चालवण्याचे प्रयत्न केले आहे.
  • एखाद्या सदस्याकडून माहितीपर लेख, चित्रे आल्यास मी त्यांना लगेच ते विकीवर चढवण्यासाठी अगत्याने विचारणा करतो. ( ही मी मिसळपाव, उपक्रम आणि क्वचित मायबोलीवरही करत असतो.) शक्यतो त्यांनीचे ते येथे चढवावेत असे माझे धोरण असते. त्यांना अडचण असल्यास मी ते काम करण्याची तयारीही दाखवतो. यामुळे अनेक जणांना मराठी विकीची माहिती होते. त्यांच्या आवडीच्या लेखांचे साठे येथेही आहेत हे लक्षात येते.
  • ( हल्ली विकीवर एकशब्दी लेख नसावेत याकडेही माझा कटाक्ष आहे. त्यामुळे वाचक आला तर त्याला २ ओळी माहितीच्या वाचायला मिळतीलच असे पाहतो.)
  • या पूर्वी मला शक्य होते तेथे विकी विषयक माहितीचे 'स्निपेटस' मासिकांना पाठवले आहेत. क्वचित लघू लेखही पाठवले आहेत ते 'छापवून' घेतले आहेत. मेलबर्नच्या मराठी मंडळाच्या दिवाळी मासिकात मराठी विकीची माहिती आणवली आहे. हेच इतर मंडळांच्या मासिकातही यावी म्हणून प्रयत्नशील आहे
  • या शिवाय प्रमुख धारेतील प्रिंट माध्यम म्हणजे आघाडीची वृत्तपत्रे मासिके आदींसाठी लेख लिहिण्याचे डोक्यात आहे पण कृतीत आणणे शक्य झालेले नाही. पण आता त्याकडेही लक्ष देतो. निनाद २२:१४, १७ मार्च २०११ (UTC)

अभिव्यक्त होणे/अभिव्यक्तिस्वातंत्र्य

संपादन

अभिव्यक्त होणे/अभिव्यक्तिस्वातंत्र्य वरील दोन नावांचे दोन लेख विकीवर आहेत. दोघांतील बराचसा मजकूर सारखाच आहे. पहिल्या लेखाच्या चर्चापानावर मी व्यक्त/अभिव्यक्त होणे/करणे असल्या शब्दरचना मराठीत करू नयेत अशा अर्थाचे काहीतरी लिहिले होते. तरीसुद्धा तसल्या रचना असलेला तो लेख अजून जिवंत आहे. दुसर्‍या लेखातही एखाद्या ठिकाणी तशीच रचना आहे. वाक्यात कर्म नसेल तर व्यक्त होणेला अर्थ नाही. बाळंत होणे सारखा व्यक्त होणे हा अकर्मक प्रकार मराठीतला नाही. ----59.96.243.163 ११:०५, १८ मार्च २०११ (UTC)

>> पहिल्या लेखाच्या चर्चापानावर मी <<
आपण लॉगिन होऊन सही केलीत, तर 'मी' या उल्लेखाचा कर्ता कोन ते कळेल. नाही तर हा मराठीतला अकर्ता प्रकार होईल (माफक विनोद म्हणून हे वाक्य घ्या. :) )
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:५९, १८ मार्च २०११ (UTC)
मी या उल्लेखाचा कर्ता कोन ते कळेल. नाही तर हा मराठीतला अकर्ता प्रकार होईल
सृष्टीका, कौन हे कर्ता; कर्ता है, वा अकर्ता; उंचे आकाशमें रहता; सदा अध्यक्ष बना रहता.
वही सच मुचमे जानता; या नही भी जानता; है किसीको नही पता....नही पता, नही है पता, नही है पता ......
अभय नातू १२:२२, १८ मार्च २०११ (UTC)
अभयजी हमही ने है अभिव्यक्त होणेकी इस सृष्टी को बनाया(बिगाडा) चुंकी हर अणूमे अपमे आपको पाते है इस लिए हमे तो सृष्टीका, कर्ता पता है :). क्षमा असावी, अंदाज लावण्या पलिकडे माझ्या हातात काही नाही, पण माझा अंदाज वरील प्रतिसाद आदरणीय जेंचा असावा.अभय,संकल्प आणि जे, मराठी व्याकरण आणि शुद्धलेखनात तुमच्याकडे मी देवमाणसे म्हणूनच पहातो. त्यामुळे प्रतिवादाचा काही प्रश्न आहे अशातला भाग नाही. कशामुळे कल्पना नाही पण व्यक्तिगत पातळीवर स्वातंत्र्य शब्दासोबत न वापरता एकट्याने 'अभिव्य्क्ती' शब्द वापरला जातो तेव्हा माझ्या विचारमालेत हिंदीतील अभिव्य्क्ती शब्दाच्या इतर अर्थ छटा अधिक येते.["लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची अभिव्यक्ती करतो./मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची अभिव्यक्ती करते, अशा पद्धतीचा अभिव्यक्ती शब्दाचा उपयोग प्रमाण मराठीच्या दृष्टीने योग्य असेल तर, आपण मराठी विकिपीडियावर आपण जरूर वापरू पण मला अशा उपयोगाची सवय नसल्यामुळे असेल; असा उपयोग मला, भाजी करणे सारखा वाटतो. लेखक लेखनाद्वारे त्याच्या विचारांची भाजी(-आणि वाचकाची भजी-) करतो.मनापासून स्वयंपाक करणारी कुटुंबवत्सल स्त्री आपल्या कृतीने प्रेमाची भाजी करते. :) (ह्या पोरकट्ट विनोद प्रयत्नास व्यक्तिगत टिका न समजता कृपया हलकेच घ्यावे हि नम्र विनंती.)


>>>>तरीसुद्धा तसल्या रचना असलेला तो लेख अजून जिवंत आहे.

लेखास नेमके शीर्षक काय असावे हे आपणासारखी भाषातज्ज्ञ माणसे अधिक व्यवस्थीत सांगू शकतील, पण केवळ शीर्षकात चूक आहे म्हणून बाकीचा लेख जिवंत असू नये असे आपणापैकी कुणालाही म्हणावयाचे नसावे असा विश्वास आहे. किमान माझ्या दृष्टीने दोन्ही लेखांचा आशय आणि उद्देश वेगळा आहे. उद्देशातील फरक समजावून देण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे असे दिसते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य या लेखाची व्याप्ती घटनादत्त आधिकार किंवा शासन/न्याय प्रणालीने दिलेले किंवा त्यांच्याकडून मिळवलेले आधिकार यादृष्टीने येते, अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळवण्याबद्दलचा प्रबोधन काळापासूनचा यूरोपिय आणि आमेरिक स्वातंत्र्य इतिहास ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासा पासून आभिव्य्क्तिस्वातंत्र्य ते आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कायद्द्यांच्या संदर्भाने अभिव्यक्तिस्वातंत्र्य लेख अभिप्रेत आहे.
शीर्षकाचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेऊन (प्रमाण मराठी वापराचा बापुडवाणा प्रयत्न) : अभिव्यक्ती प्रकट होणे हि प्रक्रीया आहे. मी घडवत असलेला दुसरा लेख "अभिव्यक्ती प्रकट होणे" या प्रकीये बद्दलचा आहे.या लेखामागची माझी प्रेरणा नरहर कुरुंदकर यांनी स्वातंत्र्य जन्मसिद्ध नसते तर संस्कृती सिद्ध असे मत मांडणार्‍या त्यांच्या लेखातून आली (पण मी मुळ लेखन नकरता संदर्भासहीत विश्वकोशीय चौकटीत लेखन बसवण्याचा प्रयत्न करत आहे भारता बाहेर आहे संदर्भ ग्रंथ हाताशी नाहित त्यामुळे लेख पूर्ण होण्यात कालहरण होते आहे ). आणि या अभिव्यक्ती प्रकट होणे या प्रक्रीयेचा मानसशास्त्राशी संबध असू शकतो,तत्वज्ञान आणि तसेच इतर अनेक विषयांशी संबंध असू शकतो त्याचा अभिव्य्क्ती स्वातंत्र्याशी संबंध फार नंतरचा आहे.
मी या लेखात अभिव्य्क्ती प्रकट कसे व्हावे हे सांगत नाही आहे त्यामुळे हा विकिबुक्सचा विषय नाही. मी अभिव्य्क्ती प्रकट होण्याची प्रक्रीयेस विवीध शास्त्रे आणि तत्वज्ञान कोणत्या पद्धतीने विश्लेषण करतात हे सांगण्याचा उद्देश आहे.आणि एखादी प्रक्रीया कशी होते हि गोष्ट विश्वकोशीय कक्षेत बसते असे माझे मत आहे अर्थात कुणाला वेगळे मत मांडावयाचे असेल तर अधिक समजून घेण्यास निश्चित आवडेल. अभिव्यक्त होणे हा लेख अजून थोडा घडू द्दावा आणि मग आतील विश्वकोशीय मजकुरास कोणते शीर्षक अधिक चपखल ठरते ते ठरवावे कारण मुख्य काळजी विषयांतराची आहे. संगणक टंक या लेख शीर्षकाबद्दल चर्चा पानावर खूप चर्चा रंगली पण मंडळींनी प्रत्यक्ष लेखातील मजकुरात योगदान आणि सुधारणा करण्याचे अडगळीत पडले तसे ह्या लेखा बद्दल होऊ नये अशी इच्छा आहे. आणि इतःपर हा लेख विश्वकोशिय नाहीच अशी सर्वांची धारणा असेल तर मी तो मराठी विकिपीडियावरून काढून बाहेर लिहावयाचे झाल्यास तसे हि मान्यवर वृंदाने मनमोकळे पणाने मांडावे.मी ते राजीखुशीने मान्य करेन


विषयांतर असलेला प्रतिसाद भाग मुद्दाम शेवटी घेतोआहे.मी सोशल नेटवर्कींगच्या पिढीतला नाही त्यामुळे 'जें'चा हा आक्षेपकी शब्द प्रयोग सोशलनेटवर्कींगच्या फ्याडातून आला आहे हा माझ्यावर लागू होणार्‍या पैकी नाही तरी कृपया जे साहेब या विषयावर गैरसमज नसावा.माझी मराठी भाषा माझ्या गावी पुणेरी म्हणून अयोग्य ठरते आणि पुण्यात ती पुणेरी/प्रमाण नाही म्हणून अयोग्य ठरत आली आहे,गैरसमज ठेवायचाच असेल तर व्यक्तिगतपातळीवर मला प्रमाणभाषेचे प्रमाणाबाहेरचे कौतुक नाही म्हणून ठेवावा, वर चढणार्‍या माणसास कुणी चढला म्हणाले कुणी यंगला म्हणाले किंवा कुणी नवीन शब्द जंपला म्हणाले तरी मला तिन्ही शब्दांचे सारखेच कौतुक आहे, पण ते व्यक्तीगत पातळीवर, मला माझी व्यक्तिगतमते मराठी विकिपीडियात मुळीच लादावयाची नाही आहेत त्यामुळे चर्चेस पुढचा मुद्दा घेण्यास हरकत नसावी असे गृहीत धरतो.(तशी गरजच भासलीतर वर्‍हाडी,मराठवाडी,खानदेशी,कोकणी,चित्पावनी या सर्व बोली उपयोगात आणणार्‍यांना वीसेक माणसे गोळाकेलीतर स्वतंत्र विकिपीडिया तयार करून वेगळी चुल मांडण्याची मुक्तता विकिप्रणालीत आहे तथाकथीत ग्राम्य अशुद्ध किंवा अगदी तामीळ लिपीत तंजावरी मराठी विकिपीडिया उघडायचा झालातरी तेही शक्य आहे.पण सध्या सरी माझ्या कडे तसा प्रस्ताव नाही )
माहितगार १९:४०, १८ मार्च २०११ (UTC)

मला अभिव्यक्त होण्यास अजून जागा आहे ?

संपादन
विकिमित्रांनो मी लेख शीर्षका बद्दल सपशेल माघार घेतली हे खरे.खास करून अभिव्य्क्त होणे हि मराठीत वापरलेच जात नाही हे आदरणीय जे म्हणाले पण मला लेखातील वाक्ये अभिव्यक्त ऐवजी अभिव्यक्ती शब्दाने कशी बदलता येतील ह्या प्रश्नाचा नवीनच गुंता डोळ्या समोर उभा आहे तो अजून सुटलेला नाही.
दुसरे असे कि जेंचे हे मत कि "अभिव्यक्त होणे असा वाकप्रचार मराठी भाषेत नाहीच,कुठे असा उपयोग झाला तर तो सोशल नेटवर्कींग वाल्यांच फ्याड आहे " हे माझ्या मर्यादीत गूगल शोध यंत्राच्याच सहाय्याने शोधण्या पर्यंत सध्या तरी माझी साधने सिमित आहेत.

माहितगार १८:५३, १९ मार्च २०११ (UTC)

होतो हे क्रियापद होणेशी संबधीत समजून मी गूगल वर शोध घेतल्या वर "अभिव्यक्त होतो" या शब्द समुहाचा शोध घेतला.
  • चित्रपट हे एक माध्यम आहे.जशा इतर माध्यमातून कलाकार अभिव्यक्त होतो तसाच चित्रपटातूनही. हे वाक्य मात्र मायबोली सोशल नेटवर्क फ्याडावर आढळल
  • तरी आपण निरर्थक असे वाचाळपणे सतत बोलत राहतो. अथक अभिव्यक्त होत राहतो. पण चुकीचे तेवढे मनातच ठेवतो.परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत ज्ञानेश्वरीत. परा म्हणजे नाभीतली अव्यक्त वाणी आणि वैखरी म्हणजे प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी. परा, म्हणजे खरे तर नेणीवेत विचार येतो तेव्हाच आपण स्वत:शी बोलतो. प्रत्यक्ष बोलतो तेव्हा दुसऱ्याशी अभिव्यक्त होतो आणि कृती म्हणजे आपले बोलणे समष्टीशी. विचार, वाणी आणि कृती या क्रमाने बहिर्मुख होत जाणाऱ्या आपल्या या अभिव्यक्ती.संदर्भ:प्रेम -संजय भास्कर जोशी(कादंबरीकार आणि समीक्षक) 20 Sep 2010, 0320 hrs IST महाराष्ट्र टाईम्स

"अभि" वरती अजून थोडे

संपादन

माहितगार, आताच माघार का बरे घेतली? मला असे वाटते कि अजून चर्चा होऊ शकते. तुमच्या "मला अभिव्यक्त होण्यास अजून जागा आहे ?" अजून थोडा विचार करायला प्रेरणा मिळाली.

मला हिंदी चा संदर्भ या चर्चेसाठी द्यायचा नव्हता. मला फक्त कुठे गडबड होऊ शकते हे नमूद करायचे होते.

अभि या शब्दाचा अजून खल केल्यावर खालील ३ ठिकाणी तो वापरला गेला आहे: १. "अभि" हा शब्द मराठी मध्ये उपसर्ग म्हणून बऱ्याच ठिकाणी वापरला जातो ज्यामुळे नंतर च्या शब्दाला जास्त वजन मिळते किंवा तेज येते. जसे: अभिजात , अभिनव, अभिभाषण, अभिरुची, अभिवचन,अभिराम, अभिवृद्धी, अभिलेख, अभिज्ञ, अभिज्ञान

२. काही वेळेला नन्तर च्या शब्दासंबंधी 'अजून काहीतरी' किंवा थोडेसे संबंधित - - जसे: अभिमुख , अभिमान, अभियांत्रिकी ,

३. संपूर्ण वेगळा शब्द ज्यात 'अभि' चा पहिल्या २ प्रकारांशी काही संबंध नाही. - - जसे: अभिप्रेत, अभिनेता, अभिनेत्री, अभिनंदन, अभिप्राय, अभियान, अभियोक्ता, अभिलाषा, अभिवादन, (माझे एखादे उदाहरण गडबडीत चुकू पण शकते तरी तेथे माफी करावी.)

मी असेही पाहिले आहे की, काही साहित्यिक 'साहित्य संमेलनात' अथवा 'चर्चासत्रात' आपले म्हणणे सांगण्यासाठी तत्क्षणी 'अभि' हा उपसर्ग शब्दाला जोडून सांगू शकतात. हा त्यांनी मराठी भाषेला बहार केलेला नवीन शब्द किंवा वाक्प्रचार असू शकतो... :)

अशा परिस्थितीत, 'अभिव्यक्त' कुठल्या प्रकारात मोडतो ? कदाचित - पहिल्या भागात......

व्यक्त करणे आणि अभिव्यक्त करणे हे अशाच प्रकारचे असू शकते काय? तसे नसेल तर आणि तो दुसऱ्या भागातील शब्द असेल तर तुम्ही सांगितलेला "अभिव्यक्त करणे / होणे " हा लेख योग्य आहे. असे माझे मत झाले आहे.

आपण तज्ञ मंडळी या विषयी शेवटचा निर्णय घेऊ शकता. मंदार कुलकर्णी)

मंदार अभ्यासपूर्ण प्रतिक्रीयेकरिता धन्यवाद.मी इतर वाचक आणी विकिपीडीयन्सच्या प्रतिक्रीयेच्या प्रतीक्षेत असेन.या निमीत्ताने माझाही या शब्द समुहा बद्दल अधीक अभ्यास होतो आहे.माहितगार ०६:२६, २० मार्च २०११ (UTC)

अभिव्यक्त होणे/करणे

संपादन

व्यक्तमध्ये वि+अंज्‌ हा मूळ संस्कृत धातू आहे. भुज्‌चे कभूधावि भुक्त होते तसे अंज्‌चे अक्त, आणि वि+अंज्‌चे व्यक्त असे होते. वि+अंज्‌ हा सकर्मक धातू आहे. त्यामुळे व्यक्त हे रूप इतर सकर्मक धातूंच्या गृहीत, भुक्त, कृत, निर्मित, श्रुत अशा रूपांसारखे आहे. ज्याअर्थी कर्माचा स्पष्ट उल्लेख न करता गृहीत /भुक्त /कृत /निर्मित /श्रुत आदी करणे/होणे अशी शब्दरचना होत नाही, त्याअर्थी, मी व्यक्त झालो, कवी अभिव्यक्तला, लेखकाने अभिव्यक्ती केली, लेखकाची अभिव्यक्ती झाली असले प्रयोग योग्य नाहीत. -- J १८:२७, २२ मार्च २०११ (UTC)

आदरणीय जे तिन्ही फळ्या चीत विकेट घेतलीत ,तुमच्या ग्रामरचा गूगली गरीब बिचार्‍या माहितगाराच्या डोक्यावरून बाऊन्सर सारखा गेला,माहितगार आऊट होण्या आधीच मैदान सोडून पळाला, पण मग आता त्या अभिव्यक्ती लेखाच्या पिचवर बॅटींग करण्यास लगेचतरी कुणी धजावेल असे नाही, त्यामुळे तुम्हीच फलंदाजीला यावे हि नम्र विनंती माहितगार २०:०७, २२ मार्च २०११ (UTC)

विकिमीडिया इंडिया मेलिंग लिस्ट - मार्च इ.स. २०११

संपादन

नमस्कार मंडळी!

विमिमीडिया इंडिया मेलिंग लिस्टीवर मार्च महिन्यातल्या काही महत्त्वाच्या ईमेलांची माहिती मराठी विकिपीडियाच्या सदस्यांच्या सर्वसाधारण माहितीसाठी व चर्चेसाठी येथे नोंदवत आहे. यातल्या काही ईमेलांवरून अन्य दक्षिण आशियाई विकिपीडिया प्रकल्पांवर काय-काय घडामोडी चालल्यात, याची झलक सदस्यांना मिळेल, तसेच त्यावरून आपल्या कामाच्या गोष्टींसाठीही कल्पना येतील.

  1. (इंग्लिश भाषेत) http://lists.wikimedia.org/pipermail/wikimediaindia-l/2011-March/002573.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

हिंदी विकिपीडिया या भारतीय भाषांतील सर्वाधिक मोठ्या विकिपीडियावरील लेखसंख्या व दर्जा या दोन पैलूंच्या अनुषंगाने उजेडात आलेला एक किसा. त्या अनुषंगाने तिथे झालेली चर्चा खालील दुव्यांमध्ये वाचता येईल : उ. १, उ. २, उ. ३, उ. ४, उ. ५, उ. ६, उ. ७, उ. ८, उ. ९, उ. १०,

या अनुषंगाने मराठी विकिपीडियावरही अनेक लेख (विशेषकरून क्रिकेट स्पर्धा, क्रिकेट खेळाडू, फॉर्म्युला वन शर्यतींची हंगामागणिक पाने, देशोदेशींच्या फुटबॉल साखळी स्पर्धांची हंगामागणिक पाने) अनेक महिने/वर्षे माहितीविना, काही जुजबी मार्गक्रमण साच्यांनिशी/माहितीचौकटीनिशी पडू असल्याचे उदाहरण प्रकर्षाने आठवते. खेरीज तमिळ व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या अनेक पानांवर इंग्लिश भाषेतून आणलेली माहिती तशीच नोंदवण्यात आली आहे... असे अनेक अनुवाद करण्याजोगे लेख अनेक महिने मराठी विकिपीडियावर धूळ खात पडून आहेत. जी माहिती शाश्वत आहे, आणि जी माहिती मराठी विकिपीडियावर येणार्‍या वाचकाला वाचनाचे समाधान देईल, अशी माहिती यथाशक्ती भरून मग पुढे जाण्याऐवजी लेखसंख्येचा आणि विशिष्ट आकड्यांचे मैलाचे दगड पार करण्याचा सोस मराठी विकिपीडियावर याआधी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा विचार करण्याजोगी आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४९, २१ मार्च २०११ (UTC)

संकल्प,
विषयावर काही लिहिण्याआधी दोन गोष्टी लिहू इच्छितो.
१. येथील अनुभवी संपादक आणि प्रबंधक म्हणून तुझ्या मतांचा मला पूर्ण आदर आहे. हे लिहिलेले वाचून गैरसमज करुन घेणार नाहीस अशी आशा आहे.
२. खाली अनेक इंग्लिश शब्द आहेत, ज्यांसाठी मराठी शब्द पटकन सुचले नाहीत, चूभूद्याघ्या.
तुझ्या जी माहिती शाश्वत आहे, आणि जी माहिती मराठी विकिपीडियावर येणार्‍या वाचकाला वाचनाचे समाधान देईल, अशी माहिती यथाशक्ती भरून मग पुढे जाण्याऐवजी लेखसंख्येचा आणि विशिष्ट आकड्यांचे मैलाचे दगड पार करण्याचा सोस मराठी विकिपीडियावर याआधी झाला आहे. या वाक्याला माझा आक्षेप आहे.
वेळोवेळी ही चर्चा झालेली आहे आणि लेखसंख्याच सगळ्यात जास्त महत्वाची पार्टी विरुद्ध माहितीपूर्ण लेख असणेच जास्त महत्वाचे पार्टी यांनी आपापली मते मांडलेली आहेत. दोन्हीपक्षी आततायीपणाकडे झुकणारी विधानेही झालेली आहेत. यातून लेखसंख्या महत्वाची असली तरी त्यांतील माहिती पूर्ण असणे हेही महत्वाचेच असा समन्वयक मथितार्थ अनेकवेळा निघालेला आहे. या चर्चा चावडीवर शोध घेतला असता सहजी सापडतील.
येथे येणार्‍या संपादकांना दोहोंपैकी कोणतेही उद्दीष्ट महत्वाचे असू शकते. त्यांना हेच करा, हे अजिबात करू नका असे सांगताना आपणच आपल्या (मराठी विकिपीडियाच्या) पायावर धोंडा पाडून घेऊ. ज्याला जे करायचे ते तो करो (अर्थात, येथील येथील माहितीच्या रचनेबद्दल व सत्यतेबद्दल काळजी घेउनच करो) हे मुक्ततेचे धोरण आत्तापर्यंत आपण राबवलेले आहे आणि त्यात बदल करण्याचे काही कारण मला दिसत नाही. एखाद्याला येथील लेखसंख्येबद्दल काळजी वाटली तर तो ती वाढवेल. अजून एखाद्याला येथील माहितीच्या परिपूर्णतेबद्दल काळजी वाटली तर तो ती वाढवेल. एखाद्याला येथील कचरा बघवत नसेल तर तो कचरा काढेल. अजून एखाद्याला काहीच आवडले नाही तर तो विकिपीडियाचा नाद सोडून आपल्या ब्लॉगांवर स्वतःची टिमकी वाजवेल. प्रत्येकाला आपल्याला आवडणारे काम करण्याची पूर्ण मुभा आहे (पुन्हा एकदा - माहितीरचना आणि सत्यता अबाधित ठेवूनच). अमक्याने हेच केले पाहिजे, तमक्याने तेच केले पाहिजे हे विकिपीडियावरील मुक्ततेच्या धोरणाच्या अगदी विरुद्ध आहे. अशा धोरणाला माझा कधीच पाठिंबा नसेल.
सोस असण्याचे म्हणलास तर लेखसंख्येकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे (भारतीय सुद्धा) विकिपीडिया आहेतच की? पाच/पन्नास/हजार लेख, कितीही सुंदर असले, तरी तो माहितीचा साठा ठरत नाही. फारतर फुटबॉल/क्रिकेट/साहित्यिक/इतरविषयक तुरळक आकाराच्या माहितीचा साठा असे त्याचे वर्णन होईल. असे साठे महाजालावर पैशाला पासरी आहेत. असा माहितीसाठा तयार करताना पुढच्या ५ दिवस, ५ आठवडे, पाच महिने, पाच वर्षांचा अगदी डिटेल्ड प्लॅन असून तो काटेकोर पणे राबवणे अत्यावश्यक आहे. येथील उपलब्ध मनुष्यबळ पाहता असा प्लॅन करणे सुतराम शक्य नाही आणि हा प्लॅन न बदलू देणे तर शक्य नाहीच नाही. प्लॅन न करता असा माहितीसाठा लिहिण्यास घेतला तर लेख पूर्णत्वाकडे आले की नवागतांना तसेच इतरांनाही आता काय करायचे, असा प्रश्न पडेल. वरील मॉडेल म्हणजे mentor-led लेखनाचे उदाहरण आहे, ज्यात अनुभवी, जुने संपादक इतरांना काय करायचे ते सांगतात. क्राउड-सोर्स्ड कोलाबोरेटिव्ह मॉडेलमध्ये हे बसत नाही.
माझे स्वतःचे मत वर उद्धृत केलेले आहे आणि त्यासाठी मी (आणि माझ्यासारखी विचारसरणी असलेले माझ्या-तुझ्यासारखेच अनेक संपादक) अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक विकिपीडियावरील प्रत्येक व्यक्तींचे मत असेच असले पाहिजे असे नव्हे. असे नाही हे तू दिलेल्या दुव्यांवरुन उघडच आहे. आधीच येथे संपादकांची वानवा आहे, त्यात अमुक नका करु तमुक नका करु असे सांगून त्यांना हतोत्साहित करणे आपल्या हिताचे नाही. लेखसंख्या पाहिजे की माहितीची परिपूर्णता यावर तोचतो काथ्याकूट करण्यापेक्षा रिकाम्या/परभाषेतील लेखांत कमीतकमी प्रयत्नांनी भर कशी घालता येईल (सांगकामे, संपादनेथॉन, ऑनलाइन/ऑफलाइन प्रचार) याचा विचार करुन त्यावर आपले बळ खर्च करुयात.
अभय नातू १९:३९, २१ मार्च २०११ (UTC)
  1. (इंग्लिश भाषेत) http://lists.wikimedia.org/pipermail/wikimediaindia-l/2011-March/002604.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

'विकिमीडिया इंडिया'वरील टिनू चेरियन हे विकिपीडिया सदस्य भारतीय भाषांतील विकिपीडियांबद्दल भारतातील एका राष्ट्रीय स्तरावर खप असलेल्या नियतकालिकासाठी लेख लिहिणार आहेत. त्यासाठी काही अनुभव/अवतरणे/विचार आजमावण्यासाठी त्यांनी भारतीय भाषांतल्या विकिपीडिया प्रकल्पांमध्ये सक्रिय असलेल्या सदस्यांना/ प्रचालकांना हे जाहीर आवाहन केले आहे.

अधिक काही

संपादन
आपण सगळेच घरचे खाउन लष्करच्या भाकर्‍या भाजत आहोत. फुकटच्या भाकर्‍या अर्ध्याकच्च्या असण्याची शक्यता आहे, हे खाणार्‍यालाही ठाउक असतेच आणि येथेतर त्या भाजून घेण्याचीही सोय आहे.
मराठी विकिपीडिया आत्ता ज्या अवस्थेत आहे ती परिपूर्ण अवस्था नव्हे. अजून १, २, १० वर्षांनी त्याची अवस्था तुला अभिप्रेत आहे त्याकडे जाणार यात शंका नाही. आजच (अगदी नजीकच्या काळात) तसे व्हावे असा हट्ट धरणे वस्तुस्थिती पाहता शक्य नाही. अगदी १ वर्षापूर्वीचा मराठी विकिपीडिया आणि आजचा विकिपीडिया यातील फरक अगदी जमीनअस्मानाचा नसला तरी लक्षणीय आहे हे तुलाही मान्य असेलच. आज ३,००० लेख चांगल्या अवस्थेत आहेत, उद्या ३,००१ होतील आणि वर्षभरात ५,००० झाले पाहिजेत हे उद्दीष्ट मनांत ठेवून वाटचाल केल्यास ते होणे अशक्य नाही.
त्याचप्रकारे अजून एखाद्याला आज ३२,९५२ लेख आहेत, उद्या ३३,००० आणि वर्षभरात ५०,००० लेख झाले पाहिजेत ही मनीषा असणे सहज शक्य आहे.
आकड्यांचे म्हणलास तर एखाद्या लक्ष्याकडे वाटचाल करताना ते लक्ष्य काय आहे आणि अजून किती वाट राहिली आहे हे कळले तर वाटचाल सोपी होते आणि फोकस्डसुद्धा राहते. आज आपल्याकडे सांख्यिकीमध्ये अनेक लक्ष्ये आहेत - लेखसंख्या, एकूण विकिपीडियांमधील मराठीचा क्रमांक, इ. त्याचप्रमाणे माहितीची प्रत (क्वालिटी) ढोबळमानाने ठरवणारी लक्ष्ये सुद्धा उपलब्ध आहेत (आशयघनता, एकूण संपादने, एकूण पाने, प्रत्येक विकिपीडियावर असायला पाहिजे असे १,००० लेखांचा आकार, इ.). अजून काही निर्मिता आली तर उत्तमच.
असो, यात तुला उपदेश करण्याचा मुळीच मानस नाही तर तुझ्या मनातील मराठी विकिपीडियाबद्दलच्या कळकळीचे कौतुकच आहे आणि तुला अभिप्रेत असलेला विकिपीडिया कसा साकार होईल याबद्दलची माझी मते येथे व्यक्त केली. राग मानून घेणार नाहीस याची आशा पुन्हा एकदा प्रकट करतो.
अभय नातू २०:०१, २१ मार्च २०११ (UTC)
बाप रे! चर्चेने भलतेच अनपेक्षित वळण घेतले. :) असो. रागाबिगाचा प्रश्न नाही. कारण या तिकडच्याबातम्या इकडे आणायचे कारण मराठी विकिपीडिया सदस्यांना अन्य विकिपीडीयांवरील घडामोडींची माहिती मिळून त्यातून काही कल्पना/धडे (पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने) उमगण्यास चालना मिळेल.

या विकिपीडियास मुक्त म्हणावयाचे का अनुभवी लोकांची जहागिर ?

संपादन
मराठी विकिपीडियात अनुभवी सदस्य नवागत अनामिक सदस्यांना तुसडेपणाची वागणूक का देतात ? या विकिपीडियास मुक्त म्हणावयाचे का अनुभवी लोकांची जहागिर ? 41.155.114.96 १९:०७, २१ मार्च २०११ (UTC)
तुम्हाला आलेल्या तुसडेपणाचा अनुभवाचे उदाहरण द्याल?
आपण येथील सदस्यत्व घेतले नसले तर ते घेउन संदेश लिहाल?
असे केल्यास तुम्हाला अनुभवाबद्दल अधिक लिहिता येईल.
अभय नातू १९:०९, २१ मार्च २०११ (UTC)
तुम्हाला कोरडेपणा म्हणायचे आहे का? तर तसे नवीन असतांना वाटू शकते, कारण हा काही फोरम किंवा ब्लॉग नाही. त्यामुळे आपण लिहिलेया कामावर प्रतिक्रिया न येता सरळ संपादन येते! ;) पण हा फरक समजून घेतला पाहिजे. जर आपल्याला ते संपादन पसंत नसेल तर ते पूर्ववत करण्याची सोय असतेच. त्या शिवाय ते का असावे/नसावे याविषयी चर्चापानावर चर्चाही होऊ शकते. योग्य प्रकारे चर्चा मांडली तर आपले लेखन पूर्ववत होऊ शकते. हे मी केले आहे. मात्र या शिवायही आपण मुळात मी येथे येतो ते मराठीच्या प्रेमापोटी आणि आपल्या आनंदासाठी, 'मला हे काम करायला आवडते' म्हणून. या शिवाय माझी आधीच मानसिक तयारी असते की माझे लेखन, संपादन माझ्याशिवायही कुणीतरी बदलेल बदलू शकेल. असो, तुमचा अनुभव वेगळा असल्यास तसे येथे लिहायला काही हरकत नसावी निनाद २३:३१, २१ मार्च २०११ (UTC)

साचा मदत

संपादन

सातवाहन साम्राज्य या लेखातील

  • सिमुक
  • सातकर्णि
  • गौतमीपुत्र सातकर्णि
  • वासिष्ठी पुत्र पुलुमावि
  • कृष्ण द्वितीय सातवाहन
  • राजा हाल
  • महेन्द्र सातकर्णि
  • कुन्तल सातकर्णि
  • शकारि विक्रमादित्य द्वितीय

राजांची सूची प्रत्येक पानावर दिसण्यासाठी साचा हवा आहे. निनाद ०९:५०, २३ मार्च २०११ (UTC)

निनाद,
साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते हा पहा.
अभय नातू १४:३५, २३ मार्च २०११ (UTC)
  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:

"बाळ" हे पान वाचले आणि मला काही शंका मनात आल्या

संपादन

बाळ या लेखात बाळाविषयी माहिती अपेक्षित आहे. जसे की नवजात बाळ, त्याचे सरासरी वजन , उंची, हालचाली इत्यादी. तेव्हा "बाळ" या नावापासून सुरु होणाऱ्या नावांचे प्रयोजन काय? विश्वकोशाच्या चौकटीत हे बसते काय? मला असे वाटते की या विषयाचा वेगळा लेख केलेला जास्त चांगला .....

उद्या 'वाघ' या लेखात वाघाच्या माहितीबरोबरच कोणी 'वाघ' या आडनावाच्या माणसांची यादी किंवा माहिती दिली चालेल का? जसे - मोहन वाघ इत्यादी.

मंदार कुलकर्णी

नावात बाळ

संपादन

नावातील बाळाबद्दलची माहिती वेगळ्या उपशीर्षकात तूर्त घातली आहे. त्याचे वेगळे पान करावे कि नाही यावर मते पाहिजेत.

आता विद्या बाळ किंवा पी. बाळू यांनी आपल्या बाळाचे नाव बाळ ठेवले तर गंमत होईल :-S

अभय नातू १७:४६, २२ मार्च २०११ (UTC)

ता.क. - बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख उपरोधाने टी. बाळू असा झालेला ऐकला आहे, पण त्याला लेखात बहुधा जागा नसावी.

उपशीर्षकउपशीर्षकाने हेतू साध्य झाला आहे. वेगळे पान केले तर ’नावात बाळ’ असा शोध कोणी घेईल असे वाटत नाही. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव बाळ आहे, पण आणखी काही आठवत नाही असा प्रसंग ओढवू शकतो. (हा लेख लिहिताना अनेकदा झाला.) त्या व्यक्तीच्या आडनावाचा शोध कसा घेणार? बाळ या लेखात प्रत्येक नावाला दुवे दिल्यामुळे हा अडचण दूर होऊ शकते. अर्धवट माहिती असणार्‍याला पूर्ण माहिती मिळवून देणे हाच तर विकीचा उद्देश आहे.

वाघ आडनावाची पुरेशी प्रसिद्ध माणसे आढळली तर ’बाळ’प्रकारचाच ’वाघ’ असा लेख लिहायला हरकत नसावी.-- J १८:४८, २२ मार्च २०११ (UTC)

उपशीर्षक योग्य आहे का?

संपादन

मला उपशीर्षक देणे फारसे योग्य वाटत नाही. जर एकाच नावाच्या २ गोष्टी असतील किंवा एकाच नावाचे २ संदर्भ असतील तर आपण विकिपीडिया मध्ये

.....याच्याशी गल्लत करू नका.

  • आणि नि:संदिग्धीकरण करून उदा.

"हा लेख अभिव्यक्ती प्रकटहोण्याची प्रक्रीया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अभिव्यक्ती (नि:संदिग्धीकरण)."

उदा. "व्यक्तिमत्त्व किंवा व्यक्तित्व याच्याशी गल्लत करू नका." अशा प्रकारे वापरतो. मग बाळ आणि बाळ नावाच्या / आडनावाच्या गोष्टी एकाच लेखात का घालायच्या?

आपण बाळ(आडनाव/नाव) असे शीर्षक देऊन नवीन लेख लिहायला हवा. जो शोधायला ही सोपा जाईल. आणि दोन्ही मध्ये

"........ याच्याशी गल्लत करू नका."भरून संदर्भ ही देता येईल.

हा नियम विकीपेडिया वरील सर्व लेखांना लागू करावा अशी माझी नम्र विनंती आहे. तरी तज्ञ आणि अनुभवी मंडळींनी मत व्यक्त करावे ही विनंती ....

मंदार कुलकर्णी

बाळ या लेखात मानवी बाळांबद्दल माहिती लिहिणे अधिक औचित्याचे ठरेल. 'बाळ' या आडनावाबद्दल बाळ (आडनाव) या शीर्षकाचा लेख लिहून त्यात आडनावाबद्दल बाळ आडनावाच्या व्यक्तींच्या सूचीविषयी माहिती नोंदवावी. याशिवाय बाळ (निःसंदिग्धीकरण) हे पान तयार करून त्यात 'बाळ' व 'बाळ (आडनाव)' या दोन्ही लेखांची (तसेच अन्य संबंधित लेखांची) सूची जोडावी.
अधिक तपशील जाणण्यासाठी गरुड (निःसंदिग्धीकरण) हा लेख, किंबहुना वर्ग:निःसंदिग्धीकरण वर्गातील अन्य कोणतेही लेख बघावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:२९, २४ मार्च २०११ (UTC)
विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण हे पानही सवडीनुसार पहावे माहितगार १८:४९, २४ मार्च २०११ (UTC)

'बाळा'त काही बदल....

संपादन

'बाळ' या लेखात मी काही बदल केलेले आहेत, माझ्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर सुचवाव्यात. वेळे अभावी संपादना मर्यादा आहेत, परंतु एक नवोदीत प्रयोग......

सदस्य:Dr.sachin23

क्रिकेट विश्वचषक मुखपृष्ठावर

संपादन

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट विश्वचषक, २०११ हा लेख मराठी विकिपीडीयाचे मुखपृष्ठ सदर केला आहे.

अभय नातू १८:०१, ३ एप्रिल २०११ (UTC)

क्रिएटीव कॉमन्स

संपादन

क्रिएटीव कॉमन्स परवान्यांबाबत चावडीवर किंवा माझ्या सदस्य पानावर सदस्य:Dr.sachin23 मार्गदर्शन करावे. त्याबाबत मी वाचन्याचा प्रयत्न केला परंतु त्यात मला फार उमगले नाही, त्याबद्दल मार्गदर्शन करावे जेणे करुन माझ्या व इतरांच्या माहितीमध्ये भर पडेल.

माझ्या खेडवळ भाषेबद्दल आक्षेप असल्यास कळवावे.

Dr.sachin23 १५:०१, ४ एप्रिल २०११ (UTC)

क्रिएटिव्ह कॉमन्स परवाने हे प्रतिभावंतांच्या प्रतिभेची कदर राखत कलाकृतीच्या वापराविषयीच्या परवानग्या किंवा प्रतिबंध विशद करणारा परवान्यांचा संच आहे. विकिपीडिया व संलग्न प्रकल्पांवर यांतील 'क्रिएटिव्ह कॉमन्स बाय' (इंग्लिश: CC-BY; थोडक्यात मूळ कलाकार किंवा स्रित यांच्या उल्लेखासाठी श्रेयनामावली लिहून व परवान्याविषयी माहिती नोंदवून वापरण्याची परवानगी असलेल्या कलाकृती) किंवा 'क्रिएटिव्ह कॉमन्स बाय शेअर-अलाइक' (इंग्लिश: CC-BY-SA ; म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्स बाय परवान्यासारखाच; मात्र अजून एक भर म्हणजे परवान्याने अंकित कलाकृती वापरून तुम्ही केलेले काम/कलाकृतीदेखील तुम्हांला क्रिएटिव्ह कॉमन्स बाय शेअर-अलाइक परावान्यांतर्गत वापरासाठी खुले करावे लागते.). अर्थात यासंबंधी अजून तपशीलात माहिती लिहायला हवी, हे खरेच. या आठवड्यात जमल्यास या संदर्भात काही माहिती भरायचा प्रयत्न करेन.
बाकी, भाषा खेडवळ असणे/नसणे यावरून इथे सहसा कोणी ग्रह करून घेणार नाही आणि तुम्हीही अजिबात संकोच बाळगू नये. मात्र विकिपीडियावरील लेखांचा दर्जा प्रमाणित राहावा, यासाठी प्रमाणभाषेनुसार व्याकरण व शुद्धलेखनाचे नियम पाळण्याचा विकिसंकेत आहे. त्यानुसार प्रत्येकाने सवडीनुसार जमेल तेव्हा शुद्धलेखनाचे नियम अभ्यासावेत आणि संपादन करताना त्यानुसार आपले लेखन शक्य तितके निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा. आणि तरीही काही चुका राहून गेल्यास, येथील अन्य सदस्य मदत करायला, कालौघात दुरुस्त्या करायला आहेतच.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३९, ४ एप्रिल २०११ (UTC)

संगणकप्रणाली आणि त्यातील घटकांचे लेख

संपादन

नमस्कार,

आपण मॅक ओएस, विंडोझ, इ. संगणकप्रणालीघटकांबद्दल अनेक लेख तयार केलेले आहेत. याबद्दल काही निरीक्षणे आणि सूचना -

१. बव्हंश लेख बिन माहितीचे आहेत. यात चार-पाच ओळींची तरी भर घालावी म्हणजे हे घटक काय आहेत, काय करतात, इ.ची जुजबी का होईना माहिती मिळेल.

२. अनेक लेखांची शीर्षके मिंग्लिशमध्ये आहेत, उदा. डिव्हाइस व्यवस्थापक, सिस्टिम पॉलिसी संपादक, इ.

यांची शीर्षके पूर्ण इंग्लिशमध्ये तरी असावीत किंवा पूर्ण मराठीत.
जेथे विशेषनाम असते तेथे मराठीकरण करू नये. विंडोझ एक्स.पी. --> खिडक्या क्ष.प.; मॅक ओएस स्नोलेपर्ड --> मॅक ओएस हिमबिबट्या, इ.
विशेषनाम नसलेल्या शब्दांचे मराठीकरण चालेल. फाइल मॅनेजर --> संचिका व्यवस्थापक, प्रॉब्लेम रिपोर्टिंग अँड आन्सर्स --> समस्या अहवाल व उत्तरे, इ.
मराठीकरण करताना अतिकिचकट शब्द वापरू नये. जर दुसरा शब्द नसेल तर इंग्लिश शब्दच ठेवावा.

३.लेखाचे शीर्षक बदलले की संबंधित साच्यातही बदल करावे.

अभय नातू १२:२३, ६ एप्रिल २०११ (UTC)

नमस्कार

संपादन

खूप आधी विकिवर मोरनाची म्हणजे काय असा प्रश्न पाहिल्याचे आठवते. प्रश्न कोणी विचारला होता ते आठवत नाही, त्याचा संदर्भ येथे देत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर मृग नक्षत्र लागल्यावर जंगलातील गवताळ भागात मोर जमा होतात. अशा ठिकाणचे गवत साफ करून रिंगण तयार केले जाते. या रिंगणात अनेक नर नाचतात, मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या जागेला मोरनाची असे म्हणतात. पक्ष्यांचा अभ्यास करतांना मी हे पाहिले आहे. विदर्भात याला मोरनाची असे म्हणतात, अन्यत्र काही वेगळे नाव असल्यास माहीत नाही. संदर्भ मारुती चितमपल्ली यांचे रानवाटा पुस्तक, प्रथमावृत्ती १९९१, पा. क्र. १४४. gypsypkd (चर्चा) ११:४०, ८ एप्रिल २०११ (UTC)

203.115.69.51 ०९:२०, १२ एप्रिल २०११ (UTC)ठळक मजकूर

  • माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती:
  1. ...
  2. ...





धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
203.115.69.51 ०९:२०, १२ एप्रिल २०११ (UTC)

मी केलेली संपादने......

संपादन

मी केलेली संपादने इतर सन्मानीय सदस्यांना आवड नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मला निराशा वाटत आहे, त्यामुळे मी संपादने न नोंदवण्याचा निर्णय घेण्याचा चालवला आहे. माझ्या संपादनांमध्ये प्रगल्भता नसल्या सारखे इतरांना वाटत असावे.

Dr.sachin23 ०४:५९, १८ एप्रिल २०११ (UTC)

भाषांतर मदत

संपादन

खालील पानांचे भाषांतर त्वरेने करुन हवे आहे.

अभय नातू १७:४६, २० एप्रिल २०११ (UTC)

मिडियाविकि प्रणालीकरीता नवीन सुधारणा विनंत्या

संपादन

मी बगझीलावर खालील दुव्यांवर काही सुधारणा विनंत्या केल्या आहेत.(खरेतर मी मराठी विकिपीडियाव्र अद्दाप चर्चा केलेली नाही त्यामुळे त्याविनंत्या बगझीलावर वाचून अजून काही सुधारणा सुचना असल्यास तेथल्या तेथे मांडावी हि नम्र विनंती.

१)28683

२)28684

माहितगार १६:०८, २४ एप्रिल २०११ (UTC)