मोहम्मद अली जिना

पापी और दंगा मचानेवाला,नीच, भारतीयों का हत्यारा
(मोहमद अली जिना व त्यांचा द्विराष्ट्रवाद या पानावरून पुनर्निर्देशित)

मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; Hi-Muhammed Ali Jinnah.ogg उच्चार ) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.

मोहम्मद अली जिना (1945)

द्विराष्ट्रवाद

संपादन

प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.

१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला.

बाह्य दुवे

संपादन