मुंगी (शेवगाव)

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील पैठणजवळील मुंगी हे गाव गोदावरीच्या किनारी वसल
(मुंगी-पैठण या पानावरून पुनर्निर्देशित)

मुंगी हे पैठणहून जवळ गोदावरी नदीच्या किनारी वसलेले [ दुजोरा हवा] भारताच्या महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातले एक गाव आहे.

  ?मुंगी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पैठण
प्रांत महाराष्ट्र
जिल्हा अहमदनगर
तालुका/के शेवगाव
लोकसंख्या ६,६११ (२०११)
भाषा मराठी

स्थान

संपादन

मुंगी गाव पैठणपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. पैठण तालुक्याच्य गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या नायगाव गावाच्या पैलतीरावर मुंगी हे गाव वसलेले असून त्याचा उल्लेख मुंगी (पैठण) असाही केला जातो.[ दुजोरा हवा]

इतिहास

संपादन

मराठी विश्वकोशातील देगलूरकर, गो. ब. यांच्या मतानुसार, १८६५ मध्ये वायने या भूगर्भशास्त्रज्ञाला पैठणजवळ मुंगी येथे मध्यपराश्मयुगीन दगडी हत्यारे मिळाली.[] महाराष्ट्रात मिळालेली ही पहिली अश्मयुगीन हत्यारे होत.. डॉ. र.सु. पप्पू यांच्या मतानुसार पैठण जवळील मुंगी या ठिकाणी सापडलेल्या हत्यारांपासून महाराष्ट्रातील अश्मयुगीन संशोधनाची सुरुवात झाली आहे.[]

फेब्रुवारी २८, इ.स. १७२८ रोजी पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्यहैदराबादचा निझाम यांच्यातील पालखेडच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती. पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावात मार्च ६, १७२८ रोजी तह स्वीकारला. [ संदर्भ हवा ]

धार्मिक आणि सांस्कृतिक आख्यायीका

संपादन

१३व्या शतकातील(?) द्वैताद्वैत सिद्धांताचे आणि संप्रदायाचे प्रतिपादक निम्बर्काचार्य(निम्बकाचार्य) यांचे मुंगी येथे मंदिर आहे. मुंगी हे निम्बकाचार्यांचे जन्म गाव असल्याचा उल्लेख मराठी वृत्तपत्रातून आहे. (जन्म गावाचे काही उल्लेख आंध्रप्रदेशातील आहेत)[][]

१४ व्या शतकात मुंगी पैठण हे माहेर असलेल्या रमाबाई या विठ्ठल भक्त सून म्हणून पंढरपूरच्या महाजन बडवे यांच्या घरी लग्न करून गेल्या. २१ दिवसांच्या उपवासानंतर त्यांना श्री विठ्ठलाचे बाल रूपात दर्शन झाले. रमाबाईंनी विठ्ठलाला ताक पीठ कालवून दिले. देवाने रमाबाईकडे ताक पीठ खाल्ले या आख्यायिके वर आधारीत पंढरपूर येथे ताकापिठे विठोबा नावाचे मंदिर बनवले गेले.[]

मुंगी-पैठण श्री कृष्णदयार्णवांच्या सांप्रदायिक सनातन मठ आहे. श्री. वा.ल. मंजूळ यांना "आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक" या श्री तुळजाभवानी स्तोत्र या ग्रंथाचे लहानसे हस्तलिखित मिळाले []

ओवी लोककाव्यातील उल्लेख

संपादन

" ...
ज्या गावात आई-बाप त्या गावाच मला याड
सयानू किती सांगू तिथं गारव्याच झाड ।
लगिन चिठ्ठी लिवा, माझ्या त्या माहेराला
बया मालनीची मुंगी पैठण आहेराला ॥
.... "[]

लोकसंख्या

संपादन

२००१ च्या जनगणनेनुसार ५,२६८ एवढी मुंगी गावाची लोकसंख्या होती.त्यात स्ञी लोकसंख्या - २,३५५ व पुरुष लोकसंख्या - २,९१३ होती.व

२०११ च्या जनगनणेनुसार गावाची लोकसंख्या ६,६११ इतकी आहे.त्यामध्ये स्ञी लोकसंख्या - ३,१४९ व पुरुष लोकसंख्या - ३,४६२ आहे. • एकूण कुटूंबे - १,३१२ • एकूण मनुष्यबळ - ३,५१६ • शेतकरी - १,७८५ • शेतमजूर - १,०२९ • ६ वर्षाखालील बालके - ९८७ • अनुसूचित जातीची लोकसंख्या - ९६२ • अनुसूचित जमातीची लोकसंख्या - २४८

प्रशासन

संपादन

• ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५१ • ग्रामपंचायत सदस्य संख्या - १३ • एकूण वाॅर्ड - ५ • एकूण मतदार - ४३९५ • महसूल मंडळ - चापडगाव • सजा/तलाठी - मुंगी • पं.स. गण - मुंगी • जि.प. गट - बोधेगाव • विधानसभा मतदारसंघ - शेवगाव (२२२) • लोकसभा मतदारसंघ- अहमदनगर (दक्षिण)

अर्थव्यवस्था

संपादन

। मुंगीचे भौगोलिक क्षेत्र -३०३०.१४ हेक्टर । • कृषी क्षेत्र -२७२७.५१ हेक्टर । • सिंचना खालील क्षेत्र -३०४८.९४ हेक्टर । • अन्य क्षेत्र -३०७.६३ हेक्टर । • प्रमुख पिके – गहू, ज्वारी, बाजरी, कापूस व ऊस[] । मुंगी गावठाण क्षेत्र :- ४५-५० एकर । मुंगी गोदापाञातील वाळू उत्कृष्ट दर्जाची असल्यामुळे येथे वाळू व्यवसायही चांगला रूजला आहे. तसेच गावात दर सोमवारी आठवडी बाजार भरतो.

जलसिंचन

संपादन

मुंगीपासून ५ किमी अंतरावर आपेगांव येथे गोदावरी नदीवर बंधारा आहे. त्याच्या बॅकवाटरचा फायदा गावातील शेती सुजलाम-सुफलाम होण्यास झाली आहे. सन २०१६ अखेरपर्यंत जवळपास ३००-३५० शेतकय्रानी गोदावरी नदीवरून शेतात पाईपलाइन आणली आहे. तसेच गावातील शेतीला जायकवाडी उजवा कॅनाॅल व त्याच्या ०४ चाय्रा पाणी पुरवतात.त्याबरोबरच गावातील शेतकय्रांकडील विहीरी, कुआॅ, बोअरवेल यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. गावाला जवळपास ०५ किमी लांबीचा गोदावरी नदीचा किनारा लाभला आहे, तसेच तिच्या ०३ छोट्या उपनद्याही गावशिवारातून वाहतात.

इतर सुविधा

संपादन

। *वि.वि.का.सेवा सोसायटी* - ०१

। *बँका* - ०३ (एडीसीसी बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया )

। *पाणी पुरवठा* ~ ग्रा.पं.विहीर - ०२ ( गोदावरी नदीकाठावर व नवीन खामपिंप्री येथे) ; पाण्याची टाकी - ०१ (क्षमता- १० लाख लिटर्स)

। *शिक्षण* ~ • अंगणवाड्या - ०६. • प्रि-प्रायमरी स्कूल (इंग्लिश मिडीयम) - ०१ • प्राथ. शाळा - ०१ (१ली ते ४ थी) ; • हायस्कूल + ज्यूनि. कॉलेज - ०१ ( ५ वी ते १० वी आणि ११वी-१२ वी आर्टस् )

। *आरोग्य* ~ • प्राथ.आरोग्य उपकेंद्र - ०१  ; • खाजगी दवाखाने - ०४ • मेडिकल - ०२

। *स्वच्छता* ~ • गावातील नाल्या/ ओपन ड्रैनेज (लांबी) :- २.५ - ०३ किमी

। *दूरसंचार* ~ • बीएसएनल ब्राॅडबॅड √ • मोबाईल टाॅवर्स - ०४ ( रिलायन्स,आयडिया+वोडाफोन,एअरटेल,एअरसेल )

। *वीज पुरवठा* ~ • एकूण डीपी - ०६ सिंगल फेज (मुंगी गावठाणात) • शेतशिवारातील डीपी :- ३०-३५ थ्री फेज • पाॅवर सबस्टेशन - हातगांव येथील

• स्वस्त धान्य दुकान - ०१ • किराणा दुकान - १३ • राॅकेल विक्रेते - ०३ (शासनमान्य) • स्टेशनरी - ०३ • कापड दुकान - ०२ • फोटो स्टुडिओ - ०२ • मेन्स पार्लर - ०४ • टेलर दुकान - ०९ • कृषी सेवा केंद्र(खते,बी-बियाणे) - ०३ • लाॅड्री (इस्ञी दुकान) - ०३ • टी अँड कोल्ड्रिंक्स सेंटर - ०६ • हाॅटेल्स (नाश्ता सेंटर) - ०२ • ढाबा - ०२ • पानटपरी - ०५ • मोबाईल शाॅपी - ०४ • इलेक्ट्राॅनिक्स दुकान - ०२ • मोटार रिवायडिंग वर्क्स - ०३ • ज्वेलर्स - ०२ • बांगडी दुकान - ०२ • RO फिल्टर वाॅटर सप्लायर्स - ०१ • वेल्डींग वर्क्स - Shivhari Taksal (shivtej wark's) • सुतारकाम - ०२ • शूज-चप्पल दुकान - ०१ • वाॅशिंग सेंटर - ०१ • पंक्चर गॅरेज - ०३ • सायकल मार्ट - ०२ • दूध संकलन केंद्र - ०१ • वीट-भट्टी - ०३ • कापूस खरेदी केंद्र - ०३ • चिकन शाॅप - ०४ • एग्ज सेंटर - ०२ • मासे विक्रेते - ०2 • लोहार काम - Shivhari Taksal,pagan Taksal,

सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक इ. अंगे/घटक

संपादन

• सार्वजनिक मंडळे - ०५ • भजनी मंडळे - ०२ • मंदिरे - १३ • मस्जिद - ०२ • बचत गटे -

दळणवळणाची माहिती

संपादन

पैठण-पंढरपूर पालखी मार्ग (NH 752E) हा नॅशनल हायवे गावातून जातो. मुंगी गावातून दररोज सकाळी ६:३० वाजता आदल्या दिवशी मुक्कामी आलेली बस शेवगावला परत जाते. त्यानंतर शेवगाव बसस्थानकातून ८:१५, १०:२५, १:०० दु. व ५:४५ संध्या.(मुक्कामी)या वेळेस बस मुंगीसाठी सुटतात. ह्याव्यतिरिक्त गावात खाजगी प्रवाशी वाहनेही आहेत. • मुंगी-शेवगाव अंतर - ३० किमी • मुंगी-पैठण अंतर - १२ किमी • मुंगी- बोधेगाव अंतर - १६ किमी

  • गावातील वाहनांची संख्या* ~

• मोटारसायकल :- ५००-६०० • ३चाकी रिक्षा :- ०५ • पिकअप / टेम्पो - ०४ • जीप :- १२ • कार :- ११ • ट्रॅक्टर :- ३०-४० • ट्रक/ डंपर :- ३०-३५ • जेसीबी - ०२

• गावातील अंतर्गत रस्ते (लांबी) - ०३ किमी • मुंगी-खामपिप्री आपतकालीन रस्ता (लांबी) - ०४ किमी (प्रकार - कच्चा) • मुंगी-पिंगेवाडी रस्ता (लांबी) - ०५ किमी (प्रकार - कच्चा) • जुना हातगांव-मुंगी रस्ता (लांबी) - ०५ किमी (प्रकार - कच्चा) • जुना बोरगांव-मुंगी रस्ता (लांबी) - ०४ किमी (प्रकार - कच्चा)

गावातील आडनावे

संपादन

•राजेभोसले गायकवाड,दसपुते,तनपुरे,पवार,खरात,पानखडे,थोरात,सोमवंशी,सूर्यवंशी,मोहिते •गोर्डे,तांबे,कवात,मुरदारे,खुरमूरे,ठोंबरे,तट्टू,लांडे,मरळ, भोसकर,नरवडे, सोजाळ,झिरपे,मोटकर,घूले,आवारे,पठाडे •ढमढेरे,समिंदर,जाधव,हिंगे,मोरे,ठुबे,साळूंके,काटे,बर्डे, देशमुख,गरड,चपडे,सगळे,थोरात,शिंगाडे,काकडे,कवडे,काळे,शिंदे,मगर,कदम,अब्दागिरे,गिरगे,साबळे,गवांदे,चव्हाण, बिरंगळ,फडके,भोईटे,पोकळे,सुरासे,इंगोले,घाडगे,बल्लाळ, तावरे,भोसले,जगदाळे,शेळके,मरकड,दूसूंगे,माताडे,नाबदे, इथापे,खरात •जोशी,नाईक,सावरकर,फलफले •गव्हाणे,सोनटक्के,घोटाळे,रक्टे,सोलाट,गाभूड,नरोटे,होळकर,आनुरे,नारे,हूगे,भुसारी,भिसे,साबळे,तोतरे,देवढे,देशमुख,बोंबले येळवंते,काळे,मिसाळ,वीर,चोपडे,वाघमारे,भोंडे,पिंपळे,गाढे, मैंदड,जराड,घूमरे,पेंधे,लेंडाळ,मुंगीकर,सबलस •कटारीया,जाजू,सोनी •पानखडे,राऊत,भोंग,तूपे,केळकर,शिंदे •साळूंखे,कंगणकर,पानझडे,ढवळे,उंदरे •शेख,पठाण,पटेल,सय्यद,तांबोळी,आतार •आगे,खंडागळे, •सोनुले,गायकवाड •राऊत,चाफेकानडे,जिरेकर,वाघमारे,क्षीरसागर •टाकसाळ,पोपळघट.डाकुरकर •मगर,सोनवणे •तरटे,आदमाने •काळे,कासार,कुंभकर्ण •भारती,गिरी,गोसावी,मेघलेतर •साळूंके,कांबळे,जाधव,खंबाटे,वाल्हेकर,इंगळे,साबळे •दखने,खडके •पवार •जैस्वाल •पांडव,कूंढारे •आव्हाड,केदार,बारगजे,फुंदे,खेडकर,ढाकणे •सरोदे,बल्लाळ,पटवेकर,गायकवाड •घोरपडे,वाल्हेकर,ससाणे,गंगावणे,रोकडे,गवळी,जानराव, फटांगरे

संदर्भ

संपादन
  1. ^ मराठी विश्वकोश, लेख नाव: 'मराठवाडा', ~ गो.ब. देगलूरकर
  2. ^ पप्पू, डॉ. र.सु. पप्पू. [(http://some.दुवा.com जर आंतरजालावर उपलब्ध असेल तर) ('इतिहास: प्राचीन काळ (खंड १)')] Check |दुवा= value (सहाय्य) ((पुस्तक मराठी भाषेत नसेल तर, ज्या भाषेत आहे, and तिचे नाव) भाषेत). ३० रोजी पाहिले. (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]
  3. ^ http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-dudarshan-mahayadnya-srtarts-in-mungi-5052230-NOR.html
  4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar/maharashtra-sant/articleshow/48089918.cms[permanent dead link]
  5. ^ http://abpmajha.abplive.in/religion/2011/07/11/article212810.ece/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4[permanent dead link]
  6. ^ [दुवा हवा- २६ ऑक्टोबर २००१ च्या 'सकाळ'च्या दसरा विशेष पुरवणी] -संदर्भाचा संदर्भ : मी_आर्या - माय बोली संकेतस्थळ प्रतिसाद 28 January, 2010 - 02:37
  7. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-29 रोजी पाहिले.
  8. ^ http://www.mungi-shevgaon.mahapanchayat.gov.in/[permanent dead link]