माधव देवचके

(माधव देवचक्के या पानावरून पुनर्निर्देशित)

माधव देवचके (१६ जानेवारी, १९८४: मुंबई, महाराष्ट्र ) हा एक भारतीय दूरदर्शन ,चित्रपट अभिनेता आणि मॉडेल आहे जो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या कामांसाठी ओळखला जातो. याने फ्रेंडशिप अनलिमिटेड, प्रवास, जर्नी प्रेमाची, अगं बाई अरेच्चा २ चित्रपटांमध्ये काम केले आहे.[] २०१९ मध्ये तो रिॲलिटी दूरचित्रवाणी कार्यक्रम बिग बॉस मराठी २ पर्वाचा स्पर्धक होता.[][][] देवचके यांना मॅडी म्हणूनही ओळखले जाते.[][]

माधव देवचके
Maadhav Deochake (es); माधव देवचके (mr); Maadhav Deochake (de); Maadhav Deochake (pt); Maadhav C Deochake (en); Maadhav Deochake (pt-br); Maadhav Deochake (fr); Maadhav C Deochake (nl) actor (en); ممثل (ar); actor (en); դերասան (hy); актор (uk); অভিনেতা (bn) Maadhav Deochake (en); Maadhav Deochake (nl)
माधव देवचके 
actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी १६, इ.स. १९८४
मुंबई
व्यवसाय
उल्लेखनीय कार्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पूर्वजीवन आणि शिक्षण

संपादन

माधव यांनी शालेय शिक्षण आय.ए.एस. स्कूल (किंग जॉर्ज) मधून केले. त्यांनी आर.ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून बी.कॉम. मध्ये पदवी मिळविली. तो हिंदू कुटुंबातील आहे. माधव हा चारुदत्त देवचक्के आणि कांचन देवचक्के यांचा मुलगा आहे. माधवने १ डिसेंबर २०१४ रोजी बागेश्री जोशीशी लग्न केले.[] अभिनयात कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्याने अभिनयातील कौशल्य सुधारण्यासाठी अनेक थिएटरमधे काम केले.[]

अभिनय कारकीर्द

संपादन

माधव देवचके यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात २००६ पासून केली होती. माधवने २०१३ साली 'ईश्वरी' चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ज्याचे दिग्दर्शन नरेंद्र खुसपे यांनी केले होते. २००६ मध्ये तो पहिल्यांदा मराठी दूरचित्रवाणीवरील काटा रुते कुणाला या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. मराठी मालिकांसोबतच त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. २००८-२०१२ मध्ये त्यांनी हिंदी टीव्ही सीरियल 'हमारी देवरानी' मध्ये मोहन नानावटीची भूमिका साकारली होती. २०११ मध्ये त्यांनी बिंद बनूंगा घोडी चढुंगा मधील आदर्श पोद्दारची भूमिका साकारली होती. २०१३ मध्ये त्यांनी निनाद व्हेनेज दिग्दर्शित माझा मी हा चित्रपट केला होता.[] २०१७ मध्ये त्यांनी मोहन के ढगे या हिंदी मालिकेत अंशुलची भूमिका केली होती. या मालिकेचे प्रसारण सोनी टीव्हीवर केले जात होते.[१०][११]

माधव यांनी काटा रुते कुणाला, हा खेळ सावल्यांचा, घे भरारी, खेळ मांडला, देवयानी, दिल्या घरी तू सुखी राहा, तुझं माझं जमेना, गोठ, तुझं माझं ब्रेकअप, सरस्वती, अबोली अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. फ्रेंडशिप अनलिमिटेड (२०१७), अगं बाई अरेच्चा २ (२०१५), सिटीझन (२०१५) यासारख्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते. २०२० मध्ये त्यांनी शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवासी’ या मराठी चित्रपटात काम केले. त्याच वर्षी त्याने विजेता या सिनेमात भूमिका केली होती.[१२][१३]

अभिनयाची कामे

संपादन
मालिका (हिंदी आणि मराठी)
वर्ष मालिका भूमिका वाहिनी
२००६-२००८ काटा रुते कुणाला रोहन कर्णिक ई टीव्ही मराठी
२००८-२०११ हमारी देवरानी मोहन नानावटी स्टार प्लस
२०१५ सरस्वती कान्हा कलर्स मराठी
२०१२-२०१४ बिंद बनूंगा घोडी चढूंगा आदेश पोदार इमॅजिन टीव्ही
२००७-२००८ हा खेळ सावल्यांचा श्रीपाद मी मराठी
२००८ घे भरारी धनंजय इनामदार ई टीव्ही मराठी
२०११-२०१२ खेळ मांडला ऋषी मी मराठी
२०१२ देवयानी नमित स्टार प्रवाह
२०११-२०१२ दिल्या घरी तू सुखी राहा झी मराठी
२०१३ तुझं माझं जमेना क्रिश झी मराठी
२०१६ गोठ विक्रम जहागीरदार स्टार प्रवाह
२०१७ मोह मोह के धागे अंशुल सेट
२०१८ तुझं माझं ब्रेकअप रजनीश प्रधान झी मराठी
२०१९ बिग बॉस मराठी २ स्पर्धक कलर्स मराठी
२०२४ अबोली श्रेयस स्टार प्रवाह
चित्रपट
वर्ष चित्रपट भूमिका दिग्दर्शक
२०१३   ईश्वरी
२०१३   माझा मी निनाद व्हेनेज
२०१३ एकुलती एक सचिन पिळगांवकर
२०१४ चिंतामणी संगीत बालचंद्रन
२०१४ गोंदण विनिता पिंपळखारे
२०१५ अगं बाई अरेच्चा २ केदार शिंदे
२०१५ एक तारा अवधूत गुप्ते
२०१७ फ्रेंडशिप अनलिमिटेड महेश मांजरेकर
२०१७ जर्नी प्रेमाची अमोल भावे
२०२०   प्रवास शशांक उदापूरकर
२०२० विजेता अमोल शेडगे

बाह्य दुवे

संपादन

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील माधव देवचके चे पान (इंग्लिश मजकूर)


संदर्भ

संपादन
  1. ^ "कोण आहे माधव देवचक्के?". महाराष्ट्र टाइम्स. 2020-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "Vijeta: Bigg Boss Marathi Fame Madhav Deochake's Sportsman Look Is Appealing". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
  3. ^ "Bigg Boss Marathi Season 2 Fame Madhav Deochake Excited to Announce His New Film With Director Subhas Ghai". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
  4. ^ "माधव देवचक्केचे वडील म्हणतात की, "माधवचा मला खूप अभिमान आहे"". एबीपी माझा. 2019-06-18. 2020-05-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Madhav Deochake reveals some secrets about Bigg Boss Marathi 2 journey | TV - Times of India Videos". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-05-22 रोजी पाहिले.
  6. ^ "Bigg Boss Marathi Fame Madhav Deochake Undergoes A Beard Transformation". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-04 रोजी पाहिले.
  7. ^ "Madhav Deochake gets married to Bageshri; Humari Devrani cast gets 'nostalgic' at the reception". Tellychakkar.com (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
  8. ^ "Madhav Deochake Age, Biography, Wife, Marriage, Wiki, Bio, Wedding". Marathi.TV (इंग्रजी भाषेत). 2020-01-09. 2020-05-22 रोजी पाहिले.
  9. ^ "Bigg Boss Marathi 2: Actor Madhav Deochake gets evicted from the reality show". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 2019-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-16 रोजी पाहिले.
  10. ^ "Madhav C Deochake Biography, Age, Wife, Children, Family, Caste, Wiki & More". www.celebrityborn.com. 2021-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-22 रोजी पाहिले.
  11. ^ "Madhav C Deochake (Big Boss Marathi) Age, Girlfriend, Family, Wife, Biography & More » StarsUnfolded". StarsUnfolded (इंग्रजी भाषेत). 2020-05-22 रोजी पाहिले.
  12. ^ "After Bigg Boss, Madhav Deochake signed for Subhash Ghai's Marathi movie Vijeta - Cinestaan". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी पाहिले.
  13. ^ "Madhav Deochake - Movies, Biography, News, Age & Photos". BookMyShow. 2020-05-22 रोजी पाहिले.