विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख
या पानात मराठी व्याकरण विषयक लेखनावे आहेत.
मराठी भाषा
संपादनभाषेचे मूलभूत घटक
संपादनवर्णमाला
संपादनतोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षरे असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ६० वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ॡ (दीर्घ ऌ), ए, ऐ, ओ, औ, अं, अः क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
मराठीत एकूण ६० वर्ण आहेत.
स्वर
संपादनज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णांपैकी स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ असे एकूण चौदा स्वर आहेत.
स्वरादी
संपादनज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी स्वरादी – अं, अः, आं, आः, इं, इः वगैरे. स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
अनुस्वार-----
अनुनासिक स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा नासिक्य उच्चार म्हणजे अनुनासिक होय. म्हणजेच जेव्हा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट होतो अशा अस्पष्ट व ओझरत्या उच्चारांना अनुनासिक म्हणतात. उदा. मुलांनी, त्यांना, शिक्षकांनी
जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.
विसर्ग विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात. विसर्ग नेहमी शब्दाच्या शेवटी असतो. उदा० स्वत:
विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास विसर्गाचा उच्चार र्, स, श, ष् असा होतो. उदा------ निः+आधार= निराधार, दुः+योधन=दुर्योधन, निः+स्पृह=निस्पृह, निः+श्वास =निश्वास, आविः+कार= आविष्कार तसेच निष्फल,
विसर्गसदृश चिन्हासमोर क, ख आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी क् होतो. उदा० यः+कश्चित= यक्कश्चित; दुः+ख=दुक्ख. या विसर्गाला जिव्हामूलीय म्हणतात.
विसर्गसदृश चिन्हासमोर प, फ आल्यास विसर्गाचा उच्चार कधीकधी प् किंवा फ होतो. उदा. कः+पदार्थ=कप्पदार्थ, मन:+पूत=मनप्पूत; अधः+पात=अधप्पात; फ़ु:+फ़ुस=फ़ुफ़्फ़ुस. याही विसर्गचिन्हाला जिव्हामूलीय म्हणतात.
व्यंजन
संपादनज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. एकूण व्यंजने ४२ आहेत.
संधी
संपादनजवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात.
उदा.
ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा
सूर्यास्त = सूर्य + अस्त
सज्जन = सत् + जन
चिदानंद = चित् + आनंद
केले+ आहे == केलंय
मूळ लेख: संधी (व्याकरण)
प्रयोग
संपादन- कर्तरी प्रयोग : कर्त्यानुसार क्रियापद बदलते. उदा. राम म्हणतो, सीता म्हणते.
- सकर्मक
- अकर्मक
- कर्मणी प्रयोग : कर्मानुसार क्रियापद बदलते. उदा. रामाने आंबा खाल्ला, रामाने आंबे खाल्ले.
- प्रधानकर्तृत्व कर्मणी
- शक्य कर्मणी
- प्राचीन कर्मणी/पुराणकर्मणी
- समापन कर्मणी
- नवीन कर्मणी/कर्मकर्तरी
- भावे प्रयोगकर्ता किंवा कर्म या दोन्हीमुळे देखील क्रियापद बदलत नाही.उदा. माझा निरोप त्याला जाऊन सांगा.
- सकर्मक
- अकर्मक
- भावकर्तरी
वाक्यांचे प्रकार
संपादनसमास
संपादनमुख्य लेख: समास
काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बऱ्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
उदा.
वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.
पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट
कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.
पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य ४ प्रकार पडतात.
१. अव्ययीभाव समास
२, तत्पुरुष समास
३. द्वंद्व समास
४. बहुव्रीही समास
अलंकार
संपादनमुख्य लेख: भाषालंकार
भाषेच्या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात:
- शब्दालंकार : यात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते. याचे यमक, अनुप्रास, श्लेष ही ठळक उदाहरणे आहेत.
उदा: अनुप्रास अलंकार
आज गोकुळात रंग खेळतो हरी l
राधिके जर जपून जा तुझ्या घरी l
- अर्थालंकार: अर्थानुसार होणारे अलंकार हे अर्थालंकार आहेत.
चेतनागुणोक्ती, अर्थान्तरन्यास, स्वभावोक्ती, व्याजस्तुती, पर्यायोक्ती, सार, अन्योक्ती, ससंदेह, भ्रान्तिमान, व्यतिरेक हे काही प्रमुख अर्थालंकार आहेत.
वृत्ते
संपादनमुख्य लेख: वृत्त
शब्दसिद्धी
संपादनमुख्य लेख: शब्द सिद्धी
आपण एकमेकांशी बोलतांना भाषेचा वापर करतो. आपल्याला काही प्रांतात नवनवीन शब्द ऐकायला मिळतात. इतर भाषातले शब्द वापरूनसुद्धा आपण आपला व्यवहार साधतो. शेजारच्या जिल्ह्यात तसेच राज्यात आपले दळणवळण वाढले, की आपण एकमेकांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण करतो. काही काळानंतर त्या भाषेतील शब्द आपल्या भाषेतील शब्द म्हणून ओळखले जातात. आपल्या भाषेतील शब्द कोणते? देशी भाषेतील शब्द कोणते? परभाषेतील शब्द कोणते? विदेशी शब्द कोणते? फारसी, अरबी, उर्दू भाषेतील शब्द कोणते? कोणत्या भाषेतील शब्द आपण जसेच्या तसे घेतला? कोणत्या शब्दात थोडाफार बदल करून आपल्या भाषेत घेतला? अश्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधताना 'शब्द कसा बनतो, म्हणजे सिद्ध होतो' यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.
वाक्यपृथक्करण
संपादनसिद्ध व साधित शब्द
संपादनसिद्ध शब्द
संपादनआपल्या भाषेचा व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी आपण इतर अनेक भाषेतील शब्दांना आपल्या भाषेत समावेश करतो.आपले शब्द व इतर भाषेतून आपल्या भाषेत समाविष्ट झालेल्या शब्दांचा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात वापर करत असतो. आपल्या भाषेत सांगायचे झाल्यास क्रियापद अशी असतात: जा, खा, पी, उठ, बस, शिकव, पळ इत्यादी. अशा मूळधातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात.
साधित शब्द
संपादनआपल्याला भाषेच्या माध्यमातून विविध क्रिया, अर्थ व त्यांच्या छटा निर्माण करणारे शब्द तयार करावे लागतात. वर सांगितल्याप्रमाणे 'जा' या सिद्ध शब्दापासून जाऊन, जाऊनी, जातो, जाणार, जाणीव, जास्त यांसारखे शब्द बनतात. अशा शब्दांना साधित शब्द म्हणतात.