भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६

भारतीय क्रिकेट संघाचा जुलै आणि ऑगस्ट २०१६ दरम्यान ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एक वेस्ट इंडीजचा दौरा केला. दौऱ्यावर ४ कसोटी सामन्यांच्या आधी दोन सराव सामने खेळवले गेले.[][] सदर दौरा २०१६ कॅरेबियन प्रीमियर लीग सोबतच खेळवला गेला.[] या आधीचा ऑक्टोबर २०१४चा दौरा वेस्ट इंडीजने अर्धवट सोडल्यानंतर उभय संघातील हा पहिलाच द्विपक्षीय दौरा होता.[]

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१६
वेस्ट इंडीज
भारत
तारीख जुलै २०१६ – ऑगस्ट २०१६
संघनायक जेसन होल्डर विराट कोहली
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग ब्रेथवेट (२००) विराट कोहली (२५१)
सर्वाधिक बळी मिग्युएल कमिन्स (९) रविचंद्रन अश्विन (१७)
मालिकावीर रविचंद्रन अश्विन (भा)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इव्हिन लुईस (१०७) लोकेश राहुल (११०)
सर्वाधिक बळी ड्वेन ब्राव्हो (२) जसप्रीत बुमराह (४)

जुलै २०१६ मध्ये, बीसीसीआय आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये तीन टी२० सामने खेळवण्याच्या शक्यतांविषयी चर्चा झाली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने विनंती केली की, ऑगस्टच्या शेवटी फ्लोरिडामधील सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्कमध्ये हे सामने खेळवण्यात यावेत.[] वेस्ट इंडीजचा संघ याआधी जून २०१२ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध अमेरिकेत टी२० सामने खेळला होता. भारतीय संघाला व्हिसा मिळण्यासाठी सहा आठवडे लागतील अशी शक्यता वाटत होती, परंतु बीसीसीआय आणि वेस्ट इंडीज बोर्डाला वेळेवर व्हिसा मिळवण्यात यश आले.[][] २ ऑगस्ट रोजी, बीसीसीआयने ऑगस्टच्या शेवटी दोन टी२० सामने फ्लोरिडामध्ये खेळविण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.[]

कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली तर वेस्ट इंडीजने टी२० मालिकेमध्ये १-० असा विजय मिळवला.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[][१०][११][१२] भारतचा ध्वज भारत[१३] [१४] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१५] भारतचा ध्वज भारत[१६]

दौरा सामने

संपादन

२ दिवसीयः वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI वि. भारतीय

संपादन
९-१० जुलै
धावफलक
भारतीय  
वि
  वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI
२६५/६घो (९३ षटके)
रोहित शर्मा ५४* (१०९)
जोमेल वॉरिकन २/६१ (२६ षटके)
२८१/७ (८७ षटके)
शाय होप ११८* (२२९)
अमित मिश्र ४/६७ (२७ षटके)
  • नाणेफेक: भारतीय, फलंदाजी


३ दिवसीयः वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI वि. भारतीय

संपादन
१४-१६ जुलै
धावफलक
वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI  
वि
  भारतीय
१८० (६२.४ षटके)
रहकीम कॉर्नवॉल ४१ (५६)
रविंद्र जडेजा ३/१६ (१३ षटके)
३६४ (१०५.४ षटके)
लोकेश राहुल ६४ (१२७)
रहकीम कॉर्नवॉल ५/११८ (३१.४ षटके)
२२३/६ (८६ षटके)
जेर्मैने ब्लॅकवूड ५१ (१४३)
रविचंद्रन अश्विन ३/५९ (२० षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज अध्यक्षीय XI, फलंदाजी


कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२१-२५ जुलै
१०:००
धावफलक
वि
५६६/८घो (१६१.५ षटके)
विराट कोहली २०० (२८३)
क्रेग ब्राथवेट ३/६५ (१४.५ षटके)
२४३ (९०.२ षटके)
क्रेग ब्राथवेट ७४ (२१८)
उमेश यादव ४/४१ (१८ षटके)
२३१ (७८ षटके) (फॉ/ऑ)
कार्लोस ब्राथवेट ५१ (८२)
रविचंद्रन अश्विन ७/८३ (२५ षटके)
भारत १ डाव आणि ९२ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स मैदान, नॉर्थ स्टॅंड, ॲंटिग्वा
पंच: अलिम दर (पा) आणि इयान गोल्ड (इं)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • चौथ्या दिवशी वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान ३० षटकांनंतर पावसामुळे सामना काही वेळ थांबवून दुपारचे जेवण लवकर घेण्यात आले.
  • कसोटी पदार्पण: रोस्टन चेस (वे).
  • विराट कोहलीच्या (भा) ३००० कसोटी धावा पूर्ण.
  • विराट कोहलीचे (भा) पहिलेच कसोटी द्विशतक. भारतीय कर्णधारातर्फे कसोटी क्रिकेटमधील परदेशातील हे पहिलेच द्विशतक
  • आशिया खंडाबाहेर भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय तसेच वेस्ट इंडीज मधील पहिला आणि आशियाबाहेरील चौथा डावाने विजय.[१७]
  • वेस्ट इंडीजचा मायदेशातील सर्वात मोठा पराभव.[१७]
  • अश्विनची ८३ धावांत ७ बळी ही भारतीय गोलंदाजातर्फे परदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]
  • एकाच कसोटीत शतक आणि ७ बळी घेणारा अश्विन हा जगातील तिसरा खेळाडू.[१७]


२री कसोटी

संपादन
३० जुलै - ३ ऑगस्ट
१०:००
धावफलक
वि
१९६ (५२.३ षटके)
जेर्मईने ब्लॅकवुड ६२ (६२)
रविचंद्रन अश्विन ५/५२ (१६ षटके)
५००/९घो (१७१.१ षटके)
लोकेश राहुल १५८ (३०३)
रोस्टन चेस ५/१२१ (३६.१ षटके)
३८८/६ (१०४ षटके)
रोस्टन चेस १३७* (२६९)
मोहम्मद शमी २/८२ (१९ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • पावसामुळे ३ऱ्या दिवशी भारताने डाव घोषित केल्यानंतर खेळ होऊ शकला नाही.
  • पावसामुळे ४थ्या दिवशी फक्त १५.५ षटकांचा खेळ होऊ शकला.
  • कसोटी पदार्पण: मिग्वेल कमिन्स (वे)


३री कसोटी

संपादन
९-१३ ऑगस्ट
१०:००
धावफलक
वि
३५३ (१२९.४ षटके)
रविचंद्रन अश्विन ११८ (२९७)
मिग्युएल कमिन्स ३/५४ (२१.४ षटके)
२२५ (१०३.४ षटके)
क्रेग ब्रेथवेट ६४ (१६३)
भुवनेश्वर कुमार ५/३३ (२३.४ षटके)
२१७/७घो (४८ षटके)
अजिंक्य रहाणे ७८* (११६)
मिग्युएल कमिन्स ६/४८ (११ षटके)
१०८ (४७.३ षटके)
डॅरेन ब्राव्हो ५० (१००)
मोहम्मद सामी ३/१५ (११ षटके)
भारत २३७ धावांनी विजयी
सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका
पंच: नायजेल लॉंग (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (भा)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • ३ऱ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही
  • कसोटी पदार्पण: अल्झारी जोसेफ (वे)
  • वेस्ट इंडीज मध्ये २ कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार.[१८]


४थी कसोटी

संपादन
१८-२२ ऑगस्ट
१०:००
धावफलक
वि
६२/२ (२२ षटके)
क्रेग ब्रेथवेट ३२* (७८)
इशांत शर्मा १/७ (५ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी
  • १ल्या दिवशी जेवणानंतर पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला.
  • ओल्या मैदानामुळे २, ३, ४ आणि ५व्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.


टी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२७ ऑगस्ट २०१६
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
२४५/६ (२० षटके)
वि
  भारत
२४४/४ (२० षटके)
इव्हिन लुईस १०० (४९)
रविंद्र जडेजा २/३९ (३ षटके)
लोकेश राहुल ११०* (५१)
ड्वेन ब्राव्हो २/३७ (४ षटके)
वेस्ट इंडीज १ धावेने विजयी
सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क, लॉडरहिल, फ्लोरिडा
पंच: नायजेल दुगीड (वे) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: इव्हिन लुईस (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • भारताचा अमेरिकेतली पहिलाच क्रिकेट सामना
  • वेस्ट इंडीजने पहिल्या १० षटकांत १३२ धावा केल्या, ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात जास्त धावा आहेत.
  • इव्हिन लुईस (वे) आणि लोकेश राहुल (भा) यांची पहिली आंतरराष्ट्रीय टी२० शतके.
  • वेस्ट इंडीज संघाने एकूण २१ षट्कार मारले, हा आंतरराष्ट्रीय टी२० मधील विक्रम आहे.
  • ह्या सामन्यात एकूण ४८९ धावा केल्या गेल्या, ह्या आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वात जास्त धावा आहेत.

२रा सामना

संपादन
२८ ऑगस्ट २०१६
१०:००
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४३ (१९.४ षटके)
वि
  भारत
१५/० (२ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही. (नो रिझल्ट)
सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क, लॉडरहिल, फ्लोरिडा
पंच: लेसली रैफर (वे) आणि जोएल विल्सन (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
  • तांत्रिक अडचणींमुळे सामना ४० मिनिटे उशिरा सुरू करण्यात आला.
  • भारताच्या डावादरम्यान २ षटकांनंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि पुढे चालु होऊ शकला नाही.
  • रविचंद्रन अश्विनचे (भा) २०० टी२० बळी पूर्ण.


संदर्भ

संपादन
  1. ^ "बीसीसीआय कडून भारताच्या वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी हिरवा कंदील" (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीज कॅंपमधील आशावादी खेळाडू" (इंग्रजी भाषेत). १६ मे २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारताविरुद्ध ४ कसोटी सामन्यांचाठी वेस्ट इंडीज सज्ज" (इंग्रजी भाषेत). २९ मार्च २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "भारत ६ जुलै पासून ७ आठवड्यांचा वेस्ट इंडीज दौरा करणार" (इंग्रजी भाषेत). २ जून २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "भारत-वेस्ट इंडीजच्या ऑगस्ट मधील टी२० सामन्यांच्या चर्चेसाठी बीसीसीआय अधिकारी फ्लोरिडामध्ये" (इंग्रजी भाषेत). २७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "भारत-वेस्ट इंडीज सामन्यांपुढे व्हिसाचा अडथळा" (इंग्रजी भाषेत). २९ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "भारताचे फ्लोरिडामधील सामने '९८% नक्की'; किंवा २०१७ मध्ये पुन्हा दौरा करणार" (इंग्रजी भाषेत). २९ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "बीसीसीआय तर्फे वेस्ट इंडीज विरुद्ध फ्लोरिडामध्ये दोन टी२० सामन्यांची घोषणा" (इंग्रजी भाषेत). २ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "वेस्ट इंडीज संघात रोस्टन चेसचा समावेश रामदीनला वगळले" (इंग्रजी भाषेत). ११ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "पहिल्या कसोटीसाठी मिग्वेल कमिन्सला पाचारण" (इंग्रजी भाषेत). १३ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "वेस्ट इंडीज संघात नवोदित अल्झारी जोसेफची निवड" (इंग्रजी भाषेत). २८ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "वेस्ट इंडीज कसोटी संघात चंद्रिकाच्या जागी होप" (इंग्रजी भाषेत). ४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ "मुंबईकर शार्दूल ठाकूरला विंडीजचे तिकीट". 2016-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-24 रोजी पाहिले.
  14. ^ "शार्दूल ठाकूरची वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड" (इंग्रजी भाषेत). २३ मे २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ "वेस्ट इंडीज टी२० कर्णधारपदी कार्लोस ब्रेथवेटची निवड" (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "अमेरिकेतली टी२० साठी रैना, युवराजला वगळले" (इंग्रजी भाषेत). १२ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ a b c d "अश्विनची शतक आणि ७ बळींसह बॉथमशी स्पर्धा" (इंग्रजी भाषेत).
  18. ^ "वेस्ट इंडीज मध्ये २ कसोटी सामने जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार". १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे वेस्ट इंडीज दौरे
१९५३ | १९६२ | १९७१ | १९७६ | १९८३ | १९८९ | १९९७ | २००२ | २००६ | २००९ | २०११ | २०१६ | २०१७ | २०२३