बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४
बांगलादेश क्रिकेट संघ ऑगस्ट २०२४ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२][३] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद स्पर्धेचा भाग होती.[४][५] पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२३-२०२७ आयसीसी भविष्य दौरे कार्यक्रमाचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका आयोजित केली होती.[६] जुलै २०२४ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २०२४-२५ घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने जाहीर केले होते.[७][८]
बांगलादेश क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२४ | |||||
पाकिस्तान | बांगलादेश | ||||
तारीख | २१ ऑगस्ट – २ सप्टेंबर २०२४ | ||||
संघनायक | शान मसूद | नजमुल हुसैन शान्तो | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद रिझवान (२९४) | मुशफिकर रहीम (२१६) | |||
सर्वाधिक बळी | खुर्रम शहजाद (९) | मेहेदी हसन (१०) | |||
मालिकावीर | मेहेदी हसन (बां) |
१८ ऑगस्ट २०२४ रोजी, पीसीबीने बांधकामामुळे दुसरा कसोटी सामना नॅशनल स्टेडियम, कराची येथून रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये हलवला.[९]
संघ
संपादनपाकिस्तान[१०] | बांगलादेश[११] |
---|---|
१७ ऑगस्ट २०२४ रोजी, महमुदुल हसन जॉय मांडीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला.[१२][१३] १९ ऑगस्ट २०२४ रोजी, आमेर जमाल पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला.[१४]
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२१-२५ ऑगस्ट २०२४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दिवसाची सुरुवात ओल्या आउटफिल्डमुळे ४ तास ३० मिनिटे उशीराने झाली.
- सौद शकील (पाकिस्तान) यांनी कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या.[१५]
- बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानची ही सर्वात कमी धावसंख्या होती.[१६]
- बांगलादेशचा कसोटी मध्ये पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय होता.[१७]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, पाकिस्तान ०.
दुसरी कसोटी
संपादन३० ऑगस्ट–२ सप्टेंबर २०२४
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
- खुर्रम शहजादने (पा) कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[१८]
- हसन महमूदचे (बां) कसोटीमध्ये पहिले पाच बळी घेतले.[१९]
- प्रथमच, बांगलादेशी वेगवान गोलंदाजांनी कसोटीत एका डावातील सर्व १० विकेट्स घेतल्या.[२०][२१]
- बांगलादेशने पाकिस्तानच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: बांगलादेश १२, पाकिस्तान ०.
संदर्भ
संपादन- ^ "२०२४-२५ मध्ये बांगलादेश दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार". क्रिकफ्रेन्झी (इंग्रजी भाषेत). 2023-12-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "यूएसए आणि कॅरिबियनमधील टी२० विश्वचषकासह २०२४ साठी पाकिस्तान क्रिकेटचे वेळापत्रक". द नॅशनल (इंग्रजी भाषेत). २४ डिसेंबर २०२३. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानचा मायदेशातील हंगाम: बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यांची घोषणा". क्रिकबझ्झ. ५ जुलै २०२४. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानचे मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामासाठी भरगच्च वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 5 July 2024. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2022-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पीसीबीचे पाकिस्तान पुरुष संघाचे २०२३ ते २०२७ मधील दौऱ्यांचे कार्यक्रम जाहीर". क्रिकेट पाकिस्तान (इंग्रजी भाषेत). १७ ऑगस्ट २०२२. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानचे २०२५-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामासाठी वेळापत्रक जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ५ जुलै २०२४. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४-२५ च्या भरगच्च मोसमात पाकिस्तान बांगलादेश, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटीचे यजमानपद भूषवणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी कराचीहून रावळपिंडीला हलवली गेली". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश कसोटीसाठी पाकिस्तान संघ जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ७ ऑगस्ट २०२४. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ च्या पाकिस्तान दौऱ्यासाठी बांगलादेश संघाची घोषणा". बांगलादेश क्रिकेट बोर्ड. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "मांडीच्या दुखापतीमुळे महमुदुल हसन पाकिस्तान कसोटीला मुकणार". क्रिकबझ्झ. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी दुखापतग्रस्त महमुदुलच्या समावेशाबद्दल शंका". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आमिर जमाल पाठीच्या समस्येमुळे बांगलादेश कसोटी मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "रावळपिंडी कसोटीत सौद शकील सर्वात जलद 1000 धावा करणारा संयुक्त पाकिस्तानी ठरला". द एक्सप्रेस ट्रिब्यून. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेशचा पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ऐतिहासिक विजय". द डेली स्टार. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानवर कसोटी विजयासह बांगलादेशने रचला इतिहास". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "खुर्रम शहजादने नोंदवली २१ वर्षात घरच्या मैदानावर पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाची सर्वोत्तम आकडेवारी". विस्डेन. ३ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणारा हसन बांगलादेशचा पहिलाच वेगवान गोलंदाज]]".
- ^ "टायगर पेसर्स मेक इट १० आउट ऑफ १० फॉर द फर्स्ट टाइम इन टेस्ट". द डेली स्टार. ३ सप्टेंबर २०२४.
- ^ "वेगवान वर्चस्व उघड: बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास". द बिझनेस स्टॅंडर्ड. ३ सप्टेंबर २०२४.