पुरणपोळी (मराठी:पुरणाची पोळी ,गुजराती: પુરાણોપોલી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु/बोब्बाटु/बोब्बाटलु/पोलेय्लु/भाकशालू) हा महाराष्ट्रात बनवला जाणारा एक गोड आणि महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे.

पुरणपोळी
पर्यायी नावे पुरणपोळी, बॉबबट्टू, बक्सम, ओलिगा, होलिगे, ओबाट्टू, पुरण पुरी, वेद्मी, पयासाबोल्ली, बोल्ली, पोली किंवा उप्पिट्टू भाकशालु, उब्बाट्टी, पोले, फक्त पोली
जेवणातील कोर्स मुख्य
उगम भारत
प्रदेश किंवा राज्य आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तेलंगाणा, केरळ and तमिळनाडू
द्वारे निर्मित अज्ञात
अन्न वाढण्याचे तापमान गरम किंवा थंड
मुख्य घटक गव्हाचे पीठ, साखर, गुळ, चणा, तूप
भिन्नता हरभऱ्याचे किंवा तूरडाळीचे पुरण
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा
(प्रती 1 पोळी द्वारे)
291 किलो कॅलरी (1218 किलो जुल)tarladalal
पुरणपोळी
पुरणपोळी

देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.

मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

पुरणपोळी माहिती

संपादन

महाराष्ट्रात गुढीपाडवा, मकर संक्रांत, होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीलासुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषतः होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटकामध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

पुरणपोळीची पाककृृती

संपादन

साहित्य—

  1. ३०० ग्रॅम हरभरा डाळ
  2. ३०० ग्रॅम गूळ किंवा साखर
  3. एक छोटा चमचा वेलची पूड, जायफळ आणि सुंठ
  4. १५० ग्रॅम गहू पीठ किंवा मैदा
  5. पाणी

अपवाद : गुजरातमध्ये तूर डाळ वापरतात. सामान्यपणे तूर डाळ किंवा तोगरि बेले ह्यांचा कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये उपयोग करतात.

  1. प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घेतली जाते. ती १५ मिनिटे व्यवस्थित शिजवून दयावी.
  2. डाळ शिजल्यानंतर त्याच्यातले आधण (उकळलेले पाणी ) काढून घ्यावे. काढून घेतलेले आधण कटाच्या आमटीसाठी वापरतात.
  3. शिजलेल्या डाळीत गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. म्हणजे पुरण तयार होईल. त्यात आवडीप्रमाणे वेलची पूड, जायफळ पूड घालावी.
  4. तयार झालेले पुरण पुरणयंत्रातून गाळून घ्यावे म्हणजे ते एकजीव होते.
  5. गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून त्याची कणिक तयार करावी. पुरण पोळीला पिवळा रंग येण्यासाठी पुरणामध्ये हळद वापरावी.
  6. नंतर पुरणाचे सारण कणकेचा गोळा करून त्याच्यात भरावे आणि छान पुरणपोळी लाटून घ्यावी. तव्यावर मध्यम आचेवर तेल लावून पोळी भाजून घ्यावी.

इतर माहिती

संपादन

काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येऊन द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात.

याला विविध प्रदेशात विविध नावे आहेत. मराठीमध्ये पुरणपोळी म्हणून ओळखले जाते. तेलगू, आंध्र प्रदेश मध्ये याला बॉबबट्टू किंवा बक्सम किंवा ओलिगा म्हणून ओळखले जाते. कन्नड मध्ये याला होलिगे किंवा ओबाट्टू म्हणून ओळखले जाते. गुजराती मध्ये पुरण पुरी किंवा वेद्मी म्हणून ओळखले जाते. मल्याळम मध्ये पयासाबोल्ली किंवा फक्त बोल्ली म्हणून ओळखले जाते. पोली किंवा उप्पिट्टू तामिळ मध्ये, भाकशालु, उब्बाट्टी किंवा पोले तेलगू, मध्ये आणि फक्त पोली कोकणी मध्ये. केरळ आणि तामिळनाडूमध्ये सहसा भोजन व मेजवानीमध्ये पाला पासाम दिले जाते.

हे सुद्धा पहा

संपादन