तूर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तूर हे एक द्विदल धान्य आहे. हे भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचे धान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा पदार्थ आहे. याचे वरण बहुतेकजण आवडीने खातात.
पीक
संपादनपाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करतात. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळल्यावरर प्रति १० किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करतात.
पेरणीसाठी आय.सी.पी.एल- ८७ (१२० दिवस), ए.के.टी.- ८८११ (१४० दिवस), बी.एस.एम.आर.- ८५३ (१६० दिवस), बी.एस.एम.आर.- ७३६ (१७० दिवस), विपुला (१४५- १६० दिवस) हे वाण चांगले आहेत. आंतरपीक पद्धतीने लागवड करताना तूर अधिक बाजरी (१-२), तूर अधिक सूर्यफूल (१-२), तूर अधिक सोयाबीन (१-३), तूर अधिक ज्वारी (१-२ किंवा १-४), तूर अधिक कापूस (१-६ किंवा १-८), तूर अधिक भुईमूग (१-३), तूर अधिक मूग (१-३), तूर अधिक उडीद (१-२) या पद्धतीने लागवड केल्यास उत्तम. सलग पीक घ्यावयाचे असल्यास आय.सी.पी.एल- ८७ या अति लवकर तयार होणाऱ्या वाणाकरिता ४५ बाय १० सें.मी. अंतर, तर ए.के.टी.- ८८११ वाणासाठी ४५ बाय २० सें.मी. अंतर ठेवतात. लवकर वाढणाऱ्या वाणाकरिता ६० बाय २० सें.मी. अंतर तर, विपुला या मध्यम कालावधीच्या वाणाकरिता ९० बाय २० सें.मी. अंतर ठेवले जाते.
सुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. त्यासाठी प्रति हेक्टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी, तर पेरणी करताना २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद म्हणजे १२५ किलो डीएपी प्रति हेक्टरी देणे फाद्याचे असते.