रायझोबियम जीवाणू किंवा रायझोबियम बॅक्टेरिया हे मुख्यतः द्विदल धान्याच्या मुळ्यांवर सहजीवन पध्दतीने गाठी निर्माण करून रहातात. हे जीवाणू हवेतील नत्रस्थिरीकरण तथा मातीतील नत्र विघटनाचे काम करतात.[१] या बदल्यात वनस्पती त्यांना आपल्या मुळ्यात संरक्षण देतात व प्रकाशसंश्लेषण द्वारे निर्माण केलेली शर्करा (कर्ब संयुगे) अन्न म्हणून देतात.

प्रयोगशाळेतील रायझोबियम जीवाणू
सोयाबीनच्या मुळींवरील रायझोबियमच्या गाठी

गटसंपादन करा

या जीवाणूंच्या सत्तर पेक्षा जास्त उपजाती आहेत. पैकी शेती उपयुक्त प्रमुख सात उपजाती असून त्या, ज्या पिकांच्या गटावर असतात त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केल्या जाते [२].

गट जीवाणू पिके
चवळी रायझोबियम स्पेसीज चवळी, मुग, तूर, उडीद, वाल, मटकी, गवार, भुईमुग, कुलथी
हरभरा रायझोबियम लोटी हरभरा
वाटाणा रायझोबियम लेग्यूमिनोसारम वाटाणा, मसूर
घेवडा रायझोबियम फेजीओलाय सर्व प्रकारचे घेवडे
सोयाबीन रायझोबियम जापोनिकम सोयाबीन
अल्फाल्फा रायझोबियम मिलीलोटी मेथी, लसूणघास
बरसीम रायझोबियम ट्रायफोली बरसीम घास

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ Postgate, J. (1998). Nitrogen Fixation (3rd ed.). Cambridge: Cambridge University Press.
  2. ^ "सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक आहेत जिवाणू खते; , जाणून घ्या त्याचे प्रकार अन् वापरण्याची पद्धत". 2020-06-23. 2021-02-01 रोजी पाहिले.