पंजाब

भारतातील एक राज्य
(पंजाब, भारत या पानावरून पुनर्निर्देशित)

पंजाब हे भारताच्या वायव्येकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. पंजाब पाच नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. याच्या ईशान्येला हिमाचल प्रदेशजम्मू आणि काश्मीर, पूर्वेस चंदिगड, दक्षिण व आग्नेय दिशांना हरयाणा, नैऋत्येस राजस्थान ही राज्ये आहेत तर पश्चिमेस पाकिस्तान हा देश आहे. चंदिगड ही पंजाब व हरियाणाची संयुक्त राजधानी आहे. पंजाबचे क्षेत्रफळ ५०,३६२ आहे तर पंजाबची लोकसंख्या १०,३८,०४,६३७ एवढी आहे. पंजाबी ही पंजाबची प्रमुख भाषा आहे. पंजाबची साक्षरता ७६.६८ टक्के आहे. ताग, गहू, तांदूळ, चहा ही येथील प्रमुख पिके आहेत. पंजाब मध्ये शीख धर्माचा उदय झाल्याने तेथे शीख धर्मीयांची संख्या जास्त आहे.

  ?पंजाब
ਪੰਜਾਬ
भारत
—  राज्य  —
Map

३०° ४६′ ००″ N, ७५° २८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ५०,३६२ चौ. किमी
राजधानी चंदिगढ
मोठे शहर लुधियाना
जिल्हे 20
लोकसंख्या
घनता
२,४२,८९,२९६ (15th)
• ४८२/किमी
भाषा पंजाबी
राज्यपाल व्ही. पी. सिंग बडनोरे
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह
स्थापित नोव्हेंबर १, १९५६
विधानसभा (जागा) विधानसभा Unicameral (117)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-PB
पंजाब चिन्ह
पंजाब चिन्ह

पंजाब पूर्व इतिहास

संपादन

पंजाबमधील असंतोष : पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता. १९७३ मध्ये अकाली दलाने ‘आनंदपूर साहिब’ ठराव मंजूर केला. त्यानुसार चंदीगढ पंजाबला द्यावे, इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती. १९७७ मध्ये अकाली दल पंजाबमध्ये सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणीवाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या. १९८० मध्ये पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले. या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते. सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले. यातूनच १९८३ मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेला. भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते.

भूगोल

संपादन

कृषि

पंजाब एक कृषि प्रधान राज्य आहे. येथे गव्हाचे उत्पादन सर्वाधिक हा॓ते.

जिल्हे

संपादन

यावरील विस्तृत लेख पहा - पंजाबमधील जिल्हे पंजाब राज्यात २२ जिल्हे आहेत.

 

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: