नावझे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.


  ?नावझे

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर सफाळे
जिल्हा पालघर
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
१,९९८ (२०११)
१,००४ /
भाषा मराठी
सरपंच
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८

भौगोलिक स्थान

संपादन

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईफाट्यावर डाव्या बाजूला वळून वरई सफाळे राज्य मार्गावर ५ किमी अंतरावर फुटणाऱ्या उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किमी अंतरावर वसलेले आहे.पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावरून गेल्यास पारगाव पूल ओलांडल्यानंतर ७ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे.

नागरी जीवन

संपादन

येथील बहुतांश लोक शेतकरी कुटुंबातील आहेत. काही जण पावसाळ्यात मासेमारी करतात.येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

नागरीसुविधा

संपादन

गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावात पाणी पुरवठा, रस्ते देखभाल, सार्वजनिक वीजपुरवठा ग्रामपंचायतीच्या मार्फत पुरविण्यात येतो.

जवळची गावे

संपादन

नावझे गावाच्या आसपास गुंडावे, साखरे, साळीवळी, दहिसर तर्फे मनोर, वेहलोळी, बोट,सावरे, कुडे, खैरे, एंबुरऐरंबी ही गावे आहेत.

संदर्भ

संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc