ती सध्या काय करते

2017 चा मराठी चित्रपट


ती सध्या काय करते (२०१७) हा सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. झी स्टुडिओज् द्वारे निर्मिती होऊन चित्रपट ६ जानेवारी २०१७ला प्रदर्शित झाला.[] अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे (लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा) हे तरुणपणीच्या भूमिकेत आहेत.[]

ती सध्या काय करते
दिग्दर्शन सतीश राजवाडे
निर्मिती सतीश राजवाडे[]
कथा सतीश राजवाडे
पटकथा मनस्विनी लता रवींद्र
प्रमुख कलाकार अंकुश चौधरी
तेजश्री प्रधान
अभिनय बेर्डे
आर्या आंबेकर
आदित्य राजवाडे
निर्मोही अग्निहोत्री
संकलन राहुल भटनाकर
छाया सुहास गुजराती
संगीत अविनाश-विश्वजीत
निलेश मोहरीर
मंदार आपटे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ०६ जानेवारी २०१७
वितरक झी स्टुडिओज्
निर्मिती खर्च ₹४.५ कोटी
एकूण उत्पन्न ₹२८ कोटी (१८ दिवस)


चित्रपटाचा ट्रेलर आमीर खानच्या दंगलसोबत दाखवला गेला.[]

भूमिका

संपादन
  • अंकुश चौधरी: अनुराग
  • तेजश्री प्रधान: तन्वी
  • आर्या आंबेकर: तन्वी
  • अभिनय बेर्डे: अनुराग
  • ह्रुदित्य राजवाडे: अनुराग
  • निर्मोही अग्निहोत्री: तन्वी
  • उर्मिला काणिटकर: राधिका
  • प्रसाद बर्वे: पव्या
  • संजय मोने: अनुरागचे वडील
  • सुकन्या कुलकर्णी-मोने: अनुरागची आई
  • तुषार दळवी: तन्वीचे वडील
  • अनुराधा राजाध्यक्ष: तन्वीची आई
  • इशा फडके: मोहिनी

मध्यमवयाच्या अनुरागला अचानक तन्वी आठवते, जिच्यावर त्याचं पहिलं प्रेम होतं आणि दोघे एकमेकांना बरीच वर्षे भेटली नसतात. तो महाविद्यालयात त्याचं प्रेम जाहीर करणार होता, पण त्यांचं तिथं भांडण होतं. त्यावेळी तो रागात तिच्यावर ओरडतो. त्यानंतर ती दिल्लीला निघून जाते. तिथून पुढे बोस्टन, अमेरिकेला.

काही वर्षांत दोघांचीही लग्नं होतात. अनुराग तन्वीच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव ठेवतो. बऱ्याच वर्षांनी दोघे भेटतात. अनुराग तन्वीला कॉलेजच्या प्रसंगाबद्दल माफी मागतो. दोघे एकमेकांना मित्र म्हणून कायम संपर्कात राहण्याबद्दल वचन देतात.

संगीत

संपादन

चित्रपटातील गाणी निलेश मोहरीर, अविनाश-विश्वजित आणि मंदार आपटे यांनी तयार केली.[][]

प्रदर्शन

संपादन

६ जानेवारी २०१७ रोजी चित्रपट इंग्रजी भाषेतील उपशीर्षकांसह महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातही चित्रपट प्रदर्शित झाला.[][]

चित्रपटाचा व्यवसाय

संपादन

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹६ कोटींची कमाई केली. १४ दिवसांत ₹१५ कोटी तर ३ आठवड्यांत ₹२० कोटींचा टप्पा ओलांडला. एकूण कमाई ₹२३ कोटी झाली. हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक आहे

प्रतिसाद

संपादन

प्रेक्षक

हा चित्रपट आजवरच्या मराठीतल्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. विशेषतः तरुण पिढीला या चित्रपटाने आकर्षित केले. कितीदा नव्याने तुला आठवावे, जरा जरा आणि ह्रदयात वाजे समथिंग ही गाणी खूप गाजली.


समीक्षक

समीक्षकांनी चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि आर्या आंबेकर यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. चित्रपटाचे संवाद आणि संगीत यांचंही कौतुक केले गेले.

बाह्य दुवे

संपादन



संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पहिल्या प्रेमाची 'मेमोरेबल' गोष्ट सिनेरिव्ह्यू". 2017-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट 'ती सध्या काय करते'". Loksatta. 2021-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Ti Saddhya Kay Karte tells you how to rekindle true love - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.
  4. ^ Hungama, Bollywood (2016-12-21). "Aamir Khan to promote Marathi film with Dangal : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.
  5. ^ "Saavn".
  6. ^ "Ti Saddhya Kay Karte (2017) - Movie | Reviews, Cast & Release Date - BookMyShow". in.bookmyshow.com. 2021-12-30 रोजी पाहिले.