दंगल (२०१६ चित्रपट)

नितेश तिवारी यांचा चित्रपट

दंगल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड व्यक्तिचित्रपट आहे. महावीरसिंह फोगट ह्या माजी भारतीय कुस्तीपटूवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात आमिर खानने महावीरसिंह फोगटांची व्यक्तिरेखा रंगवली आहे. गीता फोगटबबिता कुमारी ह्या आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्याचे कार्य महावीर फोगट हाती घेतात व ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत ५५ किलो गटात कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून गीता फोगट कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरते अशी कथा दंगलमध्ये रंगवली आहे. ह्याच स्पर्धेत बबिता कुमारीला देखील ५१ किलो गटात रौप्यपदक मिळते.

दंगल
दंगल
दिग्दर्शन नितेश तिवारी
निर्मिती आमिर खान
किरण राव
कथा नितेश तिवारी
प्रमुख कलाकार आमिर खान
साक्षी तंवर
झायरा वसीम
सुहानी भटनागर
फातिमा सना शेख
सानिया मल्होत्रा
अपारशक्ती खुराणा
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २३ डिसेंबर २०१६
वितरक फॉक्स स्टार स्टुडियोज
अवधी १६० मिनिटे
निर्मिती खर्च ७० कोटी रुपये
एकूण उत्पन्न ७४१ कोटी रुपये


२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला दंगल भारताच्या उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, छत्तीसगढमध्य प्रदेश ह्या ६ राज्यांमध्ये करमुक्त जाहीर करण्यात आला. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंदीस उतरलेल्या दंगलला अमाप यश मिळाले व ७४१ कोटी रुपये कमावून त्याने आजवरच्या सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दंगलला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शकसर्वोत्तम अभिनेता हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.

महावीर फोगट यांचे चरित्र संपादन

क्रीडापत्रकार सौरभ दुग्गल यांनी महावीरसिंह फोगट यांच्या जीवनप्रवासावर ‘आखाडा’ नावाच्चे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. मेहता पब्लिकेशनने हे मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे.

बाह्य दुवे संपादन